Home Authors Posts by माधव गवाणकर

माधव गवाणकर

6 POSTS 0 COMMENTS
माधव गवाणकर हे दापोलीतील ज्येष्ठ साहित्यिक आहेत. ते मुंबईहून दापोलीत स्थायिक झाले. त्यांची ‘नाट्यछटा, पिटुकल्या गोष्टी’, ‘झकास गावच्या गोष्टी’, ‘बलदंड बबडू’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांची ‘सालं लाईफ’ ही कादंबरीही प्रकाशित झाली आहे. त्यांचे ‘नाट्यछटा’, ‘थट्टाछटा’, ‘ध धमाल’ हे नाट्यछटा संग्रह, ‘बोका बनला मामा’ ही विनोदी नाटिका आणि ‘भोंदू’, ‘झकास गावच्या गोष्टी’ या कुमारकथा, पिटुकल्या गोष्टी, छानछान गोष्टी या छोट्यांसाठी कथा असे प्रयोगमूल्य असलेले बालसाहित्यही प्रसिद्ध आहे.

हायकूकार मनोहर तोडणकर

दाभोळचे कवी मनोहर रामचंद्र तोडणकर हे आयुष्याच्या शेवटपर्यंत रसिकांच्या शोधात असत. शिरीष पै यांनी ‘हायकू’ मराठीत आणला; तोडणकर शिरीष पै यांना गुरुभगिनी मानत. तोडणकर यांनी ‘हायकू’ या जपानी काव्यप्रकारावर नंतरच्या आयुष्यात बराच भर दिला. त्यांच्या नावावर ‘हायकूंची हाक’ आणि ‘समाधीचे क्षण’ हे दोन हायकूसंग्रह आहेत. त्यांपैकी ‘समाधीचे क्षण’ हा संग्रह त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी आमच्यापर्यंत आला ! तोडणकर यांच्या अंगणात हायकू जणू फुलांसारखे आपले आपण उमलत गेले...

दापोलीतील सर्पसृष्टी (Serpents in Dapoli)

दापोली हा डोंगराळ व वनसृष्टीने बहरलेला तालुका असल्याने तेथील रहिवाशांना सर्पसृष्टीचा सहवास व भीतीही सतत राहिलेली आहे. भारताची जीवनशैली निसर्गानुकूल असली तरी वनस्पती व प्राणी सृष्टीविषयी लोकांमध्ये खास प्रेम, आस्था दिसून आली नव्हती. ती पर्यावरणीय जाणीव आधुनिक काळात आली व पसरत गेली. तशी ती दापोलीतही तीन दशकांपूर्वी सारंग ओक यांच्या निमित्ताने आली. ते व्यवसायानिमित्ताने आले आणि त्यांनी तेथे सरपटणारे प्राणी वनसृष्टीत पुन्हा सोडण्याची गरज पटवून दिली आणि बघता बघता त्यांची सर्पमित्रांची ‘टीम’ जमली. त्यात किरण करमरकर, सुरेश खानविलकर, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि अरविंद व अनुप देशमुख हे पितापुत्र अशी पाच-सात मंडळी उत्तम तयार झाली...

प्रशांत परांजपे : समाजभान जपणारा बहुरूपी

प्रशांत परांजपे पाक्षिक ‘सर्वांगीण निवेदिता’ आणि ऑनलाईन पत्रकारितेतील ‘निवेदिता फास्ट न्यूज’ अशी दोन नियतकालिके चालवतात. त्याशिवाय ते इतर वृत्तपत्रांसाठी वेळोवेळी लेखन करत असतात. त्यांनी प्लास्टिकविरोधी भूमिका नेहमीच घेतली आहे आणि प्रदूषण व अस्वच्छता यांना विरोध केला आहे. वृक्षतोड थांबावी म्हणून मोहिमा आखल्या आहेत. खासगी स्वयंसेवा हे तर त्यांचे स्वत:चे खास क्षेत्र. प्रशांत व्याख्याने, लेख, बातम्या अशा माध्यमांतून कोकणासमोर सतत येत राहिले आहेत. त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची दापोली शाखा जालगावातून चालवली...

दापोलीतील पाखरपहाट

मी दापोलीत 1996 मध्ये स्थिरावलो. मी राहतो त्या दापोलीच्या ‘वडाचा कोंड-लालबाग’ परिसरातील पाखरांची संख्या व विविधता गेल्या पंचवीस वर्षांत कमी होत गेली आहे, कारण झाडांची संख्या कमी झाली आहे ! आमच्या सोसायटीच्या आवारातील शिवणीचे गारवा, सावली देणारे झाडही माझ्या विरोधाला न जुमानता पाडण्यात आले ! त्यामुळे मी कितीतरी पक्षी व त्यांचे स्वर यांना मुकलो...

मनोज पवार यांचा स्मशानातील वाढदिवस !

दापोलीचे पत्रकार मनोज पवार यांनी त्यांचा वाढदिवस स्मशानात करण्याचा उपक्रम सलग पंचवीस वर्षे राबवला ! ते मध्यरात्रीच्या सुमारास तथाकथित भुताखेतांना न घाबरता स्मशानात जात व तेथे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करत. कधी त्यांचे मित्र त्यांच्याबरोबर असत. पण तो मुख्यत: सणकीत केलेला एकांडा पराक्रम होता...

नास्तिकांची दापोली

कोकणी माणूस त्याचे कुळाचार, त्या त्या समाजाने ठरवलेल्या रूढी-प्रथा-परंपरा कटाक्षाने पाळणारा आहे. कोकणवासी मंडळी धार्मिक सण-उत्सव यांत वर्षभर मग्न व दंग असतात. तरीही दापोली तालुक्यातील नास्तिक नमुने त्यांच्या वेगळेपणाने उठून दिसतात याचा मला अचंबा वाटत आला आहे. दापोलीतील निरीश्वरवादी मंडळींवर उपजत चिकित्सक वृत्ती, वाचन, नास्तिक मंडळींचा सहवास आणि समाजवादी धोरण या घटकांचा प्रभाव दिसून येतो...