सोलापूरचे राजेश जगताप 'नासा'त


सरकारी अधिकारी म्हटले, की डोळ्यांपुढे येते अरेरावी, उद्धटपणा, मग्रुरी, वेळकाढुपणा! पण हे सर्व खोटे ठरते राजेश जगताप यांना भेटले तर... ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात शाखा अभियंता आहेत.

प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून सरकारी कार्यालयाची गेलेली पत परत आणणे व प्रशासनाची उंची वाढवणे हे त्यांनी त्यांचे उद्दिष्ट मानले आहे जणू!

आधुनिक तांत्रिक ज्ञानाचा वापर ग्रामीण स्तरावर करणे हे त्यांच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य आहे; तसेच, प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचारी व कामगार वर्गास मूळ उद्देश सोप्या भाषेत पटवून देण्याची हातोटी त्यांना साधली आहे. त्यामुळे कामाचा दर्जा वाढण्यास मदत होते. कार्यालयात येणाऱ्या लोकांचे आस्थापूर्वक स्वागत करून त्यांच्या कामाबद्दल तळमळ दाखवली जाते. सरकारी कार्यालयात कामे रखडायला अनेक कारणे असतात. ती लोकांनाही माहीत असतात, पण जगताप यांच्या अखत्यारीत आल्यानंतर ते काम होतेच होते. अन् तेही नाविन्यपूर्णतेने असा लोकांचा अनुभव आहे. तशा अनेक कामांमुळे जगताप यांना आदर्श अभियंता म्हणून गौरवले गेले आहे. मार्च 2010 मध्ये त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत कर्मचारी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांना आतापर्यंत पाच जिल्हा पुरस्कार, चाळीस राज्य पुरस्कार, चौदा राष्ट्रीय पुरस्कार, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कार लाभले आहेत.

त्यांनी सरकारी इमारतीच्या बांधकामात अनेक कामे नाविन्यपूर्ण कल्पना वापरून, सरकारच्या आर्थिक खजिन्याला धक्का न लावता केली आहेत. त्यांना इमारतींच्या उत्कृष्ठ रचनेबद्दलचे सत्कार, पुरस्कार मिळाले आहेत.

त्यांच्या कल्पक कामांमुळे त्यांना पुण्याच्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे त्यांच्याशी संबंधित विषयांवर व्याख्याते म्हणून 2007 सालापासून बोलावले जाते.

त्यांना सरकारी नोकरीत राहून सामाजिक कार्ये करण्याचा छंदच आहे! हिमालयवीर आनंद बनसोडे यांच्या सात खंडांतील सात सर्वोच्च चढाई मोहिमांना जागतिक संदेशाचे बळ देण्याची कल्पना राजेश जगताप यांचीच. जसे, की त्यांनी अनाथ महिलांना न्याय, पर्यावरण, जागतिक शांतता हे मोहिमेचे विषय सुचवले.

'आर ए टी डब्लू ११८४०' हे काय नवीनच असे कोणालाही वाटेल! पण ते त्याच्या एका दगडाचे नाव आहे. राजेश जगताप यांना दगड जमा करण्याची आवड आहे व तो छंद त्यांनी जोपासला आहे. त्यांच्या घरी तसे संग्रहालयाच आहे. ते कामानिमित्त आंध्रप्रदेशच्या सिमेलगत असलेल्या मन्नाकेली या गावाजवळील साईटवर गेले होते. तेथे एक चमकदार दगड त्यांच्या नजरेत भरला. विस्तवाप्रमाणे लाल लाल! त्यांनी तो दगड घरी आणला. तो अमेरिकन अंतराळ संस्थेच्या (NASA) 'रॉक अराऊंड द वर्ल्ड' या विभागाकडे पाठवून दिला. तारीख होती २२ फेब्रवारी २०१३. 'नासा'ने तो 'युनिक रॉक' स्वीकारला. तो दगड पृथ्वीवरील नव्हताच! उल्कापातामुळे तो जमिनीवर येऊन आदळला होता. दगडाचे महत्त्व 'नासा'ने ओळखले. त्यांनी त्या दगडास 'राजेश जगताप RATW 11840' असे शास्त्रीय नाव दिले. सूर्यमालेतील शोधप्रक्रियेत 'युनिक रॉक' पाठवून मोलाची मदत केल्याचा उल्लेख 'नासा'ने त्यांना पाठवलेल्या १९ जून २०१३ रोजी मिळालेल्या प्रमाणपत्रात नोंद आहे.

राजेश जगताप एकत्र कुटुंब पद्धतीनुसार आई, पत्नी  वर्षा, मुलगा सिद्धार्थ, भाऊ शरद, त्यांची पत्नी सीमा आणि मुले दीक्षा व सिद्धांत यांसोबत राहतात. जगताप यांचे वडील महाराष्ट्र शासनाच्या सेवेत प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.

राजेश जगताप यांनी घरात पुस्तकांचेही मोठे संग्रहालय उभे केले आहे. त्यांनी महत्त्वाच्या विषयांवरील संपादकीय लेखांचे, कात्रणांचेही संकलन केलेले आहे. कात्रणे पद्धतशीरपणे सांभाळून ठेवणे व अभ्यासू विद्यार्थी आणि इतर यांना ती उपयोगी असतील तेव्हा त्यांना देणे असे मोठे काम ते करत आहेत. अशा राजेश जगताप यांनाच ISO चे प्रमाणपत्र मिळायला हवे!

त्यांचे स्वतःच्या अनुभवांवर आधारित 'Think Walk' हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होत आहे.

राजेश जगताप,
9921707099, (0217)2342423
rajeshjagtapnasaratw11840@gmail.com

- श्रीकांत पेटकर

लेखी अभिप्राय

छान माहीती उत्तम अधिकारी याचेकडुन उदाहरणः

पाटील एल पी07/07/2015

WOW :) such really inspire ....
Great job sir ....

sagar nikambe 07/07/2015

Lokupyogi kam ahe

Shivanand Shri…07/07/2015

ase adhikari aataa durmilhach.

great Jagtap Saheb

swati07/07/2015

Sir
tumcha chand aani satat kahitari nacnavin goshticha shodh lavnyacha v tasech swacch aani karyaksham kartrutwa all time great !!!
All the best forever ( sarvakal manapasun shubhechya )

Bhausaheb More (IAS)08/07/2015

सर्व कर्मचारी लोकांसाठी आपण आदर्श आहात, श्री राजेशजी जगताप.

Lata Dongre 08/07/2015

आपण शासकीय सेवेत काम करत आहात व आजच्या शासकीय सेवेत काम करणे त्यातुन वेळ काढणे कठीण होऊन बसले असताना देखील त्यातुन वेळ काढुन आपण आपले समाजासाठी काही देणे आहे म्हणुन व तसा संकल्प करुन आपण समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातुन मदत करत आला आहात.तसेच आपण जोपासलेले वेगवेगळे छंद हे वाखण्याजोगे असुन त्यात तुम्ही सातत्य ठेवले आहे हे अत्यंत महत्वाचे वाट्ते तरी आपल्या पुढील आयुष्याच्या वाटचालीस लाख लाख शुभेच्छा आपले नाव असेच अजरामर होवोत अशीच सदिच्छा॥!!!

दिवाकर धोटे08/07/2015

आवाहन
राजेश जगताप यांच्‍याकडून - '89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड पुणे 15 ते 18 जानेवारी 2016 पर्यंत आहे. विजय प्रकाशन सोलापूर यांचे पुस्तके व ग्रंथविक्री प्रदर्शनात सहभागी स्टॉल क्रमांक 101-102 येथे मी लिहिलेले "थिंक अँन्ड वॉक" हे पुस्तक भव्य प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवले आहे. तुम्‍ही नक्की या स्टॉलला भेट दया. माझे पुस्तक विकत घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत "नाम" या संस्थेशी नाते जोडा.

श्रीकां पेटकर16/01/2016

श्री राजेश जगताप यांचे सारख्या अधीका-यांचे सर्वांनी अनुकरण करणे गरजेचे आहे.

म ना दामले 25/02/2016

By Rajesh Jagtap
माझ्या शासकीय पारदर्शक नोकरीला नुकतीच 20 वर्षे पूर्ण झाली सेवेत मला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.आणि अजूनही होतोय पण माझी यशस्वी वाटचाल मोठया जिद्दीने मी पार पाडत आहे.हल्ली मांजरापेक्षा माणसे जास्त आडवी येत आहेत.शासकीय सेवेत राहुन सामाजिक बांधिलकीचे काम करत आहे.
मी कमावलेले 85 पुरस्कार.
40 राज्यस्तरीय पुरस्कार.
43 राष्ट्रीय पुरस्कार.
02 आंतरराष्ट्रीय पुरस्कार.
अभियंत्याची चांगली प्रतिमा बदलणेचा एक माझा सकारात्मक प्रामाणिक यशस्वी प्रयत्न.

shrikant petkar14/09/2016

राजेश जी आपण प्रामाणिक जिद्दी चिकित्सक अधिकारी अहात.तुमच्या कार्यास शुभेच्छा.

Santosh mhetre08/01/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.