Home Search

साहित्य अकादमी - search results

If you're not happy with the results, please do another search

मराठी भाषा-साहित्य : अचलपूरचे योगदान

अचलपूर तालुक्याने मध्यप्रदेश या हिंदीभाषिक राज्याच्या सीमेवर असतानासुद्धा मराठी भाषा केवळ जगवली नव्हे तर वाढवलीसुद्धा आहे. अचलपूर परिसरातील बोलीचे सौंदर्य, तिचे उच्चारविशेष, रूपविशेष, तिचे आगळेपण भाषातज्ज्ञसुद्धा मान्य करतात. मूळात अचलपूरला मोठी वाङ्मयीन परंपरा लाभलेली आहे. ती मराठी भाषेच्या वृद्धीकरता पूरक ठरलेली आहे...

पंचेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-fifth Marathi Literary Meet 1964)

पंचेचाळिसावे मराठी साहित्य संमेलन गोव्यात मडगाव येथे 1964 साली आयोजित करण्यात आले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज होते. त्यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची लहान बहीण होती. कुसुम ही एकुलती एक बहीण असल्याने शिरवाडकर यांनी कुसुमचे अग्रज अर्थात कुसुमाग्रज हे टोपणनाव धारण केले.

त्रेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-third Marathi Literary Meet 1961)

कुसुमावती देशपांडे यांची कवयित्री, कथाकार व समीक्षक अशी मराठी साहित्यसृष्टीत ओळख आहे. त्यांचा इंग्रजी व मराठी वाङ्मयाचा व्यासंग विलक्षण होता. त्यांनी त्या काळी कुटुंबियांचा विरोध डावलून कवी अनिल यांच्याशी केलेला प्रेमविवाह चर्चेचा विषय बनला. त्या दोघांचा त्या काळातील पत्रव्यवहार ‘कुसुमानिल’ या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे…

सदतिसावे साहित्य संमेलन

सदतिसावे साहित्य संमेलन दिल्ली येथे 1954 साली झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे होते. लक्ष्मणशास्त्री म्हणजे भारतीय प्राचीन ऋषी परंपरेची आठवण ज्यांना पाहिल्यावर आणि ऐकल्यावर व्हावी असा प्रकांड पंडित व रसिक विद्वान...

सकस बालसाहित्यिक संजय वाघ (Sahitya Academy award winner Sanjay Wagh)

0
संजय वाघ यांना ‘साहित्य अकादमी’चा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या किशोर कादंबरीसाठी तो पुरस्कार दिला गेला आहे. ते नाशिकचे पत्रकार आणि साहित्यिक आहेत. दरवर्षी जाहीर होणाऱ्या ‘साहित्य अकादमी’च्या पुरस्कारांतून नाशिकच्या वाट्याला आलेला साहित्य अकादमीचा बाल साहित्यातील हा पहिला पुरस्कार आहे...

एकतिसावे साहित्य संमेलन (Thirty-first Marathi Literary Meet -1947)

एकतिसावे साहित्य संमेलन हैदराबाद येथे 1947 साली झाले. नरहर रघुनाथ फाटक हे तेथे अध्यक्ष होते. फाटक यांच्या आयुष्याची सुरुवात वृत्तपत्र लेखनाने आणि संपादन सहकार्याने झाली. पुढे, ते नाथीभाई ठाकरसी विद्यापीठ व रुईया कॉलेजात मराठीचे अध्यापक झाले...

एकोणतिसावे साहित्य संमेलन (Twenty Nineth Marathi Literary Meet – 1944)

भार्गवराम विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर हे धुळे येथे 1944 साली झालेल्या एकोणतिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचा लौकिक श्रेष्ठ नाटककार, बंगाली साहित्याचे भाषांतरकार आणि कादंबरीकार असा होता. त्यांचा जन्म चिपळूण येथे 27 एप्रिल 1883 रोजी झाला.

सव्विसावे साहित्य संमेलन (Twenty Sixth Marathi Literary Meet – 1941

सव्विसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विष्णू सखाराम ऊर्फ भाऊसाहेब खांडेकर हे होते. ते संमेलन 1941 साली सोलापूर येथे झाले. खांडेकर हे शिक्षकी पेशातील, सतत दारिद्र्याशी झुंज देत असलेले सात्त्विक प्रकृतीचे गृहस्थ होते. साहित्य हे मनात उच्च हेतू ठेवून लिहिले गेले पाहिजे अशी त्यांची धारणा होती.

अरुणा ढेरे – साहित्यातील सर्वंकष जाणिवांना स्पर्श

यवतमाळ येथील व्यासपीठावर आश्वासक गोष्ट घडली; ती म्हणजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली अरुणा ढेरे यांची निवड आणि त्यांचे विचक्षण, व्यासंगी, अभिजात भाषण! त्यांनी साधलेला...

आगरी साहित्यातील समाजदर्शन

पेझारी (अलिबाग) येथील म.ना. पाटील यांनी मराठीच्या आगरी बोली भाषेत प्रथम लेखन केले. त्यांनी ‘केले रसमाधुरी’ (1965 व ‘खलाटी’ (1980) ही पुस्तके लिहिली. आता,...