Home Authors Posts by विलास पंढरी

विलास पंढरी

8 POSTS 1 COMMENTS
विलास पंढरी हे राष्ट्रीयीकृत बँकेत चीफ मॅनेजर होते. त्यांनी निवृत्तीनंतर विविध वर्तमानपत्रांत लेखन केले आहे. त्यांचे ‘कथा कोरोनाची, व्यथा मानवाची’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांनी लिहिलेल्या आर्थिक विषयावरील लेखाला पां.वा. गाडगीळ यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार मिळाला आहे. ते वास्तव्यास पुणे येथे असतात.

सोळा संस्कार विधी (Hindu Code of Sixteen Rituals for Human Life)

संस्कार हे भारतीय संस्कृतीतील आचारधर्माचे वैशिष्ट्य मानले जाते. आचारधर्म म्हणजे आचरणाचे, वर्तनाचे, वागण्या-बोलण्याचे नीतिनियम. सोळा संस्कार हे मानवी आयुष्याशी आणि माणसाने जपावयाच्या मूल्यांशी निगडित आहेत. गर्भधारणेपासून ते अंतेष्टीपर्यंत म्हणजे मृत्यूवेळेपर्यंत व्यक्तीवर आईवडील, गुरू आणि पुरोहित यांच्याकडून विधी केले जावे असे गृहित आहे. त्यांना संस्कार असे म्हटले जाते...

अधिक व निज श्रावण मास !

अधिकमास कसा आणि का येतो? हिंदू पंचांग गणना चांद्र महिन्यानुसार होते. चांद्र महिना एकोणतीस दिवसांचा असतो. इंग्रजी कॅलेंडर आणि भारतीय ऋतुचक्र हे मात्र सौर महिन्याशी जोडलेले आहे. सौर महिना तीस/एकतीस दिवसांचा असतो. यामुळे प्रतिवर्षी चांद्र आणि सौर या दोन पद्धतींमधील वर्षाच्या एकूण दिवसांमध्ये तेरा ते चौदा दिवसांचा फरक पडतो. तो फरक भरून काढण्यासाठी हिंदू पंचांगामध्ये दर तीन वर्षांनी अधिकमासाची योजना करण्यात आली आहे...

महाराष्ट्र भूषण धर्माधिकारी पितापुत्र

प्रसिद्ध निरूपणकार आप्पा धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला. देशपातळीवर जसा ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तसाच राज्य पातळीवर महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आहे. धर्माधिकारी कुटुंबीयांचे प्रेरक आणि समाजोपयोगी कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्याच कुटुंबासाठी पित्यापाठी पुत्राला असा हा दुसऱ्यांदा पुरस्कार दिला आहे...

शिवाजी, रामदास आणि गणेशोत्सव

3
संतकवी रामदास स्वामी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना एकमेकांबद्दल आदर होता. लोकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे, संस्कृती रुजावी यासाठी शिवाजी राजे आणि रामदास स्वामी या दोघांनी मिळून गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध चार ते माघ शुद्ध पाच म्हणजे गणेश जयंतीपर्यंत, पाच महिने 1675 साली साजरा केला...

इंदापूरातील खाजगी मालकीची मंदिरे (Private Temples in Indapur)

इंदापूरचे वैशिष्ट्य म्हणजे पुण्याप्रमाणेच अनेक ब्राह्मण कुटुंबीयांची स्वतःची खाजगी मंदिरे तेथे आहेत.व्यंकटेशाचे मंदिर इंदापूरमधील सर्वात पुरातन आणि श्रीमंत मंदिर असावे...

गीताबाईंचा (पंढरी) मळा (Indapur’s Pandhari Family & Women’s Position)

पुणे जिल्ह्यातील इंदापूर गाव इतर भागांच्या मानाने दोनशे वर्षांपूर्वी खूपच सुधारलेले होते. तेव्हा पंढरी कुटुंबीयांचे अनेक वाडे गावात होते.स्त्रियांनासुद्धा कुटुंबात कसे महत्त्वपूर्ण स्थान होते याचे उदाहरण म्हणजे गीताबाईचा मळा!...

शिराळशेट (Shiral Sheth – Fictious Character Becomes Part of Folk Festival)

श्रीयाळ शेठ नावाचा अपभ्रंश शिराळ शेट, सक्रोबा, शंकरोबा असा महाराष्ट्राच्या विविध भागांत वेगवेगळा झालेला आढळतो. त्याला औट घटकेचा राजा असेही म्हटले जाते...

इंदापूर – इतिहासातच राहिलेले शहर (Indapur Still Lives in History)

इंदापूर हे प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचे जन्मगाव. ते ऐतिहासिक महत्त्व असलेले पुणे जिल्ह्यातील सुंदर शहर. बालुशाहीसारखा दिसणारा खाजा, तिखटामध्ये केवळ वासाने भूक लागल्याची जाणीव करून देणारी पुरी भाजी आणि उजनी धरणाच्या गोड्या पाण्यातील मासे हे या शहराचे आकर्षण...