बब्रूवान रुद्रकंठावार (Babruvan Rudrakanthawar)
बब्रूवान रुद्रकंठावार यांचे मूळ नाव धनंजय चिंचोलीकर. त्यांचे नाव मराठी साहित्यात गाजले; त्याचे कारण म्हणजे त्यांच्या लिखाणातील अस्सल मराठवाडी ग्रामीण भाषा. त्यांचे चिंचोली - लिंबाजी हे गाव. ते औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आहे. ते राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर लिहिणारे लेखक आहेत. ते दैनिक तरुण भारत, देवगिरी (औरंगाबाद) येथे पत्रकार होते.
त्यांचा जन्म 11 जानेवारी 1965 रोजी करकंब (तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर) या त्यांच्या आजोळी झाला. त्यांनी बी ए आणि बी जे (पत्रकारिता) पर्यंत शिक्षण घेतले. ते त्रेपन्न वर्षाचे आहेत.