Home Authors Posts by उमेश घेवरीकर

उमेश घेवरीकर

1 POSTS 0 COMMENTS
उमेश घेवरीकर हे उपक्रमशील शिक्षक म्हणून प्रसिद्ध असून, ते बाळासाहेब भारदे हायस्कूल, शेवगाव येथे कार्यरत आहेत. त्यांनी बी एस्सी बी एड पर्यंत शिक्षण घेतले. ते लेखक, अभिनेते, दिग्दर्शक, सूत्र संचालक आणि लघुपट निर्माते आहेत. त्यांनी ‘बाबू बँड बाजा’ आणि ‘पुरुषोत्तम’ या मराठी चित्रपटांत भूमिका साकारली. घेवरीकर यांच्या ‘द विनर’, ‘वन लाईन स्टोरी’, ‘व्होट फॉर इंडिया’ या लघुपटांना राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. उमेश घेवरीकर यांची विजेता (बालकुमार कथा) व हृदयस्थ (कवितासंग्रह) ही पुस्तके प्रकाशित आहेत.

फकिराच्या निर्मितीमागील शेतकरी हात!

प्रतिभावंत लेखक, शाहीर आणि समाजसुधारक अवलिया म्हणजे अण्णाभाऊ साठे होत. अण्णाभाऊ यांचे स्वलिखित ‘फकिरा’ कादंबरीवर चित्रपटनिर्मिती करावी हे स्वप्न होते. अण्णाभाऊ यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथील चार-पाच शेतकरी एकत्र आले आणि स्वत:च्या जमिनी तारण ठेवून त्यांनी ‘फकिरा’ या चित्रपटाची निर्मिती केली. पण त्याचा शेवट मात्र शोकाकुल झाला...