Home Authors Posts by श्रीकांत कुलकर्णी

श्रीकांत कुलकर्णी

6 POSTS 0 COMMENTS
श्रीकांत नारायण कुलकर्णी गेली चाळीस वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. 'प्रजावाणी', 'तरुण भारत', 'लोकसत्ता' अशा विविध वृत्तपत्रांमध्ये संपादकीय विभागात काम करून ते निवृत्त झाले. ते सध्या मुक्त पत्रकार म्हणून पुण्यात काम करतात. त्यांनी आतापर्यंत विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक आणि इतर नियतकालिकांमधून विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. त्‍यांना साहित्याची - विशेषता: बालसाहित्याची आवड असून कविता, कथा, विनोदी लेख, चित्रपट परिक्षण अशा विविध पद्धतीचे लेखन त्‍यांनी केले आहे. आजपर्यंत त्यांची बारा पुस्तके प्रसिद्ध झाली असून छांदिष्‍ट व्‍यक्‍तींवर लिहिलेल्या 'असे छन्द असे छांदिष्ट ' आणि 'जगावेगळे छांदिष्ट' या दोन पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. कुलकर्णी स्वत: 'छांदिष्ट' असून ते दगडांमधून पशुपक्ष्‍यांच्‍या आकारांचा शोध घेतात. ते 'निर्मळ रानवारा' या 'वंचित विकास' संचलित बालमासिकाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी विविध दिवाळी अंक, विशेषांक, आणि निवडक पुस्तकांचे संपादन केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9422319143

समाजशिक्षक गिरीश प्रभुणे – पद्मश्री! (Girish Prabhune: Social Reformer awarded Padmashree)

गिरीश प्रभुणे यांना समाजशिक्षक हा पुरस्कार कृ.ब.तळवलकर ट्रस्टतर्फे 2012 मध्ये देण्यात आला. मी माझ्या ट्रस्टी मित्रांसोबत त्या निमित्ताने त्यांच्या चिंचवड येथील समरसता गुरूकुलम या शाळेला भेट दिली होती.

रमेश पानसे यांचे स्वप्न आणि शैक्षणिक धोरणाचे सत्य (Panase’s Dream Came True Through Educational...

प्रा. रमेश पानसे ही व्यक्ती नसून स्वतःच एक संस्था आहेत! प्रचंड ऊर्जा, उर्मी, अभ्यास, तळमळ, लोकसंग्रह, कल्पना, उत्साह हे सर्व त्या व्यक्तीजवळ आहे. बालशिक्षणात त्यांचे योगदान प्रचंड आहे. त्यांना शिक्षणऋषीच म्हणता येईल. त्यांनी 2020 साली ऐंशीव्या वर्षात पदार्पण केले आहे.

आनंद शिंदे – सागर-संपत्तीचा अनमोल खजिना

पुराणकाळातील समुद्रमंथनाची कथा सर्वांना माहीत आहे. सागरातील अनमोल संपत्तीची वाटणी करून घेण्यासाठी देव आणि दानव यांच्यात ‘समुद्रमंथन’ झाले आणि त्यातून कितीतरी मूल्यवान गोष्टी बाहेर...
carasole

मोहम्मद मक्की – दगडांच्या रत्नांचा सम्राट

‘दगडांच्याही देशा...’ असे कुसुमाग्रजांनी  महाराष्ट्राला केलेले संबोधन समर्पक आहे. महाराष्ट्राची जमिन विविध खनिजसंपत्तीने समृद्ध आहे. त्‍यातील दगडांचा खजिना शोधण्याचा छंद पुण्यातील मोहम्मद फसिउद्दिन मक्की यांना...
Salsa6

अक्षय उणेचा आणि साल्सा!

अक्षय उणेचा या पुण्याच्या तरुणाने ऑस्ट्रेलियात १६ जून २०१२ रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय साल्सा नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पुण्याचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. विदेशी नृत्य-...
धर्मापुरीकर यांच्या संग्रहात देशोदेशीची लाखभर व्यंगचित्रे आहेत

मधुकर धर्मापुरीकर – व्यंगचित्रांचा साक्षेपी संग्राहक

एखादे व्यंगचित्र किती खळबळ माजवू शकते याचा अनुभव भारतातील नागरिकांनी घेतला, मुंबईतील असीम त्रिवेदी या तरुण व्यंगचित्रकाराच्या एका व्यंगचित्रामुळे. त्याच्याविरुद्ध त्याबद्दल देशद्रोहाचा खटला दाखल...