Home गावगाथा

गावगाथा

माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी त्याचा गाव त्याच्या मनातून दूर जात नाही. आठवणीअनुभवसंस्कारतेथे झालेली शरीर व मन यांची घडण यांच्या मिश्रणातून गावाबद्दलची जी ओढ तयार होते, ती विलक्षण असते. म्हणूनच माणसाने त्याच्या गावाचे नाव कोठेही निव्वळ वाचले-पाहिले तरी त्याला आनंद होतो ! प्रत्येकाचे ते गाव कायमस्वरूपी नोंदले जावे आणि तेथील प्रथा-परंपरा-जत्रा-इतिहास या तऱ्हेची माहिती जगभर सर्वत्र पोचत राहवी याकरता महाराष्ट्रातील सर्व गावांची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. प्रत्येक व्यक्ती त्यात सहभागी होऊ शकते. तुम्ही तुमच्या गावाची माहिती शक्य तर ललित रीत्या लिहून पाठवावी. मात्र त्यातील माहिती शंभर टक्के सत्य, दोनदा तपासून पाहिलेली असावी. ती माहिती लेखकाचा फोटो-नाव-संपर्क यांसह ‘थिंक महाराष्ट्रचे वेबपोर्टल आणि अॅप यांवर प्रसिद्ध केली जाईल. हेच काम ऑडिओ – व्हिडिओ – फोटो प्रेझेंटेशन या प्रकारेदेखील सादर करता येऊ शकेल. 

परंपरा जपणारे शिंदी बुद्रुक

चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य लाभलेले, ग्रामदेवता मरिआईची मिरवणूक, 'द्वारकाच्या बैला'ची मिरवणूक, श्रावणात घरोघरी केल्या जाणाऱ्या 'माळी पौर्णिमे'ची पूजा अशा अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा, परंपरा, उत्सव जोपासणारे, एकेकाळी अजरामर संगीत नाट्यकलावंत घडवून ‘नाटकांची शिंदी’ म्हणून ओळख निर्माण केलेले, 'शिक्षकांचे गाव' अशी वैविध्यपूर्ण ओळख असलेले अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील गाव म्हणजे ‘शिंदी बुद्रुक’...

हर्णे – मानव आणि निसर्ग एकरूप

हर्णे म्हटले, की निळाशार समुद्रकिनारा, नाठाळ वारा, सागरी लाटांची गाज आणि दूरवर गेलेली गलबते ! हर्णे म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी माडा-पोफळींची झाडे, चौपाटीवर साठलेल्या माशांच्या राशी आणि त्यांची उस्तवार सांभाळणारे मच्छिमार बांधव व कोळणी ! ‘हर्णे’ रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील एक गाव. त्याचे रूप आणि थाट तालुक्यासारखेच; तरी डोंगरावरील दापोलीच्या कोर्टकचेऱ्यांच्या अधीन असणारे...

विसापूर – दापोलीच्या छायेत

विसापूर म्हणजे गुणवत्तेची खाण ! निसर्ग आणि मनुष्यसंपत्ती- दोन्हींची श्रीमंती. गाव दापोली तालुक्याहून मंडणगडकडे जाताना लागते. एकीकडे दापोली व दुसरीकडे खेड, हे दोन्ही तालुके प्रत्येकी बावीस किलोमीटरवर येतात. मंडणगड तालुका अठरा किलोमीटरवर तर महाड तालुका बत्तीस किलोमीटरवर आहे. म्हणून ते गाव मध्यवर्ती ठिकाण. गावाची रचना म्हणजे मध्यवर्ती विसापूर व सभोवताली नऊ वाड्या. गावाभोवती चहुबाजूंनी हिरवेगच्च डोंगर आहेत, गावातून कालवा काढलेला असावा अशी नदी वाहते...

आठवणीत जपलेली माझी दापोली

माझ्या आठवणीत रेंगाळलेली दापोली मला रोज आठवते. ती दापोली आहे पन्नास-साठच्या दशकातील. माझे एस एस सी होईपर्यंतचे सारे आयुष्य दापोलीत गेले. मी एस एस सी नंतर दापोलीत कॉलेजची सोय नसल्यामुळे मुंबईत आले.तिकडे दापोलीची हद्द सुरू झाली, की काळकाईच्या कोंडावरची असंख्य थडगी दिसू लागत. त्याचप्रमाणे, आजुबाजूच्या शेतांचे दगडी बांध दिसत. काळकाईचा उतार संपला की डाव्या हाताला मशीद आणि मशिदीच्या खालच्या अंगाला खळखळ वाहणारा ओढा होता. थोडे पुढे आले, की दापोलीचे प्रसिद्ध आझाद मैदान दिसे...

जाल तुम्ही जालगावी सुज्ञ बनोनी!

दापोली-जालगावची हनुमान जयंती भैरी देवाच्या जत्रेने मोठी होते. त्या ठिकाणी जालगाव, गव्हे आणि गिम्हवणे अशा तीन गावांचे मनोमिलन होते ! दोनशे वर्षांची ही केवढी थोर परंपरा आहे. एरवीही दापोलीचे उपनगर असे जालगाव गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढले आहे. बारा वाड्या आणि तीस नगरे असा त्याचा पसारा झाला आहे...

स्वच्छ आल्हाददायक हवेचे देगाव (Degaon village for clean and pleasant weather)

दापोली तालुक्यातील देगाव दापोली आणि खेड या दोन्ही तालुका शहरांपासून सुमारे तीस किलोमीटर दूर आहे; समुद्र सपाटीपासून उंचावर आहे. त्यामुळे थंड हवेचे व निसर्गसौंदर्याने नटलेले असे निरव शांततेचे आहे. तेथील सकाळ व संध्याकाळ विविध पक्षांच्या किलबिलाटाने आगळी असते. दक्षिणेकडील डोंगर-रांगेच्या कुशीत भर दुपारीही उन्हाला मज्जाव करणारे पाचकुडीचे दाट जंगल आहे. गावात भडवळ टेप, रावण टेप अशा टेकड्या आहेत...

मुर्डी : दापोली तालुक्यातील उद्यमनगरी

दापोली तालुक्यातील मुर्डी हे परंपरा आणि नवता एकत्र असलेले गाव. ते स्वतःचे असे खास अस्तित्व जपत असते. गाव त्याच्याच तोऱ्यात आणि मिजाशीत असते असे म्हटले तरी चालेल. ते छोटेसे टुमदार गाव; डोंगराच्या कुशीत वसले आहे. लोकमान्य टिळक यांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले त्या वेळेस मुर्डीत कृष्णशास्त्री पेंडसे यांच्या घरी दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू झाला. तो खाजगी असला तरी तो सर्व गावाचा वाटावा असे त्याचे स्वरूप सार्वजनिक होते. गावचे खोत, पेंडसे यांची आठ-नऊ घरे गावात राहती होती. खोती प्रतिवर्षी प्रत्येक घरी बदलती असे...

किन्होळा : जालन्यातील शिक्षकांचे गाव

किन्होळा हे हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. या गावामध्ये जवळजवळ पस्तीस व्यक्ती शिक्षक या पदावर असून ‘शिक्षकांचे गाव’ अशी या गावाची ख्याती पंचक्रोशीत आहे. मात्र असे शैक्षणिक वातावरण गावात कशामुळे निर्माण झाले हे सांगता येत नाही. पण यांतील बरीच घरे दोन पिढ्या तरी शिक्षकी पेशात आहेत. गावाला सांस्कृतिक परंपरा लाभली आहे...

बोरी खुर्दला वैभव नदीचे !

बोरी अरब हे गाव यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा या तालुक्यात येते. तेथील नदीला अडान नदी म्हणतात. त्या नदीमध्ये असलेल्या एका ठिकाणाला ‘लगीनबुडी’ असे म्हणतात. त्या गावचे माठ आणि चहा प्रसिद्ध आहेत. तेथे कापसाचा कारखानाही आहे...

दावलवाडी : जालना-बदनापूर जवळची संपन्नता

दावलवाडी हे गाव जालना जिल्ह्याच्या बदनापूर या तालुक्यात आहे. ते जालन्यापासून आठ किलोमीटर तर बदनापूर या तालुक्याच्या केंद्रापासून दहा किलोमीटर अंतरावर वसले आहे. या गावाने आर.आर. पाटील ग्रामविकास मंत्री असताना, ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना’त जिल्ह्यात 2002 मध्ये दुसरा क्रमांक तर पुढच्याच वर्षी 2003 मध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. गावाला राष्ट्रपती पुरस्कार 2000 ते 2005 या काळातील उल्लेखनीय कामाबद्दल मिळालेला आहे...