Home Authors Posts by रामचंद्र वझे

रामचंद्र वझे

66 POSTS 0 COMMENTS
रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केली. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्‍यांना प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले’, ‘क्‍लोज्ड सर्किट’, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले’ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर’ ही पुस्‍तके ‘ग्रंथाली’कडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा मासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचे ’महाराष्‍ट्र टाईम्‍स’ आणि ‘लोकसत्ता’ या दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

ब्रिटिश मिशनरी आणि मराठी म्हणी (British Missionaries and Marathi Proverbs)

जगाच्या पाठीवर ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणाऱ्या मिशनरी लोकांनी जगभरातील लोकांच्या शारीरिक प्रकृतीची काळजी तर घेतलीच, पण ते जेथे जेथे गेले तेथील लोकांशी एकरूपही झाले!

दुलिपसिंगांचे स्वेच्छा धर्मांतर व शीखांचा इतिहास (Duleep Singh’s Conversion to Christianity and Sikh History)

हिंदुस्थानात ख्रिस्ती धर्माचा प्रसार पंधराव्या शतकापासून सुरू झाला. मात्र ज्या ब्रिटिशांनी हिंदुस्तानावर दीडशे वर्षे राज्य केले, त्या ब्रिटिश सरकारने व त्यांचे पूर्वसुरी ईस्ट इंडिया कंपनी यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराला अधिकृत रीत्या पाठिंबा देणे फार उत्साहाने कधी केले नाही.

म्हणे, हिटलर हा श्रीकृष्णाचा अवतार? (Hitler – Shreekrishna’s Incarnation?)

र्मनीचा हुकूमशहा हिटलर याची भक्त असलेल्या स्त्रीने हिटलरच्या स्मृती जागवण्यासाठी तो जेथे जेथे गेला तेथे तेथे जाऊन त्या प्रवासावर एक पुस्तक लिहिले आहे! हिटलरची आम लोकांना माहिती आहे ती त्याने केलेल्या ज्यू लोकांच्या हत्याकांडामुळे.

लाला लजपतराय आणि निग्रो – एक अज्ञात पैलू (Lala Lajpat Rai on Racism in...

स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय यांच्याबद्दल माहीत नसलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांपैकी एक म्हणजे त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात कराव्या लागणाऱ्या संभाव्य कामाचा केलेला विचार.

लाला लजपतराय, लेखक कसे होते? (Lala Lajpat Rai As Writer)

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील लाल-बाल-पाल म्हणजे लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपीनचंद्र पाल. सर्व भारत ह्या त्रिमूर्तीच्या रूपाने - पंजाब, महाराष्ट्र आणि बंगाल -

ब्रिटिश छावण्यांतील वेश्यांची स्थिती (The Plight of Prostitutes in British Ruled Indian Camps)

मिशनरी म्हटले की बहुधा डोळ्यांसमोर येतात ते पांढरे पायघोळ झगे घातलेले आणि ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी काम करणारे स्त्री-पुरुष. महिला मिशनरी असा स्वतंत्र उल्लेख केला तर पहिले नाव आठवते ते मदर तेरेसा यांचे.

वावीकर, शिरधनकर यांची पुस्तकांची दुनिया (Books About Books By Wavikar and Shirdhankar)

'मी वाचत सुटलो त्याची गोष्ट' (लेखक – निरंजन घाटे) या नावाच्या पुस्तकाचा बोलबाला अलिकडे बराच चालू आहे. त्याच वेळेला, 'अलिकडे लोक वाचत नाहीत' अशा मताचा प्रसार आवर्जून करणारी माणसेही ऐकण्यात येतात. अशा या वातावरणात वाचनावरील जुने पुस्तक हाती यावे हा सुखद योग म्हणावा.

अहिल्याबाईंच्या गौरवार्थ इंग्रजी पोवाडा (English Ballad in Praise of Ahilyabai Holkar)

अहिल्याबाई होळकर ही मराठ्यांच्या आणि त्यामुळे भारताच्या इतिहासातील एक प्रमुख स्त्री. झाँसीची राणी लक्ष्मीबाई हिच्या बरीच अगोदर आणि बऱ्याच वेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या त्या व्यक्तीबद्दल ब्रिटिश समाजातही आदर होता,

महेंद्र प्रताप हीदेखील हाथरसचीच ओळख (Freedom Fighter Mahendra Pratap Also Hails From Hathras)

काय योगायोग आहे, पाहा! काही योगायोग आवडू नये, असे असतात तशातीलच हा. पण त्यामधूनही दिलासा मिळतो! हाथरस नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण गेला महिनाभर गाजत आहे.

दलाई लामा व तिबेट यांचे निकट दर्शन (Close Look At Tibet & Dalai Lama)

1
तिबेटमधील बौद्धांचे धर्मगुरू दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतल्याला एकसष्ट वर्षे होऊन गेली. त्यांची कृती शांतताप्रसारासाठी व्याख्याने देणे, समारंभात भाग घेणे एवढ्यापुरती उरली आहे. जगात एकंदरच शांततावादी लोकांना करण्यासारखे काही न उरल्याने,