कला

महाराष्‍ट्रातील कलात्‍मक प्रतिभा, त्‍याचा इतिहास आणि वर्तमान!

वीतभर कपडा टीचभर पोट – वास्तव, झाडीपट्टी रंगभूमीचे ! (Experiences of Zadipatti stage by...

‘झाडीपट्टी रंगभूमी’ नावाची एक अनोखी रंगभूमी आहे असे ऐकले होते- वाचलेही होते. त्यामुळे उत्सुकता होती, की ती रंगभूमी कशी आहे ते बघावे. कारण प्रायोगिक रंगभूमी, हौशी रंगभूमी, समांतर रंगभूमी, बाल रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी हे प्रकार मला माहीत होते.

सांगलीचे सायकलिंग जगाशी जोडलेले! (Bicycle is trending in Sangali)

सायकल हा नवा ट्रेंड समाजामध्ये तंदुरुस्तीसाठी म्हणून रुजत, वाढत आहे. सायकलस्वारी (सायकलिंग) हा खेळ, छंद, हौस म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. सायकल हे वाहन अनेक वाहनांच्या गलबल्यात स्थानिक प्रवास, छोट्या जा-ये करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरत असल्याची जाणीव पुन्हा जनमनावर ठसत आहे...

डॉ. मेधा गुप्ते-प्रधान – ‘चंदाराणी’ची चैतन्यदायी चरित्रकथा (Medha Gupte-Pradhan – Marathi Child Artist to...

‘नाच रे मोरा...’ हे मराठी चित्रपटातील प्रसिद्ध बालगीत आहे. राम गबाले दिग्दर्शित; पु.ल. देशपांडे यांची पटकथा, संवाद व संगीत; आणि ग.दि. माडगूळकर यांची गीते असलेला देवबाप्पा (1953) हा चित्रपट आणि त्या चित्रपटातील आशा भोसले यांच्या मधाळ आवाजातील ते अमर लोकप्रिय गाणे !

अमेरिकेतील मराठी शाळांचे प्रेरणास्थान – सुनंदा टुमणे (Coordinator of Marathi schools in America –...

मराठी शाळा मराठी भाषा शिकण्यासाठी अमेरिकेत ठिकठिकाणी सुरू झाल्या आहेत आणि त्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या छत्राखाली काही विशिष्ट नियमांनुसार सुरू आहेत. पण त्या शाळा नेमक्या कधी सुरू झाल्या, त्यांचा अभ्यासक्रम कसा ठरला? मराठी भाषेला अमेरिकेच्या शालेय शिक्षणात स्थान काय आहे?

झाडीपट्टी रंगभूमीचा रंगमंच – प्रेक्षकांचे कुतूहल (Jhadipatti Drama stage: Unique development)

झाडीपट्टी नाटकांचे स्टेज (रंगमंच) हा विषय कायम कुतूहलाचा राहिलेला आहे. किंबहुना झाडीपट्टीत खुद्द नाटक, त्यातील नटनट्या हे जसे आकर्षणाचे व चर्चेचे विषय असतात, त्याप्रमाणे रंगमंच – त्याची व्यवस्था - त्यावरील पडदे – त्यानुसार पात्रांच्या हालचाली हादेखील प्रेक्षकांच्या कुजबुजीचा विषय असतो.

वडसा (देसाईगंज) – द झाडीवूड! (WADSA – The Jhadistage)

गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) हे शहर अलिकडे ‘झाडीवूड’ म्हणून नावारूपास येत आहे. मुंबईला जसे ‘बॉलिवूड’, तसे विदर्भाच्या झाडीपट्टीतील वडसा हे ‘झाडीवूड’. बॉलिवूड हिंदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे, तर झाडीवूड मात्र नाटकांसाठी.

अनिल नाकतोडे – झाडीवूडचा खलनायक (The Villain of the Jhadistage)

झाडीबोलीच्या नाट्यकलेचा पिढीजात वारसा जपणारा उदापूरच्या मातीतील अवलिया म्हणजे अनिल नाकतोडे. त्यांचे वडील दाजीबा नाकतोडे हेही गावात होणाऱ्या नाटकांतून भूमिका साकारायचे.

रायरंद आणि बहुरूपी यांची सोंगे (Folk Art of Rairand And Bahuroopi)

रायरंद किंवा बहुरूपी म्हणजे अनेक रूपे घेऊन लोकांचे मनोरंजन करणारा लोककलावंत. रायरंद, रायरंद्र, रार्इंदर हे शब्द मराठी भाषेतील रायविनोदी म्हणजे विदूषक, बहुरूपी, खुशमस्कऱ्या या अर्थाने वापरले जातात...

राधारमण कीर्तने – अमेरिकेतील संगीत गुरू (Radharaman Kirtane – Music Teacher In US)

2
आम्ही एक सांगीतिक कार्यक्रम घेऊन फ्लोरिडामधील मराठी मंडळ टॅम्पा बे येथे गेलो होतो. तेथे स्थानिक गायिकेचा शोध घेतला असता पं. जसराज स्कूलची विद्यार्थिनी, जान्हवी केंडे हिचा संपर्क मिळाला. जान्हवीने आम्हाला कार्यक्रमात उत्तम साथ दिली. कार्यक्रमानंतर, तिने तिच्या गुरुजींची ओळख करून दिली. ते होते राधारमण कीर्तने. ते जसराज यांचे शिष्य.

सुरेश लोटलीकर याची अर्कचित्रे (Caricaturist Suresh Lotlikar)

3
सुरेश लोटलीकर हा हौशी व्यंगचित्रकार आहे. त्याचे विचार प्रगल्भ असतात आणि टिप्पणी मार्मिक. त्यामुळे तो अचूक वर्म पकडून व्यक्तीचे वा घटनेचे मर्म सूक्ष्मतेने चितारून टाकतो. त्या दृष्टीने त्याची राजकीय व्यंगचित्रे व अर्कचित्रे पाहण्यासारखी आहेत.