थिंक महाराष्ट्र डॉट कॉम – देणगीसाठी आवाहन

0
53
https://www.youtube.com/user/thinkm2010/videos
आवाहन! आवाहन!! आवाहन!!!
महाराष्ट्राच्या साहित्यसंस्कृतीचा वारसा
जपण्याच्या कार्यास हातभार (खरे तर, तन-मन-धन झोकून देऊन)
लावा
आणि करबचतही करा
(80जी कलम सवलतीचा लाभ घ्या).
तुमचे पाचशे रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक सहकार्य एका मोठ्या चिरंजीवी कामासाठी खर्च होत आहेत यावर विश्वास ठेवा.
त्या कार्याचे
सारे तपशील उपलब्ध आहेत.
महाराष्ट्राच्या तालुका तालुक्यांतील नवजागरण अधोरेखित करणारा,
महाराष्ट्राचा अभिमान जागवणारा भव्य प्रकल्प! थिंक महाराष्ट्र डॉट कॉम.
सध्या लेखसंचय आहे तीन हजारांचा – यावर्षीचा संकल्प पाच हजारांचा.
तेथे आपण यशस्वी झालो तर पुढील प्रगती हनुमान उड्यांनी होईल
!
दिनकर गांगल यांच्या संपादनाखाली चालू असलेले एक मोठे कोशकार्य
(की महाराष्ट्राचे म्युझियम)
! भेट देऊन तर पाहा.
सुशिक्षित, सुसंस्कृत व संवेदनशील आणि सामाजिक बांधीलकी/सामिलकी मानणाऱ्या, समाजाप्रती सजग असणाऱ्या व्यक्ती तेथे पुन्हा पुन्हा भेट देतील अशी खात्री आहे.
सहकारी संचालक – प्रवीण शिंदे, डॉ.यश वेलणकर, सुदेश हिंगलासपूरकर, राजीव श्रीखंडे
पूर्णवेळ कार्यकर्ते – नितेश शिंदे, राजेंद्र शिंदे.

बँक डिटेल्स

State Bank of India

A/c No. – 31759182464, IFSC code – SBIN0005352

Branch – Dadar (East)

———————————————————————————————-
                                                      आवाहन
[youtube=https://www.youtube.com/watch?v=zx4vGafuCyI&w=320&h=266]

ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनया संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फतथिंक महाराष्ट्र डॉट कॉमहे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच थिंक महाराष्ट्र डॉट कॉमहे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.

थिंक महाराष्ट्रप्रकल्पाची व्याप्ती क्षितिजाएवढी आहे. कारण या प्रकल्पात महाराष्ट्रातील चांगुलपणा आणि प्रज्ञाप्रतिभा यांच्यामध्ये दुवा साधायचा आहे. त्या दृष्टीने वेबपोर्टलवर तीन प्रकारे माहितीचे संकलन केले जाते.
·      कर्तबगार व्यक्ती
·      स्वयंसेवी व उपक्रमशील संस्था
·      मराठी समाज व संस्कृती यांच्या वैभवाचे डॉक्युमेन्टेशन
दहा वर्षांत वेबपोर्टलवर साडेतीन हजार लेख आणि एकशे अठरा व्हिडिओ प्रसिद्ध झाले. ते तुम्ही सोबतच्या लिंकवरून पाहू शकता.
 ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम हे वेबपोर्टल मोठी झेप घेण्याच्या दृष्टीने सज्ज होत आहे. एक वर्षभरात थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचा जो मुख्य हेतू आहे – महाराष्ट्राची प्रज्ञाप्रतिभा आणि येथील चांगुलपणा यांचे नेटवर्क तो साधला जाण्याच्या दृष्टीने काही कार्य पक्केपणाने सुरू होईल. त्यामधून मराठी भाषा- संस्कृतीचे दर्शन संवर्धन साधेल.
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम इंग्रजी भाषेतही यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. थिंक महाराष्ट्र डॉट कॉम हे वेबपोर्टल व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे चालवले जाते. ती नॉन प्रॉफिट प्रा. लि. कंपनी आहे. थिंक महाराष्ट्र डॉट कॉम ही चळवळ व्हावी यासाठी तिचे पब्लिक लि. कंपनीत रूपांतर करण्याचा मानस आहे, पण तो काही वर्षांनंतर! दरम्यान, या प्रा. लि. कंपनीचे दोनशे भागधारक करता येऊ शकतात. त्या कलमानुसार तेवढे पेट्रन मेंबर बनवून त्या सर्वांना समान भाग द्यावेत व ती मंडळी व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन या भविष्यवेधी संस्थेचे संस्थापक सभासद असावेत असे आखले आहे.
तुम्हाला विनंती अशी, की कृपया व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन च्या नावे बारा हजार पाचशे रुपये पाठवून एका मोठ्या प्रकल्पाचे भागीदार व्हावे. पेमेंट करण्याबाबतचे तपशील पुढे दिले आहेत. थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचा फोल्डर सोबत जोडला आहे. त्यावरून कल्पना येईल.
कदाचित अशी शक्यता आहे, की आताच तुम्हाला साडेबारा हजार रुपये भरून या कार्यात सहभागी होता येत नाही. तुम्हाला विनंती अशी, की थिंक महाराष्ट्र डॉट कॉमया वर्षभरात उद्दिष्टाच्या दिशेने मार्गस्थ व्हावे यासाठी शुभेच्छा म्हणून पाचशे ते पाच हजार रुपये पर्यंतची देणगी व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनच्या नावे द्यावी.
चेक व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशनया नावाने २२, पहिला मजला, मनुबर मेन्‍शन, १९३ आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर, दादर (पूर्व), मुंबई – ४०० ०१४ या पत्‍त्यावर पाठवावा. तुम्‍हाला व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनच्‍या बँक खात्‍यातही पैसे पाठवता येतील आणि ऑनलाईन ही डोनेशन सोबतच्या लिंकवरून ट्रान्‍सफर करता येतील.
State Bank of India                                Cosmos Bank
A/c No. – 31759182464                           A/c No. –  0121001015862  
IFSC code – SBIN0005352                     IFSC code – COSB000002
Branch – Dadar (East)                                                  Branch – Dadar (West)

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनआयकर कायद्याखालील ८०जी (80G) कलमानुसार देणगीदारास आयकरात सूट देण्यासाठी प्रमाणीत आहे.
८०जी प्रमाणपत्र क्रमांक DIT(E)/MC/80G/2920/2011-12
पैसे ट्रान्‍सफर केल्‍यानंतर किंवा चेक पाठवल्‍यानंतर आम्‍हाला कळवावे ही विनंती. पैसे जमा होताच त्‍याची पावती तुमच्‍या पत्‍त्यावर पोस्‍टाने पाठवण्‍यात येईल.
कळावे.

आपले,
दिनकर गांगल, प्रवीण शिंदे, राजीव श्रीखंडे, सुदेश हिंगलासपूरकर, डॉ. यश वेलणकर

————————————————————————————–

‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे प्रकल्प

 

१. व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनने कृतार्थ मुलाखतमाला नावाचा उपक्रम तीन वर्षें चालवला. त्या मुलाखतींत वयाचा अमृत महोत्सव पार केलेल्या मंडळींनी त्यांच्या आयुष्यामधील कृतार्थता वर्णन करून सांगितली आहे. त्यात ग्रंथालीआणि माधवबागयांचे सहकार्य अधुनमधून लाभले. त्या मुलाखतींच्या प्रत्येकी सुमारे दोन तासांच्या तीस व्हिडिओ फिल्म संकलनासाठी वाट पाहत आहेत. त्यांतील काही भाग युट्यूबवर उपलब्ध केला आहे.

 

२. हिंद स्वराजची शताब्दीमहात्मा गांधी यांनी १९०९ साली लिहिलेल्या या पुस्तकाची शताब्दी होऊन गेली. त्या निमित्ताने व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनने महाराष्ट्रव्यापी दोन दिवसांचा परिसंवाद पुण्यात योजला. त्यासाठी गांधीभवन यांचे सहकार्य लाभले. महाराष्ट्रातून सुमारे एकशेपस्तीस मंडळी त्यासाठी स्वेच्छेने आली. त्यात अभय बंग, मोहन हिराबाई हिरालाल, सु.श्री. पांढरीपांडे, विवेक सावंत, रामदास भटकळ असे मान्यवर होते. दोन्ही दिवसांचे व्हिडिओ शूटिंग तयार आहे. ते तुम्ही सोबतच्या लिंकवरून पाहू शकता.

 

३. महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित (थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवरील निवडक साहित्याचे प्रकाशन) ही वर्षाला एक पुस्तक अशी मालिका योजली होती. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यांचे स्वागत झकास झाले. मात्र तो उपक्रम निधीअभावी पुढे रेटला गेला नाही.

 

४. लोकशाही सबलीकरण अभियान – महाराष्ट्रातील पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांची मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने दोन दिवसांची कार्यशाळा 2015 मध्ये आयोजित करण्यात आली होती.

 

५. सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध प्रकल्पास झंझावती यश लाभले. सोलापूरविषयक साहित्य थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवर रोज एक-दोन लेख या वेगाने प्रसिद्ध होत गेले. सोलापूर जिल्हा संस्कृतिवेधमध्ये जे सांस्कृतिक विचारमंथन झाले. त्याचा पाठपुरावा तळेगाव येथील दोन दिवसांच्या चिंतन शिबिरात घेण्यात आला. तेथील उपस्थिती व प्रतिनिधींचा सहभाग लक्षणीय होते. तळेगावला मुख्य तीन गोष्टी ठरल्या. अ.  सोलापूर जिल्हा संस्कृतिवेधच्या धर्तीवर जिल्हावार मोहिमा न घेता त्या तालुकावार घ्याव्यात. त्या दृष्टीने पाच तालुके मुक्रर करण्यात आले. चाकण, अलिबाग व मुरुड या ठिकाणी तशा प्रकारच्या बैठका झाल्या. बैठकांना उपस्थिती चांगली होती,परंतु थिंक महाराष्ट्र डॉट कॉममधील सहभागाच्या दृष्टीने प्रतिसाद कोमट राहिला. ब. कॉलेजा-कॉलेजांत ज्ञानमंडळे हा उपक्रम अपूर्व ठरू शकतो. त्याला नंतरच्या चर्चेत स्पर्धात्मक स्वरूप देऊन त्यामधील सहभाग कसा वाढवता येईल या दृष्टीने छान छान सूचना आल्या आहेत. क. ज्ञानमंडळांचा भाग म्‍हणून आचार्यकुलाची कल्‍पना मांडण्‍यात आली.

 

६. जिल्हावार सृजनयात्रा – थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवर सादर केल्या जाणा- माहितीमध्ये समाजातील चांगुलपणा आणि विधायक घडामोडी यांचा विचार आणि शोध अंतर्भूत आहे. थिंक महाराष्ट्रने समाजातील सकारात्मकतेचा आणि चांगुलपणाचा वेध घेण्याच्या उद्देशाने जिल्हावार मोहिमा सुरू केल्या. त्यातून उस्मानाबाद जिल्ह्याची सृजनयात्रा आखण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यात साहित्य संमेलनाच्या आधीचा पूर्ण आठवडा थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉमग्रंथाली यांच्यामार्फत कार्यक्रमांची धमाल उडवून देण्यात आली. त्याला आविष्कार सप्ताहअसे नाव देण्यात आले होते. तो कार्यक्रम ०१ जानेवारी २०२० ते ०९ जानेवारी २०२० या कालावधीत संपन्न झाला.  त्याला प्रतिसाद उबदार मिळाला.

 

७. दुर्मीळ पुस्तकनिर्मिती जुन्या पुस्तकांची ओढ समाजात निर्माण झालेली आहे. तिचा फायदा घेऊन तशी पुस्तके निर्माण करावीत व ती ठरावीक खरेदीदारांना प्रिंट टु ऑर्डर पद्धतीने विकत द्यावी. जेणेकरून ज्ञानसाधन निर्माण होईल व थिंक महाराष्ट्र डॉट कॉमच्या गंगाजळीत चार पैसे जमा होतील, असा हा प्रकल्प. अशा प्रत्येक पुस्तकास फक्त दहा हजार रुपयांचा स्पॉन्सर हवा असतो.

 

८. थिंक टॉक – ‘थिंक टॉकमध्ये कल्पना अशी आहे, की वेगळा विचार अथवा/आणि वेगळे कार्य करणाऱ्या व्यक्तींचे चार मिनिटांचे भाषण ऑडियो/व्हिडियो स्वरूपात रोज सकाळी ११:०० वाजता थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवर प्रसृत करणे. थिंक टॉकसाठी पाच रेकॉर्डिंग झाली आहेत. त्या प्रत्येक दहा मिनिटांच्या भाषणास रेकॉर्डिंग व अपलोडिंग यासाठी सहा हजार रुपयांचा स्पॉन्सर मिळण्याची गरज आहे.
९. लेखकांची माहिती – महाराष्‍ट्रातील समस्‍त लेखकांची माहिती ऑनलाईन आणण्‍याचा एक प्रकल्‍प 2010 साली, थिंक महाराष्‍ट्रच्‍या आरंभकाळी हाती घेण्‍यात आला होता. त्यावेळी महाराष्‍ट्रातील ते ज्ञअक्षरांच्‍या लेखकांची यादी डोळ्यांपुढे ठेवून काम सुरू करण्‍यात आले. अक्षरापर्यंतच्‍या सर्व लेखकांना पत्रे पाठवून त्‍यांच्‍याकडून त्‍यांची वैयक्तिक माहिती, त्‍यांची पुस्‍तके, प्रकाशन वर्ष, पुस्‍तकाचा सारांश, त्यावरील परीक्षणे अशा अनेक घटकांसंबंधीची माहिती मागवण्‍यात आली होती. शेकडो लेखकांनी त्‍यास प्रतिसाद देऊन त्‍यांची माहिती थिंक महाराष्‍ट्रकडे पाठवली आहे. ती माहिती योग्‍य प्रकारे मांडण्‍याकरता लायब्ररीयन हेमंत शेट्ये यांनी फॉरमॅट सुचवला. फारच थोड्या लेखकांची माहिती त्‍या फॉरमॅटमध्‍ये नमूद करता आली. उर्वरित माहिती कागदपत्रांच्‍या आणि इमेल्‍सच्‍या रुपामध्‍ये आहे. तेथेही स्पॉन्सर हवा आहे.
१०. जोडप्‍यांच्‍या मुलाखती – पस्‍तीस ते चाळीस वयोगटातील जोडप्‍यांशी गप्‍पा मारून त्यांच्‍या सांस्‍कृतिक जीवनाचा गाभा आणि त्‍यांची जीवनशैली जाणून घ्‍यावी या उद्देशाने व्हिजन महाराष्‍ट्रने वैद्य साने ट्रस्‍टसोबत जोडप्‍यांच्‍या मुलाखती घेण्‍याचा उपक्रम 2012 साली राबवला. त्‍यासाठी थिंक महाराष्‍ट्रच्‍या प्रतिनिधींनी पस्‍तीस जोडप्‍यांच्‍या मुलाखती घेतल्‍या. त्‍या मुलाखतींतून हाती आलेल्या माहितीवर पुढे काम मात्र झालेले नाही. कारण त्या प्रकारच्या अभ्यासकास देण्यासाठी लागणारे मानधन.
 ११. विचारमंथन – समाजसंस्‍कृतीच्‍या काही विषयांवर गंभीर, सर्वांगीण आणि खुली चर्चा व्‍हावी यासाठी ऑक्‍टोबर 2012 मध्‍ये माधवबागच्‍या साथीने विचारमंथनया कार्यक्रमाची सुरूवात करण्‍यात आली. त्यामध्‍ये अभिजात वाचकाच्‍या शोधात आणि चित्रकलेचे बाजारीकरणया दोन विषयांवर अनेक मान्‍यवरांना सोबत घेऊन खोपोली येथील माधवबागमध्‍ये चर्चा घडवण्‍यात आल्‍या. मात्र तो कार्यक्रम अधिकाधिक व्‍यक्‍तींपर्यंत पोचवण्‍यासाठी एखाद्या चॅनलेची साथ घ्‍यावी या उद्देशाने तो कार्यक्रम स्‍थगित करण्‍यात आला आणि चॅनलसोबत बोलणी सुरू झाली. ती बोलणी फळाला आली नाहीत.
१२. समाजसेवेचा इंद्रधनूपु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षभरातील अनेक कार्यक्रमांची सांगता झाली. शतगुणी पुलं यांच्या समाजसेवेप्रती असलेल्या भावनेचा वसा जपण्यासाठी व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनने समाजसेवेचा इंद्रधनूनावाचा वैशिष्ट्यपूर्ण व सतत चालू राहील असा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचा आरंभ २७ नोव्हेंबर २०१९ मध्ये झाला. पुण्याच्या सा’(स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन) या संस्थेने त्या उद्घाटनपर कार्यक्रमाचे यजमानपद स्वीकारले होते. समाजसेवेचा इंद्रधनूहे स्वयंसेवी संस्थांचे नेटवर्क व्हावे अशी अपेक्षा आहे. त्यासाठी व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशनचे थिंक महाराष्ट्र डॉट कॉमहे ऑनलाईन व्यासपीठ वापरले. त्या कार्यक्रमात चार संस्था सहभागी झाल्या होत्या.

 

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here