Home Authors Posts by नरेंद्र चपळगावकर

नरेंद्र चपळगावकर

4 POSTS 0 COMMENTS
नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. ते वैचारिक लेखन करणारे संवेदनशील व सत्त्वशील मराठी लेखक आहेत. ते न्यायाधीश होण्यापूर्वी लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. ते 'मराठवाडा साहित्य परिषदे'च्या विश्वस्त मंडळाचे पंधराहून अधिक वर्षे अध्यक्ष होते. त्यांना 'मराठवाडा साहित्य परिषदे'चा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मर्ढेकर आणि लागू

कृ.द. दीक्षित यांनी आकाशवाणीमधील नोकरीदरम्यान अनेक कलावंतांना जवळून अनुभवले, त्यांच्या स्वभावातील कंगोरे टिपले. ते अनुभव त्यांनी व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून आकर्षक पद्धतीने लिहून वाचकांसाठी मुक्त केले. त्यात चॉसरचे तज्ज्ञ प्रा. लागू व बा. सी. मर्ढेकर यांच्यातील तत्त्वनिष्ठा वेधक आहे…

सदाशिवपेठी

व्यक्तिचित्र लिहिताना त्या व्यक्तीचे गुण-दोष लेखक सांगतो, पण त्या व्यक्तीबद्दल लेखकाच्या मनात जिव्हाळा नसेल तर तो चांगले व्यक्तिचित्र लिहूच शकणार नाही. आंतरिक जिव्हाळा व तटस्थपणा हा चांगल्या व्यक्तिचित्राचा महत्त्वाचा गुण आहे. अन् तो गुण श्री.ज. जोशी, शांता शेळके यांसारख्या लेखकांच्या लेखनात प्रत्ययास येतो…

टिळक-गांधी आणि त्यांचा निर्भयतेचा वारसा

लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात काही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांचा वारसा महत्त्वाचा आहे. लोकमान्यांनी स्वतंत्र देशात जगण्याचा लोकांना अधिकार आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवून देशाचे स्वातंत्र्य हे महत्त्वाचे मूल्य प्रस्थापित केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांचा आग्रह हा देशाच्या भावी घटनात्मक व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग ठरला. गांधीजींनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यासाठी स्वावलंबन यांचा पुरस्कार केला. गांधीजींचा दुसरा मूल्यसंस्कार हा समतेचा आहे. गांधीजींचा आग्रह धर्म हा लोकांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक व्यवहारातून बाजूला ठेवावा हा होता...
_anant_bhalerav_loneta_sanpadak

अनंत भालेराव – लोकनेता संपादक

‘मराठवाडा’ वृत्तपत्र आणि संपादक अनंतराव यांची भाषा या दोन्हींचे ‘मराठवाडा’ या भूप्रदेशाच्या संस्कृतीशी अजोड नाते आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य माणसे जी भाषा बोलत, जे वाक्प्रचार...