Home Authors Posts by प्रल्हाद कुलकर्णी

प्रल्हाद कुलकर्णी

9 POSTS 0 COMMENTS
प्रल्हाद कुलकर्णी हे इंग्रजीचे डॉक्टरेट प्राप्त प्राध्यापक म्हणून कोल्हापूरच्या विवेकानंद संस्थेच्या कॉलेजमधून निवृत्त झाले. त्यांनी इंग्रजी लेखक विल्यम गोल्डिंग यांच्या कादंबऱ्या या विषयावर पीएच डी पदवी संपादली. त्यांची मराठीत आठ व इंग्रजीत चार पुस्तके प्रसिद्ध आहेत. निवृत्तीनंतर, त्यांचा भटकंती आणि तत्संबंधी लेखन हा छंद बनला आहे. त्यांनी भारतविद्या, मोडीलिपी व पर्शियन भाषा या विषयांचाही अभ्यास केला आहे. त्यांनी 'साहित्याचे पश्चिम रंग' हे सदर ‘तरुण भारत’मध्ये पाच वर्षे लिहिले होते.

वाल्मिकीचे पठार – पानेरी

वाल्मिकी पठार हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या पठारावर वाल्मिकी ऋषींनी वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. तेथील वाल्मिकी मंदिर पूर्वाभिमुख असून, वाल्मिकींची मूर्ती गर्भगृहात आहे. त्या भागाचे आणखी महत्त्वाचे आकर्षण म्हणजे वन्य जीवांचा अधिवास असलेले घनदाट जंगल…

करगणीचे श्रीराम मंदिर (ShreeRam Temple of Kargani)

करगणीचे श्रीराम मंदिर हेमाडपंथी असून ते मूळ महादेव मंदिर आहे. आख्यायिकेनुसार, ‘श्रीरामांनी वनवासातील भ्रमंतीदरम्यान त्याठिकाणी वास्तव्य केले होते. श्रीशंकरांनी लक्ष्मणाला खड्ग आणि आत्मलिंग जिथे दिले, त्या जागी त्याने आत्मलिंगाची स्थापना केली, ते हे मंदिर.’ ग्रामस्थांच्या वतीने त्या देवस्थानाचा जीर्णोद्धार 1975 साली करण्यात आला. त्या वेळी गर्भगृहात श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती बसवण्यात आल्या…

हिंदळे येथील कार्तिकस्वामी मंदिर (Kartikswami Temple at Hindale in Sindhudurg)

कार्तिकेय देवतेचा उल्लेख वेदवाङ्मयात अपवादाने आढळतो. मात्र तो अनेक पुराणांतून दिसतो. त्याची मंदिरे महाराष्ट्रात तुरळक आहेत, मात्र ती देशाच्या दक्षिण भागात सर्वत्र दिसतात...

बहिर्जी नाईक आणि बाणूरगड (Bahirji Naik and Banurgad)

बाणूरगड हा किल्ला सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्‍यात आहे. तो सांगली शहराच्या उत्तरेला साधारण साठ किलोमीटर अंतरावर येतो. तो भाग माळरानाचा आहे...

सांगली जिल्ह्यातील कलावंतीणीचे कोडे ! (The mystery design in Sangli district)

कोड्याबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका ऐकण्यास मिळतात. मणेराजुरीत कलावंतीण राहण्यास आली. तिने तिची कला सादर करताना, तिच्या बुद्धीच्या जोरावर अनेक मातब्बरांना, राजे-रजवाड्यांना पराभूत केले. तिने तिच्या बुद्धिसामर्थ्याने माळरानावर लहानमोठ्या दगडगोट्यांचे कोडे मांडले.

उद्धव महाराजांचे वाठार (How Wathar is connected with saint Eknath!)

बुवांचे वाठार हे सांगलीपासून जवळ असलेले गाव प्रसिध्द आहे. ते कोल्हापूर जिल्ह्यात येते. उद्धव महाराजांचे वास्तव्य वाठार या गावी होते. हे उद्धव महाराज म्हणजे एकनाथांचे नातू. वाठार गाव निसर्ग संपन्न आहे.

वामन पंडितांची कोरेगावची समाधी (Marathi Poet Vaman Pandit of Seventeenth Century)

वामन पंडित यांची ख्याती श्लोकांबद्दल विशेष आहे. त्यांची ‘सुश्लोक वामनाचा’ अशी प्रसिद्धी आहे. यमक, अनुप्रास, स्वभावोक्ती हे त्यांचे आवडते अलंकार होते. त्यांनी त्यांचा हव्यास अधिक केल्याने त्यांना ‘यमक्या-वामन’ असेही म्हणत...

भेंडवडे येथील पुरातन शिवमंदिर (Shiv temple at Bhendavade Dist. Sangli)

भेंडवडे हे सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्‍यातील दोन-अडीच हजार लोकसंख्येचे छोटेसे खेडेगाव. भेंडवडे गाव विट्याच्या पूर्वेला, विट्यापासून साधारण आठ-दहा किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. भेंडवडे हे गाव 1989 पर्यंत एकच होते...

कुंडलापूरचा ऐतिहासिक वारसा (Treasure of Historical information at Kundlapur-sangli)

ग्वाल्हेर घराण्यातील सरदार शहाजी राणोजी शिंदे यांची समाधी सांगोला-सांगली मार्गावरील कुंडलापूर घाटातून दिसते. त्या रस्त्यावर कवठेमहांकाळ तालुक्‍यातील कुची गावाजवळ तिसंगीमार्गे पुढे गेले, की कुंडलापूर घाट लागतो...