Home Authors Posts by अरुण खरात

अरुण खरात

1 POSTS 0 COMMENTS
अरुण खरात हे कोपरगाव तालुक्‍यातील चांदेकसारे गावचे रहिवासी. त्‍यांचा केबल सर्व्हिसचा व्‍यवसाय आहे. ते जोडधंदा म्‍हणून इलेक्ट्रिकल शॉप आणि पिठाची चक्‍की चालवतात. खरात यांना वाचन आणि लेखन यांची आवड आहे. ते कवी असून गीतलेखनही करतात. त्यांनी वगनाट्य, भक्तिगीते, लोकगीते, लावणी या प्रकारचे लेखन केले आहे. ते लेखन महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून मान्यता प्राप्त आहे. त्यांची वगनाट्य अनेक लहान मोठ्या तमाशांत गाजली आहेत. त्‍यांनी लोककला विषयावर केलेले लेखन 'लोकमत', 'देशदूत', 'सार्वमत' या दैनिकांत प्रकाशित झाले आहे. ते स्‍वतःचा छंद आणि व्यवसाय सांभाळून शिर्डी येथील साईबाबा संस्थानाच्‍या 'साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल'मध्ये विनामोबदला रुग्णांना मार्गदर्शन करण्‍यासाठी वेळ देतात. लेखकाचा दूरध्वनी 9960838433
carasole

बाळ भैरवनाथाचा हवामानाचा अंदाज!

3
बाळ भैरवनाथांचे देवस्थान अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे आहे. तो अष्ट भैरवनाथांपैकी एक. त्या ठिकाणी गुढीपाडव्यानंतर पंधरा दिवसांनी दोन दिवस यात्रा भरते. यात्रेत...