महात्मा गांधीजी आणि व्यंगचित्रे (Gandhi in World Cartoons)

2
76

भारतीय गूढ तत्त्वज्ञानाने पाश्चिमात्य जगाला नेहमीच भारून टाकले आहेतसेचकुतूहल भारतीय जादूटोणातांत्रिक-मांत्रिकसाधू-फकीर यांनी तेथे निर्माण केले आहे. पाश्चिमात्य व्यंगचित्रांत राजकीय आणि सामाजिकया दोन्हींमध्ये भारतीयांचे प्रतिनिधीत्व वाघहत्ती आणि मोर यांनी केले आहे; तसेचते दोरखंडाचा साप बनवणारी इंडियन रोप ट्रिकनग्न साधूविलासी राजे-महाराजेखिळ्यांच्या बिछान्यावर झोपून तपश्चर्या करणारे फकीर यांनीही केले आहे. पण अखिल आधुनिक पाश्चिमात्य जगावर मोहिनी घालणारा खराखुरा नंगा फकीर म्हणजे मोहनदास करमचंद गांधी! महात्माजींना नंगा फकीर ही पदवी दिली, ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नसे अशा इंग्लंडच्या अत्यंत प्रभावी पंतप्रधानांनीम्हणजे चर्चिल यांनी. त्या नंग्या फकीराने भारतीय जादूचा जो प्रयोग केला त्याने जगभरच्या राजकारणी, अर्थकारणी, समाजकारणी, ज्ञानी, विद्वान, विचारवंत, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, कलाकार आणि कलावंत अशा सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडले. दुष्टदुर्जनगुंडांचे राखीव खासगी कुरण गणल्या जाणाऱ्या राजकारणात एक किरकोळ माणूस येतोसत्य-अहिंसेचे व्रत घेतोस्वत: ते काटेकोरपणे पाळतोच आणि त्याच्या लक्षावधी अनुयायांना आचरणात आणण्यास लावतोहा विरोधाभास देशोदेशीच्या व्यंगचित्रकारांना वर्षानुवर्षे व्यंगचित्रे काढण्यास विषय देऊन गेला होता. म्हणून चित्रपटातील महान व्यंगचित्रकार चार्ली चॅप्लिन आणि व्यंगचित्रकलेतील महनीय व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांना गांधीजी यांची प्रत्यक्ष भेट घेणे आवश्यक वाटले.

महात्माजींवर जगभर प्रसिद्ध झालेल्या चित्रांपैकी काही निवडक व्यंगचित्रांचा संग्रह नवजीवन प्रकाशन मंदिरने (अहमदाबाद) गांधी व्यंगचित्र संग्रह’ (Gandhi in Cartoons) या नावाने 1969 साली प्रसिद्ध केला. तो अर्पण जगातील व्यंगचित्रकारांनाकेला आहे. गांधी स्मारक निधीने महात्माजींवर व्यंगचित्रांचे प्रदर्शन 1969 साली भरवले होते. त्याचे उद्घाटन प्रसिद्ध अशा पंच मासिकाच्या संपादकांनी केले होते. त्या प्रदर्शनावरून या पुस्तकाची कल्पना सुचली आणि निर्मिती झाली.

महात्माजी आणि त्यांचे तत्त्वज्ञान म्हटले, की सर्वसाधारण समजूत अशी असते, की त्यांचे विनोदाशी वावडे असणार; परंतु महात्माजी त्यांच्या मार्मिक विनोदाबद्दल प्रसिद्ध होते. मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी त्यांना कोणीतरी टोकले, की मिठाशिवाय जेवण बेचव लागेल. त्या वेळी महात्माजींचे उत्तर होतेचव मिठाला नसते, जिभेला असते. गांधीजींचे असे अनेक चुटके गाजलेले आहेत. लोकमान्य ते महात्मा या पुस्तकात सदानंद मोरे यांना महात्माजींचा विनोद’ असा स्वतंत्र लेख लिहावा लागला यात आश्चर्य नाही.

गांधी व्यंगचित्र संग्रहातील अनेक व्यंगचित्रे जुनी अगदी त्यांच्या आफ्रिकेतील संघर्षापासूनची आहेत. काही व्यंगचित्रांवर चित्रकारांची नावे नाहीततर काहींचे तपशील नाहीत. मुखपृष्ठावरील चित्र किती मार्मिक! गांधीजी आणि त्यांचा चरखा हे अतूट नाते. त्या चरख्याचे व्हायोलिन दाखवण्यामागे श्रम हाच संगीतासारखा विरंगुळा आहे! श्रमातून संगीताएवढाच आनंद मिळतो हेही व्यंगचित्रकाराने सांगितले आहे. गांधीजी सडसडीत होते, पण दुर्बल नव्हते. गांधीजींचा कणखर सडसडीतपणा आणि त्याचबरोबर त्यांच्या शरीरातील ताकद व्यंगचित्रकाराने समर्थपणे आणि सार्थ उतरवली आहे. कोणा व्यंगचित्रकाराने ते चित्र काढले असावे?
 
दुसरे चित्र इटालियन चित्रकाराने केलेले ग्राफिक मासिकातील आहे. जखमी ब्रिटिश सिंहाच्या शेपटीवर मीठ चोळण्याची कल्पना देशोदेशींच्या व्यंगचित्रकारांनी भरपूर वापरली. मात्र त्या चित्रकाराची शैली वेगळ्या प्रकारची आहे. त्याने व्यंगचित्रात सिंह आणि महात्माजी यांच्या शरीरयष्टीतील विरोधाभास व्यवस्थित रंगवला आहे. सहसा गांधीजी यांच्या हातातील काठी, ज्याला दंड म्हणत तो मजबूत दाखवला जातो. पण या चित्रात ती काठी म्हणजे झुडुपाची फांदी वाटावी एवढी लवचीक दाखवली आहे.

 

तिसरे चित्र प्रसिद्ध व्यंगचित्रकार रेनॉल्डस यांनी 1931 साली काढलेले. चर्चिल आणि महात्माजी ही जोडी विनोदाला असंख्य विषय पुरवणारी. गांधीजींच्या विनोदाची एक तऱ्हा तर चर्चिल त्यांच्या फटकळपणासाठी आणि हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध. दोघेही अगदी भिन्न प्रकृती. त्यामुळेच त्यांच्या वेषांतराची कल्पना रेनॉल्डस याला सुचली असावी. त्याच्या या चित्रातील तपशील स्पष्ट आहेत. उदाहरणार्थ, चर्चिलच्या डोळ्यांतील भावते कसे फसल्याचे आणि रूसल्याचे आहेत.

गांधीजींचा चेहरा हा वेगळा होता. त्यांचे कान मोठे होते. डोके गोल, वाटोळे होते, पण ते कपाळापर्यंत होते. त्यांचा खालचा ओठ मोठा आणि बाहेर येणारा होता. त्यांच्या चेहऱ्यावर जाडी अजिबात नव्हती, पण ते हडकुळे नव्हते की त्यांचे गाल बसलेले नव्हते. थोडक्यात सांगायचे तर त्यांचा चेहरा काढणे, त्यांचे चित्र, अर्कचित्र काढणे हे चित्रकार-व्यंगचित्रकार यांना आव्हान होते. भले भले चित्रकार गांधीजींचा चेहरा काढताना तोंडघशी पडले आहेत. मी आतापर्यंत पाहिलेल्या गांधीजींच्या अर्कचित्रांतील अत्यंत प्रभावी आणि वास्तव चित्रण वाटणारे अर्कचित्र डेव्हिड लेव्हाइन यांचे आहे. ते इतके प्रभावी आहे, की त्यावर वेगळे भाष्य देण्याची गरज नाही.

सुरेश लोटलीकर  99200 89488 lotlikars@gmail.com

(सकाळ, सप्तरंग रविवार पुरवणी 1 ऑक्टोबर 2006 सीमारेषेपार या सदरावरून उद्धृत, संपादित-संस्कारित )

———————————————————————————————————————

About Post Author

2 COMMENTS

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here