Home Authors Posts by केशव साठये

केशव साठये

2 POSTS 0 COMMENTS
केशव साठये यांनी ‘शैक्षणिक दूरचित्रवाणी’ या विषयात पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. दूरचित्रवाणी आणि प्रसारमाध्यम क्षेत्रात ते गेली चाळीसहून अधिक वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी EDUSAT या राष्ट्रीय दूरचित्रवाणी प्रकल्पात महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाचे समन्वयक म्हणून काम केले आहे. त्यांची आयकॉनिक पर्सनॅलिटीज, Broadcast Journalism & Digital Media (इंग्रजी), टेलिव्हिजन आणि प्रसार माध्यमे, भिनलेली माणसं (मराठी) अशी पुस्तके आहेत. त्यांनी महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या स्मार्ट या मीडिया स्कूलचे संस्थापक- संचालक म्हणून चार वर्षे काम केले आहे. ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मास कॉम विभागाचे प्रमुख म्हणून काम करतात.

प्रभाकर कंदिलवाले – ओगले

0
विजेची निर्मिती महाराष्ट्रात बाल्यावस्थेत होती तेव्हा एक मोठा आधार होता तो म्हणजे कंदिलाचा. त्याचा प्रभाकर ब्रँड ही जणू महाराष्ट्रीयत्वाची निशाणी ठरली ! अनेक जणांच्या परीक्षा त्या कंदिलांनी यशस्वीपणे पार पाडल्या. छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये, वाड्यांमध्ये पेटलेल्या कंदिलानी घरांतील, दुकानांतील व्यवहार उजळून काढले. त्या प्रभाकर कंदिलाचे निर्माते होते गुरुनाथ प्रभाकर ओगले...

जयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप

0
पुण्यातील दोन खुणा जयंतराव टिळक यांची आठवण चिरकाल ठेवतील. शनिवारवाड्यासमोरचा पूल आणि त्यांच्या नावाने सहकार नगर येथे उभारलेले गुलाब पुष्प उद्यान. जयंतरावांचे गुलाब पुष्प प्रेम प्रसिद्ध आहे. त्यांनी गुलाब पुष्पाबद्दल पुणेकर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली. ते लोकमान्यांचे नातू होत...