नाना प्रयोगाकारणे

प्रतिनिधी 31/10/2011

जगाबद्दलची नवी माहिती, नवी समज आपण कशा पद्धतीने गोळा करतो, त्यांचा संबंध आपल्या अनुभव-परिघाशी कितपत जोडू शकतो आणि त्यांच्या मदतीने आपल्या भोवतालात काय बदल घडवू शकतो, ह्यावर आपली परिस्थितीच नाही तर उत्क्रांती अवलंबून असते. माहिती ही सतत, अनंत हस्ते मिळत असते, जगण्याच्या ढोबळ किंवा प्राथमिक उद्दिष्टांसाठी आपण सर्वच जीव काही समज (माहिती) प्रयत्नपूर्वक वेचत असतो, पण त्यापुढे जाऊनही आपण सूक्ष्म संदर्भ, सूचक उदाहरणे आणि अप्रत्यक्ष संकल्पनांच्या वा भाववाचक नावांच्या महासागरात दिवसरात्र डुचमळत असतो. अशा विनासायास दिसणार्‍या खुणांचा अन्वय लावण्याचा प्रयत्न मी या सदरात करणार आहे. संपूर्णपणे व्यक्तिकेंद्रित असल्याने त्यात सार्वभौम, त्रिकालाबाधित असे काही बहुधा नसेलच, पण तरी अशा गोष्टींची निदान नोंद तरी व्हावी हा माझा हेतू साध्य होईल.

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.