अक्षय तृतीया – साडेतीन मुहूर्तातील पूर्ण मुहूर्त
वैशाख शुध्द तृतीया ही तिथी अक्षय तृतीया या नावाने ओळखली व साजरी केली जाते. तो हिंदू धर्माच्या धारणेनुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. अक्षय या शब्दाचा अर्थ क्षय न पावणारे, म्हणजे नाश न होणारे असा आहे...
शिदोबाचे नायगाव (Naigaon of Shidoba)
शिदोबाचे नायगाव पुणे शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. ते पुरंदर तालुक्यात आहे. ते सासवड-सुपा रोडवर म्हणजेच शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीतील गाव. गावाचे पाठीराखे...
रांगोळी – पारंपरिक संस्कृती
‘रांगोळी’ शब्दाची उत्पत्ती संस्कृत शब्द ‘रंगावली’वरून झाली आहे. तो मूळ शब्द ‘रंग’ आणि ‘आवली’ अर्थात पंक्ती यांच्यापासून बनला आहे; त्याचाच अर्थ रंगांची पंक्ती म्हणजे...
आठवणीतला खानदेशी पोळा
जळगावाच्या भडगाव तालुक्यातील कोळगाव हे माझे गाव. त्या गावी श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच गावच्या दरवाज्यात एक लाकूड आणून टाकले जाई. ती प्रथा कालांतराने बंद पडली. पूर्वीच्या मानानं बैलांची संख्या खूप कमी झाली आहे. पण पोळा हा सण आला की त्या आठवणी आपोआपच नजरेच्या समोर येतात...
वसुबारस (Vasubaras)
वसुबारस (गोवत्सद्वादशी) हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे...
खानदेशचा पोळा
खानदेशात ‘पोळा’ हा सण श्रावणी अमावस्येला बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. पोळ्याच्या दोन दिवस आधी बैलांच्या खांद्यांना तेल, तूप लावून मळले जाते....
दिवाळी अंक आणि आपण
दिवाळी दरवर्षी आली, की मराठी लोकांना तीन गोष्टी हमखास आठवतात - दिवाळी फराळ, फटाके आणि दिवाळी अंक ! फराळाचा अनुस्युत भाग असतो अभ्यंगस्नानाचा. टीव्हीवरील...
टिप्परघाई – वडांगळी गावचा शिमगा
शिमग्याचे ‘कवित्व’ महाराष्ट्राला नवे नाही. मात्र सिन्नर तालुक्यातील वडांगळी या माझ्या गावात शिमगा साजरा केला जातो, तोच मुळी कवने गाऊन, टिप्परघाई खेळून. तेथे टिप्परघाई...
माहुरगडची रेणुकादेवी (Renukadevi)
नांदेडपासून एकशेतीस किलोमीटरवरील मातापूर (माहुरगड) हे रेणुकामातेचे स्थान आहे. नांदेड मराठवाड्यात येते. त्याचा महिमा रेणुका महात्म्यातून गायिला गेला आहे. रेणुका हीच एकवीरा अदिती आहे....
तुळजापुरची तुळजाभवानी (Tuljabhawani)
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेली, छत्रपती शिवाजी राजांना ‘भवानी’ तलवार प्रदान करणारी, त्यांची प्रेरणाशक्ती, तुळजापूरची ‘तुळजाभवानी’ अनेकांची आराध्य दैवत आहे. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत धावणारी ती...