दहा वाजून दहा मिनिटांनी - संतोष हुदलीकर
संतोष हुदलीकर. त्यांनी आठ वर्षांपूर्वी, 2010 साली दहाव्या महिन्यात दहा तारखेला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी दहा मान्यवरांच्या हस्ते दहा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील त्यांच्या स्वतःच्या दहा पुस्तकांचे प्रकाशन करून साहित्यजगतावर अनोखा ठसा उमटवला. त्यांच्या त्या उपक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झालेली आहे. त्यात ‘प्रासंगिका’ नावाचा नवीन साहित्यप्रकार समाविष्ट आहे. ते मूळ गझलकारही आहेत. ते त्यांच्या गझलेबद्दल लिहितात -
प्रहार माझी गझल, लोकहो- विचार माझी गझल,
लोकहो- आयुष्याची असह्य रणरण,
तुषार माझी गझल,
लोकहो- भट-गालिबच्या शहरामधली,
मिनार माझी गझल!