Home Authors Posts by संध्या जोशी

संध्या जोशी

2 POSTS 0 COMMENTS
संध्या जोशी यांचे शिक्षण बी एससी, एम ए (तत्त्‍वज्ञान) असे झाले आहे. त्‍यांचे तत्त्‍वज्ञान आणि योग हे आवडीचे विषय आहेत. त्‍या जेरुसलेम येथे भरलेल्या ‘जागतिक मराठी परिषदे’मध्‍ये 1996 साली कार्यकर्त्या म्हणून सहभागी झाल्‍या होत्‍या. त्‍यांनी लिहिलेली ‘इस्रायलची मराठी लेकरे’ आणि ‘अग्निपूजक पारसी’ ही पुस्‍तके प्रसिद्ध आहेत. संध्या जोशी या विविध वृत्तपत्रांतून व अन्यत्र स्फूट लेखन करत असतात. त्यांचे व्हॉट्स अॅपवर ऑडियो ग्रूप आहेत. त्यावर मुख्यत: अध्यात्म-तत्त्वज्ञानपर पुस्तकांचे वाचन चालते.

तत्त्वज्ञानातील सरस्वती शुभदा जोशी (Shubhada Joshi – Professor do Philosophy)

शुभदा जोशी यांचे नाव एकविसाव्या शतकातील बुद्धिमान विदुषी महिलांमध्ये प्राधान्याने घ्यावे लागेल. त्यांनी ‘लोकायत-चिकित्सक’ अभ्यास या विषयात पीएच डी मिळवली. त्यांचे पन्नास शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तत्त्वज्ञानाचा अर्क प्यायलेल्या शुभदा गेली चाळीस वर्षे अध्ययन-अध्यापनात अखंड कार्यरत होत्या! परदेशातही भारतीय तत्त्वज्ञानाचे बीज पेरणाऱ्या शुभदा जोशी यांची कारकीर्द संस्मरणीय आहे…
carasole

महाराष्ट्रातील सूक्ष्मदर्शी ज्यू

अल्पसंख्यांक म्हणून भारतामध्ये मुसलमान, ख्रिश्चन, पारसी, शीख, बौद्ध व जैन या सहा समाजांना मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र सरकारने येथील ज्यू धर्मीयांना तशी मान्यता २२...