Home Authors Posts by अपर्णा महाजन

अपर्णा महाजन

12 POSTS 0 COMMENTS
अपर्णा महाजन या चाकण येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयातून इंग्रजी विषयाच्या विभागप्रमुख म्हणून 2020 मध्ये निवृत्त झाल्या. त्यांनी नामवंत वृत्तपत्रे, जर्नल आणि मासिके यांमधून लेखन केले आहे. त्यांत कथा आणि वैचारिक लेख यांचा समावेश आहे - त्यांचा ‘आस’ हा कथासंग्रह आणि 'मथित' नावाचा लेखसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी गंगालहरी या पंडितराज जगन्नाथ यांनी रचलेल्या श्लोकांच्या पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर केले आहे. 'कॉफीडेट आणि इतर कथा' या नावाने त्यांच्या कथा स्टोरीटेलवर उपलब्ध आहेत. अपर्णा यांना महाविद्यालये आणि कार्पोरेट क्षेत्रामध्ये सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स आणि इंग्रजी भाषा शिकवण्यास बोलावले जाते. त्यांचे नाट्यशास्त्र, इंग्रजी-मराठी अनुवाद आणि भाषाविषयक कौशल्ये; तसेच, सेंद्रिय पद्धतीने झाडे, बगीचा वाढवणे हे आवडीचे विषय आहेत. त्या तळेगाव दाभाडे येथे राहतात.

वज्रलेखा सुनिता (Sunita a woman of fortitude!)

मैत्रबन हे आमचे शेतघर. त्याला आम्ही ‘फार्महाऊस’ म्हणत नाही. ती वास्तू म्हणजे पाठीमागे गर्द झाडीचा डोंगर, शेजारी जंगल, पुढे धरण अशा वेगळ्या धाटणीची आणि व्यक्तिमत्त्वाची आहे. ‘मित्रांनी मित्रांसाठी’ असे त्या वास्तूचे बोधवाक्य आहे. या आमच्या घरी सुनिता मदतीला आली आणि आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक झाली ! आई नसलेली, लवकर लग्न झालेली, अकाली नवरा गेला अशी अनेक संकटे सोसलेली सुनिता...

एक यशोगाथा! (Yasho’s Story)

यशोदा वाकणकर ही स्वतःला असलेल्या व्याधीचे दुष्परिणाम सोसल्यावर एपिलेप्सी रुग्णांच्या बाबतीत मोलाचे, विधायक काम करते आहे. तिने अपस्माराच्या आजारातून बरी झाल्यावर 2004 मध्ये पुण्यात ‘संवेदना फाउंडेशन’ हा एपिलेप्सी सपोर्ट ग्रूप सुरु केला. आनंदी राहण्यासाठी कितीतरी लहान मोठी कारणे असतात. पण कारणाशिवाय आनंदी राहण्याचा एक मोठा धडा स्वानुभवाने ती सोपा करून सांगते. तिचे काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले आहे...

सद्भावनेचे व्यासपीठ

माणसे माणसांशी चांगुलपणाने वागत आहेत; छोटी माणसे मोठी कामे उभी करत आहेत. आजही माणसे इतरांच्या भल्यासाठी धडपडत आहेत. समाजातील भलेपणा जपू पाहत आहेत. अशा व्यक्ती समाजात दहा टक्केच असतात, परंतु त्यांचा प्रभाव एकूण समाजावर भासतो तेव्हा एकूण समाजाच्या सद्भावनेची शक्ती जाणवते, त्याच समाजशक्तीचा प्रत्यय घेण्यासाठी ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ आहे. येथे जे जे चांगले आहे ते ते नोंदले जाईल...

विधवा स्त्री ही तर पूर्णांगिनी ! – परिसंवाद

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘स्त्री: स्वातंत्र्य, प्रथा आणि कायदे’ या विषयावर ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’तर्फे ऑनलाइन परिसंवाद आयोजित केला होता (21 ऑगस्ट 2022). त्या परिसंवादाचा वृत्तांत ...

स्वागत थोरात – अंधांच्या आयुष्यातील प्रकाश (Eye Opener Swagat Thorat)

स्वागत थोरात अंधांचे जगणे सुकर व्हावे, त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी द्यावी यासाठी जेथे गरज असेल, तेथे समुपदेशनासाठी जातात. अवघड वाटणाऱ्या गोष्टी सोप्या करून त्यांच्याकडून प्रत्यक्ष सराव करून घेतात. स्वागत यांनी त्या अंध बांधवांच्या मनात शिरून त्यांची प्रतिभा, बुद्धीची क्षमता ओळखून त्यांच्या आयुष्यात प्रकाशाची तिरीप दाखवली आहे…

रघुनाथ ढोले यांचे हृदय झाडांचे…

रघुनाथ ढोले यांची झाडांशी घट्ट नाळ जुळलेली आहे. झाडांशी हितगुज करणाऱ्या या मितभाषी माणसाने मानवनिर्मित देवराया निर्माण करण्याचा ध्यास घेतला. आतापर्यंत त्यांनी पंच्याण्णव देवराया आणि बत्तीस घनदाट वने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यांत निर्माण केली आहेत...

विदुर महाजन – सुस्वर संगीतातील स्वत:ची वाट (Vidur Mahajan Musician With Difference)

विदुर महाजन हा त्याची सतार आणि त्याचे संगीत याबद्दल बोलतो तेव्हा त्याची स्वभाववैशिष्ट्येही कळत जातात. तो म्हणतो, “मी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी सतार शिकण्यास सुरुवात...

पुण्यातील बाटल्यांचा बंगला- राजेंद्र इनामदार (Durable Bungalow with plastic bottles)

राजेंद्र इनामदार हे लोकांनी फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या पाहिल्या की अस्वस्थ होत. त्यांनी त्या गोळा करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यातून साकारला बाटल्यांचा बंगला. त्यांनी ‘बाटल्यांच्या बंगल्या’साठी ऐंशी हजार बाटल्या गोळा केल्या आहेत. दगडाचे चूर्ण, पाणी आणि फक्त सहा-सात टक्के सिमेंट यांचे पातळ मिश्रण त्या बाटल्यांत भरून साकारलेला त्यांचा बाटल्यांचा बंगला. त्या बाटल्यांची शक्ती किती दाबाने तुटू शकते ती क्षमता (क्रशिंग स्ट्रेंग्थ) तपासून पाहिली असता ती नेहमीच्या विटांच्या अडीच ते तीन पट जास्त भरली. यामुळे त्यांचा प्रयोगाचा उत्साह त्या ‘स्ट्रेंग्थ’च्या दुपटीने वाढला...

भावचिन्हांचा धुमाकूळ (Emojis Obstruction to Language Developement)

समाजमाध्यमांमध्ये विनोदी, गोड दिसणाऱ्या इमोजींचा वापर सहज आणि नित्याचे झाले आहे. विविध हृदये, रडके-दुःखी चेहरे, 'ब्लोईंग किसेस'... आणि अशा अडीचशेहून अधिक भावचिन्हांच्या मदतीने भावना व्यक्त करता येतात. मात्र ती पद्धत साचेबंद होत आहे का? उलट या चेहेऱ्यांमुळे खऱ्या भावना व्यक्त होणे नाहीसे झाले आहे...
_yantrik_sudharnanche_1_0.jpg

यांत्रिक सुधारणांचे खोटे व रंजक जग

स्मार्ट फोनने सगळ्यांच्या आयुष्यावर जसजसे अतिक्रमण केले आहे अथवा अॅमेझॉन, फ्लिप कार्ट, बिग बास्केट, स्नॅप डील वगैरेंसारख्या ऑनलाईन खरेदीची जी प्रचंड लाट आली आहे,...