Home Authors Posts by विनायक बाळ

विनायक बाळ

1 POSTS 0 COMMENTS
विनायक नारायण बाळ हे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. ते रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून बत्तीस वर्षे कार्यरत होते. विनायक बाळ यांचा ‘कथाकुंभ’ नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्या काव्यसंग्रहाला ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचे शिक्षणविषयक लेख ‘जीवन शिक्षण’ या मासिकातून प्रसिद्ध होत असतात. तसेच, ते विविध विषयांवर वृत्तपत्रे, मासिके यांतून लेखन करतात. विनायक बाळ हे आकाशवाणीवर मुलांसाठी कथा, कार्यक्रमांचे लेखन आणि सादरीकरण करतात. ते दापोलीतील मुरूड येथे वास्तव्यास आहेत.

मुखवट्यातून उभ्या केलेल्या चार देवींची यात्रा

मुरूड, आंजर्ले व वेळास ही गावे दुर्गादेवीच्या, तर केळशी महालक्ष्मीच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. ती चारही गावे तीनशे वर्षांपासून या यात्रांनी एकमेकांशी जोडली गेली आहेत. यात्रांच्या शेवटच्या दिवशी रथयात्रा निघते, त्या दरम्यान प्रत्येक जातीजमातीतील एका ज्येष्ठ व्यक्तीला मानाचा विडा देऊन सन्मानित करण्याची रीत आहे. विनायक बाळ यांनी दापोली तालुक्यातील या चार गावांत मुखवट्यातून उभ्या करण्यात येणाऱ्या चार देवींच्या यात्रांचे वेगळेपण या लेखातून मांडले आहे...