थिंक महाराष्ट्र डॉट कॉम आणि कोकण मराठी साहित्य परिषद

अण्णा शिरगावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दापोली तालुक्यासाठी लेख, व्हिडिओ, फोटो यांची आगळीवेगळी स्पर्धा

निबंध स्पर्धा

लेख सोशल मीडिया तसेच छापील माध्यमांमध्ये प्रकाशित झालेला नसावा.
विषयानुरूप छायाचित्रे असलेल्या लेखांना परीक्षणात प्राधान्य देण्यात येर्इल.

  • पहिले पारितोषिक : 2000/- रुपये
  • दुसरे पारितोषिक  : 1500/- रुपये
  • तिसरे पारितोषिक : 1000/- रुपये

(पारितोषिक प्राप्त लेख ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलवर प्रकाशित होतील)

व्हिडिओ स्पर्धा

व्हिडिओ सोशल मीडिया तसेच अन्य कोठेही प्रसारित झालेला नसावा.

  • पहिले पारितोषिक : 3000/- रुपये
  • दुसरे पारितोषिक  : 2000/- रुपये
  • तिसरे पारितोषिक : 1000/- रुपये

(पारितोषिक प्राप्त व्हिडिओ ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलवर प्रकाशित होतील.)

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबतचा फॉर्म भरणे आवश्यक आहे.

लेख लिहिताना लक्षात घेण्याचे मुद्दे

या स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त व निवडक लेख ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रकाशित होणार आहेत. म्हणजेच ते मोबाईल किंवा संगणकावर वाचले जातील. पुस्तक/मासिक/वृत्तपत्रात प्रकाशित होणारा मजकूर व ‘थिंक महाराष्ट्र’वर प्रकाशित होणारा मजकूर यांच्या लेखनशैलीत काही गोष्टी वेगळ्या असतात.

  • इंटरनेट माध्यमातील वाचन हे छापील मजकुराच्या तुलनेत घाईघाईने व अधिक वेगाने होते. त्यामुळे वाक्ये छोटी छोटी असावीत.
  • वाक्यरचना सरळ सोपी, कर्ता-कर्म-क्रियापद या क्रमाची कम्युनिकेटिव्ह असावी.
  • लेखातील मजकूर प्रमाण भाषेत असावा, पण स्थानिक बोलींमधील शब्द त्याच्या वैशिष्ट्यामुळे वापरल्यास त्याचा अर्थही उलगडून सांगावा.
  • लेखन ललित म्हणजे मनोवेधक असावे, मात्र लालित्यपूर्ण शब्द, उपमा यांचा सोस नसावा. लेखनातील तपशील भरपूर व बिनचूक, दोनदा तपासून लिहिलेले हवेत, त्यांची मांडणी संगतवार व वेधक हवी. वाचताना वाचकाच्या सवयी वेगवेगळ्या असतात असे ध्यानी आले आहे. त्यानुसार लेखन पद्धतीचा विचार करावा.

स्पर्धेत लेख लिहिण्यासाठी गाव, व्यक्ती, संस्था, संस्कृतिसंचित असा ऐसपैस विषयसमूह देण्यात आला आहे. त्यांतील कोणताही विषय निवडल्यास त्या बाबतच्या लेखनात कोणते मुद्दे असावेत याबद्दलचे टिपण –

. निबंध स्पर्धा :

विषय : माझे गाव (गावगाथा)

दापोली तालुक्यातील कोणतेही गाव, गावातील वैशिष्ट्यपूर्ण असे देवस्थान – उत्सव – प्रथा-परंपरा – यात्रा-जत्रा – गावातील कर्तबगार व्यक्ती – घराणी वा उपक्रमशील संस्था अशा कोणत्याही विषयावर बाराशे-पंधराशे शब्दांत लेख लिहून पाठवणे अपेक्षित आहे.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी थिंक महाराष्ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलवर नावनोंदणी कर.

लेखस्पर्धेत पहिल्या क्रमांकाच्या लेखास 2000 रुपये दुसऱ्या क्रमांकाच्या लेखास 1500 रुपये व तिसऱ्या क्रमांकाच्या लेखास 1000 रुपये बक्षीस असणार आहे. उत्तेजनार्थ पाच बक्षिसे प्रत्येकी पाचशे रुपये.

गावाची माहिती लिहिताना पुढील मुद्दे लेखात समाविष्ट करता येतील –

गावाचा तालुका आणि जिल्हा कोणता? गावाच्या नावाच्या उत्पत्तीची दंतकथा आहे का? गावात कोणकोणती मंदिरे आहेत? ग्रामदैवताचे नाव काय? त्याची माहिती. ग्रामदैवताच्या नावाने जत्रा किंवा यात्रा आहे का? ती कशी आयोजित-साजरी केली जाते? गावाचा इतिहास, स्थानिक कला आणि उत्सव, गावात वा गावाजवळ असलेली लेणी-किल्ले किंवा इतर ऐतिहासिक-पुरातन वास्तू, शिलालेख, तेथील आठवडी बाजार, गावात बनवला जाणारा वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ, सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, गावात असलेल्या किंवा होऊन गेलेल्या उल्लेखनीय व्यक्ती, गावातील संस्था किंवा उपक्रम, गावाची लोकसंख्या, गावातील लोकांची भाषा-बोलीभाषा, गावातील नदी-तलाव, पावसाचे प्रमाण, शिक्षणाची सोय, पाणी आणि पिके यांची स्थिती, हवामान, पर्यटन स्थळ, गावातील इतर व्यवसाय, गावापर्यंत पोचण्याची वाहतूक व्यवस्था व मार्ग, चार-पाच किलोमीटर परिसरातील काही गावांची नावे, तसेच, गावाची इतर वैशिष्ट्ये! सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तेथील माणसे – त्या माणसांच्या हकिगती, त्यांची कर्तबगारी. गावचा नकाशा आणि भरपूर फोटो… (लेख कल्पनारम्य नसावा. वस्तुस्थिती असावी. सत्यासत्यता तपासली जाईल. ती ललित भाषेत वर्णन केल्यास विशेष पसंती.)

ब. व्हिडिओ स्पर्धा :

विषय : दापोलीतील गावांची माहिती, कर्तबगार व्यक्ती वा उपक्रमशील संस्था, ऐतिहासिक ठिकाणे, देवस्थान, मंदिरे, सण-उत्सव, यात्रा-जत्रा, प्रथा-परंपरा, स्थानिक सांस्कृतिक जीवन, निसर्गवैभव अशा कोणत्याही विषयावर तीन ते चार मिनिटे कालावधीचा व्हिडिओ तयार करणे.

व्हिडिओ स्पर्धेत पहिल्या क्रमांकाच्या व्हिडिओ3000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या व्हिडिओ2000 रुपये व तिसऱ्या क्रमांकाच्या व्हिडिओ1000 रुपये बक्षीस असणार आहे.

याशिवाय, स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकास विशेष पारितोषिक मिळू शकणार आहे. आयोजकांनी सुचवलेल्या सुधारणा व वाढीव तपशील यांसह लेख वा व्हिडिओ पाठवल्यास संपादकांच्या सुचनेनुसार तो ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या पोर्टलवर स्पर्धकाच्या छायाचित्र-अल्पपरिचयासह प्रसिद्ध करण्यात येईल व त्यासाठी मानधन मिळेल.

क.  फोटोग्राफी स्पर्धा : (किमान दहा फोटो)

विषय : दापोलीतील ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे, सण-उत्सव, यात्रा-जत्रा, प्रथा-परंपरा, स्थानिक सांस्कृतिक वैशिष्ट्ये टिपणारे फोटो आणि त्याबाबतची थोडक्यात माहिती असे असावेत.

फोटोग्राफी स्पर्धेत अनुक्रमे 2000, 1500 व 1000 रुपये बक्षीस असणार आहे.

– या स्पर्धांत भाग घेण्यासाठी वयाची अट नाही. स्पर्धकांनी त्यांचे साहित्य 20 डिसेंबरपर्यंत पाठवावे.

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या तालुकावार माहिती संकलन मोहिमेस ‘परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन’चे सहकार्य लाभले आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क – अश्विनी भोईर 8830864547, नितेश शिंदे 9892611767

इमेल – info@thinkmaharashtra.com

वेबसाईट – www.thinkmaharashtra.com

—————————————————————————————–

व्यक्ती –

व्यक्तीचे पूर्ण नाव, वय, शिक्षण, छंद, आवड-निवड असे तपशील – त्यांचे कार्यक्षेत्र कोणते (शेती, शिक्षण, उद्योग, सामाजिक, कला इत्यादी) आहे?- कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे?, या पार्श्वभूमीचा कामासंदर्भात फायदातोटा झाला असल्यास तपशील, आयुष्यातील काही ठळक अनुभव, त्यांच्यावर एखाद्या व्यक्ती किंवा विचारसरणीचा प्रभाव असल्यास त्याविषयी मजकूर, त्यांनी साध्य केलेली विशेष गोष्ट, त्यांना मिळालेले सन्मान, अन्य काही उल्लेखनीय पैलू अथवा संकल्प, कुटुंब जीवन … अशा मुद्द्यांचा समावेश असलेला त्या व्यक्तीच्या कर्तबगारीची संपूर्णतेकडे जाणारी नोंद घेणारा लेख असावा. लेखन आस्थेने केलेले असले तरी व्यक्तिगत ओळखीने/जिव्हाळ्याने केलेले नसावे. त्यामुळे ताई/माई-अप्पा-भाऊ-दादा असे उल्लेख टाळावे.

संस्था –

संस्थेचे नाव, शिक्षण, समाजकार्य, उद्योग अशा कोणत्या कार्यक्षेत्रात काम चालते?, स्थापना कधी व कशी झाली? संस्थापक कोण? संस्थेचे उद्दिष्ट? कोणते प्रमुख उपक्रम झाले व सुरू आहेत? संस्थेच्या कामाचा गावावर तसेच समाजावर झालेला परिणाम? पुढील संकल्पित उपक्रम? संस्थेपुढील आव्हाने?, संस्थेला वा प्रमुख कार्यकर्त्यांना या कामासाठी काही पुरस्कार-सन्मान मिळाले आहेत का? संस्थेच्या वाटचालीतील काही लक्षणीय अनुभव…. अशा मुद्द्यांचा लेखात समावेश असावा.

संस्कृतिसंचित –

यामध्ये खूपच वैविध्य असलेले विषय असू शकतात. त्यामुळे त्याविषयी मुद्दे लिहिण्याच्या सोयीसाठी चार उपविभाग केले आहेत.

. वास्तू –

वास्तूचे स्वरूप, धार्मिक (मंदिर-मठ-मशीद-समाधी इत्यादी), प्रसिद्ध व्यक्तीचे निवासस्थान, ऐतिहासिक म्हणजे वाडा-गढी-लेणे असे कोणत्या प्रकारचे आहे?  भौगोलिक स्थान कोठे आहे? वास्तू कोणी व कधी बांधली? वास्तूचे महत्त्व काय? रचना व शैली कशी आहे? वास्तूचा उपयोग कशासाठी होता व आहे? संबंधित उल्लेखनीय व्यक्ती, घडलेल्या ठळक घटना… असे मुद्दे असलेला लेख असावा.

. प्रथा-परंपरा, सण-उत्सव, यात्रा-जत्रा –

कोणत्या धर्म/पंथ/समाजाशी संबंधित आहे? कालावधी कोणता असतो? काय निमित्ताने आयोजन होते? सुरुवात कशी झाली? साजरा करण्याची रीत? यात असलेले स्थानिक वेगळेपण कोणते? इ. तपशील असावेत.

. कला/ क्रीडा –

याचे स्वरूप व्यक्तिगत / सामूहिक कसे आहे? सादरीकरणाचे तपशील काय आहेत? वेगळेपण वा वैशिष्ट्ये कोणती आहेत? त्यातील प्रसिद्ध कलाकार/खेळाडू कोणते? संबंधित किस्से अशी माहिती असावी.

. खाद्यसंस्कृती –

इतर ठिकाणांपेक्षा स्थानिक खाद्यपदार्थाचे वेगळेपण, पदार्थ कसा केला जातो? काय निमित्ताने केला जातो? स्थानिक घटक? ठरावीक काळात होतो का?  घरगुती आहे की व्यावसायिक प्रकारे विक्री होते? करणाऱ्याविषयी काही किस्से – माहिती… असे मुद्दे असावेत.