तमदलगे – प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव (Tamdalge)
महाराष्ट्रात तमदलगे हे शेतीसंबंधीचे सर्व पुरस्कार मिळालेले गाव आहे!... ते तेथील प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील बाबासाहेब कचरे, रावसाहेब पुजारी, राजकुमार आडकुठे, वैजयंतीमाला वझे यांना शासनाने गौरवले आहे. येथील सुरगोंडा पाटील यांनी विक्रमी लांबीची काकडी पिकवल्याची नोंद गिनीज बुकमध्ये नोंदवली आहे. नृसिंह हे तेथील ग्रामदैवत आहे.
तमदलगे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्याच्या त्याच नावाच्या मुख्य ठिकाणापासून अठरा किलोमीटर अंतरावर वसलेले एक छोटे गाव. तमसोमा ज्योतिर्गमय याचा अर्थ अंधार नाहीसा करणे/होणे तेलगुमध्ये असा आहे. त्यावरून गावातील अंध:कार नाहीसा करण्यासाठी गावाने हे नाव तमदलगे हे धारण केले असावे असे म्हटले जाते. म्हणजे बाराशे एकर डोंगर आणि पाचशे एकर पिकाऊ जमीन! गावाची खरी अमानत. गावाची लोकसंख्या दोन हजार दोनशे आहे.