Home Authors Posts by अजय काळे

अजय काळे

1 POSTS 0 COMMENTS
अजय काळे शिकवतात दहिवडी (ता. तासगाव, जिल्हा - सांगली) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गास. ते तंत्रज्ञान प्रवीण शिक्षक आहेत. त्यांचे शिक्षण एम ए, बी एड, डी एड व डीएसएम असे झाले आहे. त्यांनी ई-लर्निंगच्या कामास 2009 पासून सुरुवात केली. त्यांनी तेथपासून विविध तऱ्हेचे उपक्रम केले, त्यांना 2019 मध्ये NCERT चा (नवी दिल्ली) नॅशनल अॅवार्ड फॉर इनोव्हेशन हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याच साली त्यांना एससीइआरटीतर्फे (पुणे) घेतलेल्या नवोपक्रम स्पर्धेत जिल्ह्यात पहिला क्रमांक आला आहे. काळे यांना विविध संस्थांचे राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

काळे-पाटील यांचे सोपे गणित (Kale-Patil teachers make Mathematics easy for students)

0
गणित हा साऱ्या तर्कबुद्धीचा पाया असतो. गणिताला सोपे करणारे एन.डी. पाटीलसर आमच्या दहिवडी जिल्हा परिषद शाळेत आहेत. त्यांचे ते कौशल्य आमच्या शाळेपुरते मर्यादित का ठेवावे असा विचार मनात आला आणि 2017 सालापासून सुरू केले- Ajay Kale- Tech Guru या नावाने !!