थिंक महाराष्ट्र
इंजिनीयर विजय गोळे – ‘केल्याने प्रवास-पर्यटन मनुजा चातुर्य येतसे फार’
इंजिनीयर विजय गोळे नोकरीउद्योगाच्या निमित्ताने देशभर फिरले, पण अखेरीस स्वगावी, दापोलीला येऊन स्थिरावले. त्यांना परदेशी जायचेच नव्हते, त्यामुळे तो मुद्दा त्यांच्या जीवनात पुढे आला नाही. त्यांचे मूळ गाव हर्णे, दापोलीपासून पंधरा किलोमीटरवर. तेथे त्यांचे दोनशे वर्षांपूर्वीचे जुने घर आहे...
फलटण तालुका संस्कृती महोत्सव
‘फलटण तालुका संस्कृती महोत्सव’ नावाचा आगळावेगळा ‘इव्हेंट’ संक्रांतीचा मुहूर्त साधून सोमवारी-मंगळवारी (16-17 जानेवारी) फलटणच्या ‘महाराजा मंगल कार्यालया’त साजरा होत आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’...
सद्भावनेचे व्यासपीठ
छोटी माणसे मोठी कामे उभी करत आहेत. आजही माणसे इतरांच्या भल्यासाठी धडपडत आहेत. समाजातील भलेपणा जपू पाहत आहेत. अशा व्यक्ती समाजात दहा टक्केच असतात, परंतु त्यांचा प्रभाव एकूण समाजावर भासतो तेव्हा एकूण समाजाच्या सद्भावनेची शक्ती जाणवते, त्याच समाजशक्तीचा प्रत्यय घेण्यासाठी ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ आहे. येथे जे जे चांगले आहे ते ते नोंदले जाईल...
कासव संशोधनातील नवे युग ! (New Era of Turtle Research)
कासव संशोधनाला नवी दिशा देणारा एक प्रयोग 25 जानेवारी 2022 रोजी कोकणात करण्यात आला. तो म्हणजे कासवांनी घरटी तयार केल्यावर त्यांना उपग्रह टॅगिंग करण्याचा ! त्या दिवशी, प्रथमच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वेळास येथे प्रथमा नावाच्या कासवाला व दापोलीतील अंजर्ले येथे सावनी नावाच्या कासवाला उपग्रह टॅगिंग करण्यात आले...
उद्धृते
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'वर 'उद्धृते' नावाचे नवे सदर सादर करत आहोत. आमच्या हाती विविध मार्गांनी येणारे ज्ञानकण व भावकण वाचकांपर्यंत पोचवण्याची इच्छा असते. त्यातून अर्थातच त्यांच्या मनी वैचारिक व भावनिक आंदोलने उमटावीत व त्यांनी ती व्यक्त करावीत असेही मनात आहे...
न्यूझीलंडमध्ये मस्तानी (Mastani in New Zealand)
न्यू जर्सीचे डॉ. प्रकाश व अलका लोथे वैद्यकीय परिषदेसाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. त्यावेळी त्यांनी पुढे न्यूझीलंडचा दौरा करायचे ठरवले. त्या दौ-यात फिन्सलंड या शहरी त्यांना सरदारजीचे एक रेस्टॉरंट दिसले. स्वाभाविकच तेथे जाऊन खानपान केले. त्यावेळी रेस्टॉरंटमध्ये त्यांना जी काही पेंटिंग दिसली त्यामध्ये बाजीराव मस्तानी यांचे एक चित्र होते...
आयत्या बिळावरील जातीय संस्था !
जे वर्षानुवर्षे चालू आहे ते जातीचे मोठेपण आपण कधी घालवणार? ओबीसी, मराठा, कुणबी, धनगर, ब्राह्मण या सर्वांना त्यांच्या त्यांच्या जातींच्या पंखांखाली राहून सरकारी फायदे व राजकारणातील जागांवर डोळा ठेवणेच आवडते. त्यासाठी मोर्चे, धरणे करण्यावर त्यांचा भर जास्त असतो. निदान शिक्षणाच्या बाबतीत तरी सर्व जाती-धर्मांतील मुलांनी या व्याधीपासून दूर राहून स्पर्धात्मक परीक्षांत पुढे येण्यास पाहिजे...
कुकटोळीचा दुर्लक्षित गिरीलिंग डोंगर (Giriling Neglected mountain temple in sangli District)
गिरीलिंगचा डोंगर सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी गावाजवळ आहे. त्या डोंगरावर चढणे तसे अवघड आहे. जाण्यासाठी आता रस्ता झाला आहे, त्यावरून पायी जाता येते. डोंगरमाथ्यावर पोचल्यानंतर सात-आठ पायऱ्या चढून गेल्यावर महादेवाचे पूर्वाभिमुख मंदिर दिसते. मंदिर पुरातन आहे; मंदिरावरील शिखर मात्र पुरातन वाटत नाही.
महाराष्ट्र – भारताचे ‘चौदावे रत्न’ (Maharashtra State is Born – Atre Narrates the story)
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आचार्य अत्रे यांनी व्यक्तिश: आणि त्यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकाने व ‘दैनिक मराठा’ यांनी अतुलनीय कामगिरी केली. अत्रे यांनी ‘नवयुग’मध्ये 1 मे 1960 रोजी लिहिलेला लेख.
सांगलीचे सायकलिंग जगाशी जोडलेले! (Bicycle is trending in Sangali)
सायकल हा नवा ट्रेंड समाजामध्ये तंदुरुस्तीसाठी म्हणून रुजत, वाढत आहे. सायकलस्वारी (सायकलिंग) हा खेळ, छंद, हौस म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. सायकल हे वाहन अनेक वाहनांच्या गलबल्यात स्थानिक प्रवास, छोट्या जा-ये करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरत असल्याची जाणीव पुन्हा जनमनावर ठसत आहे.