Home Authors Posts by सिसिलिया कार्व्हालो

सिसिलिया कार्व्हालो

1 POSTS 0 COMMENTS
सिसिलिया कार्व्हालो मराठी लेखिका आहेत. त्या वसईतील 'संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालया'च्या प्राचार्या आणि मराठीच्या अध्यापिका आहेत. त्या मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना पीएचडीसाठीचे मार्गदर्शन करतात. कार्व्हालो यांनी काव्याबरोबरच कथा, ललित, बालवाङ्मय, संकलन, लोकसाहित्य असे अनेक प्रकारचे साहित्य लिहिलेले आहे. त्यांची 'उन्मेश', 'अंतर्यामी', 'सूर्य किरणात आला', 'पंख', 'माणूस उकरून काढावा लागतोय' ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याशिवाय त्यांनी 'त्यां प्रेमांजली' व 'मृद्‌वेणा' ही अनुवादित पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी उच्च माध्यमिक पाठ्यपुस्तक मंडळावर व बालभारती पाठ्यपुस्तक मंडळावर संपादक म्हणून काम केले आहे. त्यांना मुंबई विद्यापीठाचा 'आदर्श शिक्षिका' पुरस्कार मिळाला आहे. तसेच पंचवीस पेक्षा अधिक पुरस्कारही मिळाले आहेत. त्या बेळगावात झालेल्या 'मंथन महिला साहित्य संमेलना'च्या अध्यक्ष होत्या.
carasole

कृतिशील समाजचिंतक फादर फ्रान्सिस दिब्रिटो

फादर दिब्रिटो हे कॅथलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरू आहेत. त्यांचा जन्म वसईतील मराठी भाषिक ख्रिस्ती कुटुंबातील. विरार-आगाशी परिसरातील नंदाखाल हे त्यांचे जन्मगाव. मराठी साहित्यातील एक सिध्दहस्त...