1 POSTS
डॉ. गंगाधर बुवा हे सावंतवाडीचे राहणारे. ते 1997 सालापासून 'यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ' नाशिक, येथे केंद्र संयोजक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत भाषा, साहित्य, इतिहास, सांस्कृतिक संरचना, पर्यावरण, ग्रंथालय चळवळ या विषयांवर विविध नियतकालिकांमधून तीनशेहून अधिक लिहिले आहेत. त्यांचे 'सावंतवाडी संस्थान', 'राजमाता', 'राजेसाहेब', 'मॉंसाहेब', 'कोकणातील देवदेवस्कीची देवस्थाने' अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यासोबत त्यांनी काही दिवाळी अंक आणि स्मरणीका यांचे संपादनही केले आहे. सावंतवाडी तालुक्यात सार्वजनिक ग्रंथालय उभारण्यात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या कामाबद्दल त्यांना 'आदर्श ग्रंथपाल', अखिल भारतीय मराठी वाङ्मय मंडळाचा 'उत्कृष्ठ वाङ्मय पुरस्कार', 'राजमाता ग्रंथमित्र पुरस्कार' अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9422054978 / 02363 273478