3 POSTS
डॉ. मंजिरी निंबकर यांनी एम बी बी एस ही पदवी 1981 मध्ये मिळवली आणि फलटणच्या आर्थिकदृष्ट्या मागास वस्तीत प्रॅक्टिस सुरु केली. त्या अचूक निदान आणि माफक फी या गोष्टींसाठी ओळखल्या जात. त्यांनी विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी 1985 मध्ये शाळा सुरु करून ती चार वर्षे चालवली. त्यांनी डॉ. मॅक्सिन बर्नसन यांनी सुरु केलेल्या प्रगत शिक्षण संस्थेच्या ‘कमला निंबकर बालभवन’ या प्रयोगशील शाळेत काम करण्यास 1995 मध्ये सुरुवात केली. त्यांनी त्या शाळेची मुख्याध्यापक, खजिनदार व संचालक म्हणून अनेक वर्षे धुरा वाहिली. त्यांना सातारा जिल्हा माध्यमिक निवृत्त मुख्याध्यापक मंडळाकडून आदर्श मुख्याध्यापक म्हणून बॅरिस्टर पी.जी. पाटील मेमोरिअल पुरस्कार 2006 मध्ये देण्यात आला. त्यांनी अनेक मराठी तसेच इंग्रजी मासिके व वर्तमानपत्रांमधून शिक्षणविषयक लेख लिहिले आहेत. त्यांचे मुलांच्या लेखनावर आधारित ‘मुलांचे सृजनात्मक लिखाण’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.