Home Authors Posts by प्रकाश पेठे

प्रकाश पेठे

20 POSTS 0 COMMENTS
प्रकाश पेठे यांचा जन्‍म अमरावतीचा. ते बडोदा येथे स्‍थायिक आहेत. त्‍यांनी 'सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर' मुंबर्इ येथून शिक्षण पूर्ण केले. पेठे यांनी 'मराठी विश्‍वकोशा'साठी पंधरा जगप्रसिध्द वास्तुकलाकारांच्या चरित्र नोंदींचे लेखन 1964 साली केले. त्‍यांनी वास्तुकलेतील नव्या प्रवाहाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याच्या ओढीने अहमदाबाद व चंदिगडची दीर्घ सफर 1965 मध्‍ये केली. त्‍यांचा वडोदरा महानगरपालिकेसाठी शहराचा पहिला विकास आराखडा व नगर रचना योजना बनवण्यात सहभाग होता. त्‍यांनी संगीत विशारद ही पदवी 1989 मध्‍ये मिळवली. ते नगर विकास अधिकारी या पदावरून निवृत्त 1998 मध्‍ये झाले. त्‍यांंनी 'महाराज सयाजीराव विद्यापीठ' बडोदे येथे 1977 पासूनअतिथी प्राध्यापक, 'सरदार वल्लभभार्इ पटेल इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलाजी' येथे 2001 पासून आर्किटेक्चर आणि आणंद जवळील विद्यानगर येथे नगर रचना शास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अतिथी प्राध्यापक म्‍हणून जबाबदारी स्‍वीकारली आहे. पेठे यांना प्रवास, छायाचित्रण, साहित्‍य, संगीत आणि कला अशा विविध विषयांची आवड आहे. त्‍यांची 'स्वप्नगृह', 'धमधोकार', 'आनंदाकार', 'वडोदरा' व 'नगरमंथन' ही पाच पुस्तके 'ग्रंथाली'तर्फे प्रकाशित झाली आहेत. लेखकाचा दूरध्वनी 094277 86823

केळशीच्या रमलखुणा

पूर्वीच्या काळी गाव, गावाकडची संस्कृती, गावची अर्थव्यवस्था कशी होती याचे प्रातिनिधिक रूप म्हणजे केळशी. गावाकडचे निसर्गसौंदर्य, तेथील लोकजीवन आणि त्यातील वेगळेपण हे सगळेच भूरळ घालणारे होते. आज गावे शहरीकरणामुळे सुधारली. पूर्वीच्या गावांबाबत अनभिज्ञ असलेल्या आजच्या पिढीला जुन्या गावची सैर केळशी या गावातून घडेल...

केळशी गावचे पारंपरिक खाद्यपदार्थ

महाराष्ट्रात प्रत्येक पट्ट्याची खास खाद्यसंस्कृती आहे. त्यात प्रामुख्याने कोकणी, पुणेरी, मराठवाडी, कोल्हापूरी, खान्देशी, वऱ्हाडी या म्हणता येतील. कोकणात नारळ व तांदूळ मुबलक उपलब्ध असल्यामुळे तेथील पारंपरिक खाद्यपदार्थांत खोबरे व तांदूळ यांपासून बनवलेले पदार्थ जास्त आढळतात...

केळशी देवीचा उत्सव : समाजजीवनाचे प्रतिबिंब

केळशीच्या महालक्ष्मी मंदिराचा उत्सव खूपच मोठा असतो. मंदिर हा पेशवेकालीन वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. उत्सवास केवळ धार्मिक स्वरूप नाही; तर त्यातून केळशी गावाचे समाजजीवन प्रतिबिंबित होते. उत्सव चैत्रशुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या कालावधीत होतो.

बडोद्यातील विनाशकारी प्लेग, 1896 (KILLER PLAGUE 1896 IN VADODARA)

'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलवर महाराष्ट्र व मराठी माणूस यांबाबतची विविध तऱ्हांची माहिती आपल्याला संकलित करायची आहे. काही ऐतिहासिक महत्त्वाचा डेटादेखील गावोगावाहून, स्थानिक पातळीवरील प्रयत्नांतून उपलब्ध होऊ शकतो.
-heading

अख्ख्या भारताचे मोजमाप – द ग्रेट इंडियन आर्क

विज्ञान जगताच्या इतिहासात दोनशे वर्षांपूर्वी भारतात घडलेली घटना म्हणजे लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्बटन (1753-1823) आणि सर जॉर्ज एव्हरेस्ट (1790-1866) यांनी कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत, काही अक्षवृत्ते...

यवतमाळचे सर्पमित्र श्याम जोशी

0
श्याम गोविंदराव जोशी म्हणजे यवतमाळमधील विशेष व्यक्ती आहेत. ते वयाच्या चौदाव्या वर्षांपासून सेहेचाळीस वर्षें सर्पांच्या राज्यात रमून गेले आहेत. जिल्ह्यात कोठेही साप निघाला तर...
_Ram_Ganesh_Gadkari_1.jpg

गणदेवी (गुजरात) – राम गणेश गडकरी यांचे जन्मगाव

0
मी नवसारीला 2013 साली गेलो होतो. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह जेथे केला त्या दांडीला जाण्यासाठी. राम गणेश गडकरी यांचा जन्म नवसारी तालुक्यात झाला होता हे...
_Gujaratmadhill_Kutumbkabila_1.jpg

गुजरातमधील कुटुंबसंस्था आणि कुटुंबकबिला हरवला!

0
मी ‘आर्किटेक्चर’चे काही विषय गुजराथमधील तीन महाविद्यालयांत व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवतो. मला तेथे पाच-सात मुले तरी दरवर्षी ‘सर, आय अॅम अ सिंगल चाईल्ड’ असे सांगणारी भेटतात....
_Gujarati_Shrimant_1.jpg

गुजराती श्रीमंत का असतात?

2
गुजराती श्रीमंत का असतात या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. ते दुकानदार-व्यापारी असतात, सकाळी नऊ ते रात्री नऊ काम करतात. म्हणजे सर्वसामान्य नोकरदार-कामगार यांच्यापेक्षा चार...
_Garudeshwar_1.jpg

गरूडेश्वरचे वासुदेवानंद सरस्वती

1
दत्तभक्तांचे प्रमाण महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खूप आहे. गाणगापूर, नरसोबाची वाडी ही जुनी दत्तक्षेत्रे. गुजरातेत नर्मदा ही सगळ्यात मोठी नदी. नर्मदेखेरीज इतर मोठ्या...