Home Authors Posts by विजयालक्ष्मी विजय देवगोजी

विजयालक्ष्मी विजय देवगोजी

1 POSTS 0 COMMENTS
विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांनी उच्चशिक्षण घेतले आहे. त्यांनी लांजा येथे बत्तीस वर्षे लॅबोरेटरी चालवली. त्यांचा ‘मराठी साहित्यातील वडार समाजजीवनाचे चित्रण’ या विषयावर बेळगावमधील राणी चन्नम्मा विद्यापीठात पीएच डी चा अभ्यास सुरू आहे. त्यांची ‘अजि म्या परदेस पाहिला’ हे प्रवासवर्णनपर व ‘अशी घडली राजस्विनी’ ही दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्या दिवाळी अंकांतून लेखन करतात. त्यांच्या बेळगावी बोलीभाषेत पाच कथा व बारा शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

वडार बोलीभाषा (Wadar Dialect)

वडार बोली ही तेलगूमिश्रित आहे. वडार लोक भटकंती करतात, त्यामुळे प्रादेशिकतेचे रंगगंध त्या भाषेला लाभले आहेत. तिला स्वतंत्र लिपी नाही, ती जिवंत मौखिक स्वरूपात आहे. तिचा व्यवहारात सांकेतिक भाषा म्हणूनही वापर होताना दिसतो...