Home Search
साहित्यिक - search results
If you're not happy with the results, please do another search
… बेडेकर मोठे साहित्यिक का? (Why Bedekar is a great writer?)
‘रणांगण’ या एकमेव कादंबरीचे लेखक विश्राम बेडेकर कोल्हापूरला आले होते. त्यांना विचारलेला एक प्रश्न आणि त्याचे त्यांनी दिलेले उत्तर...
सकस बालसाहित्यिक संजय वाघ (Sahitya Academy award winner Sanjay Wagh)
संजय वाघ यांना ‘साहित्य अकादमी’चा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या किशोर कादंबरीसाठी तो पुरस्कार दिला गेला आहे. ते नाशिकचे पत्रकार आणि साहित्यिक आहेत. दरवर्षी जाहीर होणाऱ्या ‘साहित्य अकादमी’च्या पुरस्कारांतून नाशिकच्या वाट्याला आलेला साहित्य अकादमीचा बाल साहित्यातील हा पहिला पुरस्कार आहे...
शेतकरी विधवांना साहित्यिकांची सहानुभूती !
पाटणबोरी हे माझे ग्रामपंचायतीचे गाव. ते महाराष्ट्र-आंधप्रदेशच्या सीमेवर आहे. तेथे माझ्या माहेरची शेती आहे, वाडा आहे. मी 1990 साली डिसेंबरच्या सुट्टीमध्ये गावी गेले...
डॉ. कृष्णा इंगोले – माणदेशाच्या साहित्यिक जडणघडणीचे शिल्पकार
सोलापूर जिल्ह्याचे सांगोला तालुक्याचे मुख्यालय असलेल्या सांगोला शहरातील ‘सांगोला महाविद्यालय’ हे नावाजलेले महाविद्यालय. तेथून अनेक विद्यार्थी शिकून गेले आणि नावारूपास आले. त्यांच्या त्या यशात...
पं. भाई गायतोंडे – तबल्याचे साहित्यिक
तालाच्या अणुरेणुचे गणित सोडवणे म्हणजे तबला? पारंपरिक रचनेला सही न् सही वाजवणे म्हणजे तबला? की ‘हीरनकी चाल’, ‘मोरनी की चाल’ अशी चार घटका करमणूक...
नवा मानुष वाद
एकविसाव्या शतकाने लैंगिकतेच्या उधाणाचे, नातेसंबंधांच्या बाजारीकरणाचे आणि क्षणभंगुरतेचे वादळ आणले आहे, हे खरे आहे. परंतु ते पचवले जाईल आणि स्त्री-पुरुष व अन्य ह्यांनी परस्परांसोबत प्रेम, आदर व जिव्हाळा या भावनेने राहवे, शोषण व नियंत्रण ह्यांपासून मुक्त, निरामय जीवन जगावे ही आस कोणत्याही शतकात कायमच राहील. ‘नवा पुरुष’ समाज आणि साहित्य ह्यांच्या दृष्टिक्षेपात यावा व तो इतका व्यापक व्हावा की त्याचे ‘नवे’पण सार्वजनिक होऊन जावे...
एकविसाव्या शतकातील स्त्री-पुरुष संबंध
जागतिकीकरणाच्या तीन दशकांत झालेल्या अनेक बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा व मूलभूत बदल भारतीय समाजाच्या लैंगिकताविषयक धारणा व प्रत्यक्ष व्यवहार ह्यांत घडून आला आहे. ह्या परिवर्तनामुळे लैंगिकता व लैंगिक संबंध ह्यांचा पोतच नव्हे, तर आशयदेखील बदलला आहे. जागतिकीकरणानंतर भारतात अनेक पातळ्यांवर परिवर्तन झाले. त्यांपैकी काही बदल उत्पाती व प्रपाती स्वरूपाचे आहेत. त्यांतील मूलभूत स्वरूपाचा, पण सर्वात दुर्लक्षित बदल हा भारतीयांच्या लैंगिकताविषयक जाणिवा, धारणा व व्यवहार ह्यांत झाला आहे. त्या प्रक्रियेची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व त्याचे लक्षणीय परिणाम एकविसाव्या शतकात जाणवू लागले. ती प्रक्रिया अजून संपलेली नाही...
अठ्ठेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-Eighth Marathi Literary Meet 1969)
वर्धा येथे 1969 साली झालेल्या अठ्ठेचाळिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते कवी प्रा. पुरुषोत्तम शिवराम रेगे. ते नवकवितेत स्वतःचा वेगळा प्रवाह जपणारे तरल कवी, अल्पाक्षराच्या वाटेने जाणारे कादंबरीकार आणि समीक्षक-संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. रेगे यांनी ‘सुहृद चम्पा’ आणि ‘रूपकथ्थक’ या टोपणनावांनीही लिखाण केले आहे. रेगे हे मूलतः सर्जनशील कलावंत होते. त्यांनी त्यांच्या लेखनाला ‘बालमित्र’ नावाच्या हस्तलिखित मासिकातून सुरुवात केली...
जय देवी… आनंदी – रावरंभारचित आरती (Ravrambha’s devotional poem for Jagdamba)
शक्तिदेवतेचे जगदंबा हे नामांकन महाराष्ट्राने केले आहे. पराक्रमाची जोपासना करणाऱ्या अन्य शक्तिदेवता महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र तिच्या क्षात्रतेजाने अवघा धन्य झालेला आहे ! त्या जगदंबेच्या भक्तीचे वेड महाराष्ट्राच्या रोमरोमात भिनले आहे. रणांगणावर बेफाम तलवारबाजी करणारा हातदेखील तलवार बाजूला ठेवून, या आदिमायेची स्तोत्रे रचण्यासाठी लेखणी धरतो असे उदाहरण आहे. महाराष्ट्रामध्ये तो चमत्कार अठराव्या शतकात घडला. एक सरदार आदिमायेच्या भक्तीने वेडा होऊन, चक्क कवी बनला ! त्या सरदाराचे नाव आहे रंभाजीराव ऊर्फ रावरंभा निंबाळकर...
महादेवशास्त्री जोशी – संस्कारशील कथा
महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म विसाव्या शतकाच्या सुरुवातीला गोव्याच्या सत्तरी परगण्यामधील आंबेडे या गावी झाला. त्यांचे कथेच्या माध्यमातून मनुष्याच्या मनावर सद्भावनांचे संस्कार करणे हे उद्दिष्ट वाटे. त्यांचे जीवनविषयासंबंधीचे विचार, त्यांचे साहित्यिक कर्तृत्व व त्यांची आचरणशीलता यांमध्ये एकवाक्यता आढळते...