Home किस्से... किस्से... सद्भावनेचे व्यासपीठ

सद्भावनेचे व्यासपीठ

एकूण जीवनाला आलेला बकालपणा, ढासळती मूल्यव्यवस्था, वाढता विद्वेष आणि त्यातून सध्या होत असलेली हिंसा, दुरावत चाललेली नाती, हरवत चाललेला माणुसकीचा गहिवर… प्रत्येक संवेदनशील मन अस्वस्थ आहे. संशय, अविश्वास यांमुळे मानवी संबंध तुटक, त्रयस्थ होऊन गेले आहेत. सारा सभोवताल नकारात्मक वातावरणाने भरून गेला आहे आणि त्यात मीडिया पिसाट आनंद लुटत आहे. भौतिक समृद्धी आहे. परंतु निर्भेळ, निर्मळ, निरामय असे काही जाणवतच नाही. खरेच, सगळे जग अप्पलपोटे, स्वार्थी बनले आहे का?

नाही. थोडे समाजात, समुदायात मिसळलात तर माणसे माणसांशी चांगुलपणाने वागताना दिसतील; छोटी माणसे मोठी कामे उभी करत असल्याचे पाहण्यास मिळेल. खरे असे आहे, की आजही माणसे इतरांच्या भल्यासाठी धडपडत आहेत. समाजातील भलेपणा जपू पाहत आहेत. अशा व्यक्ती समाजात दहा टक्केच असतात, परंतु त्यांचा प्रभाव एकूण समाजावर भासतो तेव्हा एकूण समाजाच्या सद्भावनेची शक्ती जाणवते, त्याच समाजशक्तीचा प्रत्यय घेण्यासाठी ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ आहे. येथे जे जे चांगले आहे ते ते नोंदले जाईल.

तुमच्या आढळात निःस्वार्थी भावनेतून राबवल्या जाणाऱ्या व्यक्तिगत वा संस्थात्मक उपक्रमांची माहिती असेल तर ती शब्दबद्ध करून अथवा फोटो-ऑडिओ-व्हिडिओ करून सर्व संपर्कांसहित ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलच्या इमेल आयडीवर पाठवावी. अर्थात, चांगुलपणाच्या कृतीमागे तितकाच समर्थ चांगला विचार व चांगली भावना असते. असे विचार व भाव यांनाही ‘सद्भावनेच्या व्यासपीठ’वर स्थान असेल.

उपक्रम सूत्रधार : अपर्णा महाजन

ईमेल आयडी : info@thinkmaharashtra.com, 9892611767

——————————————————————————————–

वस्तीमधील उमलणारी फुले

स्त्री मुक्ती संघटनेचे काम ज्या वस्त्यांमधून चालते त्या वस्त्यांमध्ये यावर्षी नाट्याविष्कारचा कार्यक्रम बालदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. ज्यात मुलांचा व्यक्तिमत्व विकास, त्यांच्यातील सुप्त गुणांन वाव देणे हे उद्दिष्ट ठेवले होते. त्याचे माध्यम नाटक हे होते. नाटक मुलांना फुलण्याकरता, आत्मभान जागवण्याकरता, आत्मविश्वास निर्माण करण्याकरता चांगले माध्यम ठरले. त्यातून कार्यक्रमाअंती काही मुलांचे नेतृत्वगुण लक्षात आले...
_avinash_barve

अविनाश बर्वे यांचा मैत्रभाव

अविनाश बर्वेसरांना प्रवास हा तर आवडीचा. तोही फक्त रेल्वे किंवा लाल बसगाडी (एसटी) यांचा. कारण आता तर त्याला निम्मे तिकिट पडते, त्यांनी वयाचा अमृतमहोत्सव...
_sandip_rane

डॉ. संदीप राणे यांचे पत्निव्रत

1
मुंबईच्या चेंबूरमधील पेस्तम सागर भागात राहणारे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संदीप राणे यांच्या पत्निव्रताची ही हकिगत. मी स्वत: डॉक्टरांकडे जाऊन उत्सुकतेने ती ऐकली आणि त्यांच्या चंदनी...
_dosti_ka_paigam

‘दोस्ती का पैगाम’

माझा माणसाच्या उपजत चांगुलपणावर विश्वास आहे. प्रत्येक माणूस हा चांगला असतो किंवा चांगला असण्याचा प्रयत्न कायम करत असतो. अगदी लहान मुलेसुद्धा त्यांना ‘गुड बॉय’...
_new_coloum_changulpana_think_maharashtra.com

चांगुलपणा (Goodness)

0
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चा जन्मच महाराष्ट्र समाजातील चांगुलपणा व्यक्त व्हावा म्हणून झालेला आहे. त्या चांगुलपणाचे परमोच्च टोक म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभा. म्हणून ‘थिंक महाराष्ट्र...