Home Authors Posts by संदीप परांजपे

संदीप परांजपे

2 POSTS 0 COMMENTS
संदीप प्रभाकर परांजपे पुण्याचे. त्यांना बकावूल्फ, बजाज ऑटो, फिनोलेक्स इंडस्ट्री, हायप्लेसेस मॅनेजमेंट अशा विविध ठिकाणी केलेल्या बेचाळीस वर्षे कामाचा अनुभव आहे. सह्याद्री व हिमालयात भटकंती हा त्यांचा छंद. त्यांनी मोटर सायकलवरून तेरा हजार किलोमीटर भारतभ्रमण व भारतातील पाचशेहून अधिक किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी चिपळूणजवळील गोवळकोट किल्ल्याचा अभ्यास करून त्यावर झालेली लढाई उजेडात आणली. ते या प्रकारचे संशोधन व कार्यकर्त्यांना तत्संबंधी मार्गदर्शन करतात, व्याख्याने देतात. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल विश्वकोशासाठी किल्ले व भारतात आलेले परकीय प्रवासी या विषयांवर; तसेच, दुर्गविषयक लेखन केले आहे. ते ‘गुगल अर्थ’वर भारतातील अठ्ठावीसशे किल्ल्यांचे मॅपिंग करत आहेत.

दाभोळ आणि परकीय प्रवासी

‘दाभोळ’ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील महत्त्वाचे बंदर. त्याचा उत्कर्ष चौदाव्या ते सतराव्या शतकांत झालेला होता. दाभोळ बंदराचा सर्वात प्राचीन उल्लेख सातवाहन काळात एका अनभिज्ञ परकीय प्रवाशाने लिहिलेल्या ‘पेरीप्लस ऑफ इथिरियन सी’ या ग्रंथात सापडतो. दाभोळचा तो उल्लेख ‘पालीपाटमे’ असा आहे. त्याच प्रमाणे जुन्या लिखाणात कोकणातील बंदरांचे संदर्भ सापडतात...

दाभोळचा इतिहास – मक्केचा दरवाजा !

दाभोळ हे दापोली तालुक्यातील महत्त्वाचे बंदर आहे. ते महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते. कोकणातील बंदरे सातवाहन काळात भरभराटीस आली. तेथून रोम, इजिप्त, अरेबिया, इराण या देशांशी व्यापार चालत असे. दाभोळचा तेराव्या शतकापर्यंतचा इतिहास चालुक्य, शिलाहार, यादव यांसारख्या हिंदू राजवटींचा इतिहास आहे...