'वयम्' चळवळ लोकविकासासाठी नेते तयार करण्याची!


मिलिंद थत्ते यांना त्यांच्या लहानपणापासून घरात वैचारिक वातावरण मिळाले. त्यांचे वडील संघाचे काम करत असत. मिलिंद थत्ते यांनी मुंबईतील शीव येथील एस.आय.ई.एस. कॉलेजमधून पदवी घेतली. मग ते पत्रकारितेकडे वळले. त्यांच्या मनामध्ये पत्रकारिता करत असताना (१९९६ ते ९९) समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ वेळोवेळी उफाळून येई. ते एका निवडणुकीसाठी झारखंड येथे गेले असताना ‘फ्रेण्डस ऑफ ट्रायबल’ संस्थेशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांनी बिहार, छत्तीसगढ, झारखंड या  भागांतील आदिवासींचा अभ्यास केला. हाती पत्रकारितेचे शस्त्र होतेच. तेव्हाच्या पत्रकारितेचे स्वरूप अधिकतर राजकीय होते. तिचा ताळमेळ मिलिंद थत्ते यांच्या मनातील आणि नजरेसमोरील कामाशी न जुळल्यामुळे त्यांना त्यात समाधान मिळत नव्हते. त्यांची भूमिका फक्त साक्षीदाराची होती.

लढणा-या ‘सजग नागरिक मंचा’ची कहाणी


‘ये सिस्टिम है, भाई..यहां ऐसा ही होता है...इतना तो चलता है ना भाई’ म्हणत आपण ‘सिस्टिम’नावाच्या यंत्रणेचे स्वतःहून बळी ठरायला तयार होतो. कोणाला सांगणार, दाद मागायची कुठे अशी हतबल, निराशावादी वाक्यं घोळत राहू, पण कधी ‘का?’, ‘कशासाठी’, ‘कोणी सांगितल?’ असं विचारण्याची हिंमत ठेवायची आपल्याला भीती वाटते. आपण सहन करतो..नाठाळासारखे यंत्रणेकडे पाहत राहतो आणि कळत नकळत यंत्रणेच्या पिचलेल्या जगाचे भाग होतो. का? एकटा दुकटा माणूस काहीच करू शकत नाही असं का वाटतं आपल्याला?

साधं रेशनिंगचं कार्ड काढायचं म्हटलं की सरकारी कार्यालयात हेलपाटे घालून आपण थकून जातो...वैतागून पैसे चारतो तरी आपलं कार्ड काही हाती येत नसतं तरी आपण शुंभासारखे असतो. प्रादेशिक वाहतूक विभागात ‘लर्निंग लायसन्स’ काढायला जातो तर ही झुंडशाही उभी राहते. तुम्ही अत्यंत बेअक्कल आहात आणि तुम्हाला फॉर्म कसा भरायचा इथपासून ते लाईनीत उभं राहण्यापर्यंत काहीही ठाऊक नाही! असा समज असणारे शे-पन्नास लोक पुढ्यात उभे राहतात. पुढे जाऊच देत नाहीत! ‘एजंट’शिवाय कामच होऊ शकत नाही, लायसन्स मिळणारच नाही हे पटवून देतात आणि आपण एजंटला शिव्या घालत त्याचा खिसा गरम करतो. बसच्या अपुèया संख्यांची बाब असो,  ‘महावितरण’ने आकारलेल्या अवाजवी बिलाचा प्रश्न, खड्ड्यातील रस्ते कि रस्त्यातील खड्डे, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या स्वच्छतागृहांचे प्रश्न असो, महापालिकेच्या अपु-या सुविधा देण्याचा पण असो, अव्वाच्या सव्वा करवाढ असो, काय करतो आपण...तर ‘काहीच नाही!’