Home Authors Posts by विठ्ठल वाघ

विठ्ठल वाघ

1 POSTS 0 COMMENTS
विठ्ठल भिकाजी वाघ हे अकोला येथे जन्मलेले कवी आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी सातासमुद्रापार जाऊन त्यांच्या कविता सादर केल्या आहेत. त्यांनी संत गाडगेमहाराजांच्या जीवनावर कादंबरी लिहिली आहे. त्यांनी ‘गोट्या’ या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेसाठी पटकथा आणि संवाद लिहिले होते. त्यांनी इयत्ता पहिली ते सातवीच्या बालभारती पुस्तकांच्या संपादनात महत्त्वाचे योगदान दिले आहे. ते विदर्भ साहित्य संमेलनाचे, तसेच कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते अकोल्यातील ’शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’तून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.

डेबूचा गाडगेबाबा होताना (gadgebaba-his-journey-from-childhood-to-sainthood)

0
डेबूच्या मनात व्यसनांच्या विरुद्ध चीड, संताप दगडावरील रेघेसारखा कोरला गेला आहे. त्यामुळेच डेबू गाडगेबाबा होऊन लोकांपुढे उभा राहतो. दुर्व्यसनांवर, अनिष्ट चालीरीती, रूढी-परंपरांवर टीका आणि कडाडून प्रहार करतो. म्हणून तो संतांसारखा केवळ टाळकुट्या न ठरता मोठा समाजसुधारक, मूर्तिभंजक, विज्ञाननिष्ठ विचारवंत म्हणून नावाजला जातो...