Home Search

संगमेश्वर - search results

If you're not happy with the results, please do another search

किल्ले भवानीगड : संगमेश्वर तालुक्याचा पहारेदार (Sangameshwar’s Bhavanigad fort)

0
भवानीगड हा भुईकोट ह्या प्रकारात येणारा किल्ला आहे. किल्ले भवानीगड हा शिवकाळात टेहळणी गड म्हणून महत्त्वाचा होता. त्या गडाच्या आसपास किल्ले महिपतगड आणि किल्ले प्रचीतगड हे दोन महत्त्वाचे किल्ले येतात. तसेच, राणी येसुबार्इंचे माहेर असलेले शृंगारपूर गाव आणि संभाजी राजांच्या कारकिर्दीत सरसेनापती असलेले म्हाळोजी घोरपडे यांचे कारभाटले ही गावेही हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे किल्ले भवानीगड त्या सगळ्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी उपयोगात येत असे...

कसबा संगमेश्वरचे चालुक्यकालिन श्रीकर्णेश्वर शिवमंदिर (Kasba – Karneshwar Shivmandir)

कसबा हे रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध गाव. त्या गावाला संभाजी महाराजांचा इतिहास जसा आहे तसाच देवालयांचाही. भग्न देवालयांचे गाव म्हणून त्या परिसराची ओळख...

कोकणची जाखडी, मॉरिशसची झाकरी (Konkan’s Jakhadi becomes Zhakari in Mauritius)

जाखडी म्हणजेच बाल्या नाच. ती कोकणातील लोककला आहे. त्याला ‘शक्ती-तुरा’ असे म्हणूनही ओळखले जाते. ‘जाखडी नृत्य’ रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यांत विशेष प्रसिद्ध आहे. ते गौरीगणपतीच्या सणाला केले जाते. आश्चर्याचा भाग असा, की कोकणातून मॉरिशसला गेलेल्या व तेथे स्थिरावलेल्या मराठी लोकांनीही ती लोककला जपलेली आढळली. कोकणी लोक मॉरिशसमध्ये कामानिमित्त गेले, त्यास पावणेदोनशे वर्षे झाली. कोकणातील जाखडी नृत्य हे मॉरिशसमध्ये ‘झाकरी’ या नावाने ओळखले जाते...

अप्रकाशित हिऱ्यांना पैलू पाडणारी शाळा (The school that anvils undiscovered diamonds)

2
ग्रामीण किंवा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना शहरातील अनेक गोष्टींबद्दल कुतूहल असते. किंबहुना ते अप्राप्य असल्याची जाणीवही मनात असते. उभरत्या मुलांच्या मनात कोणताही गंड राहू नये, या भावनेने त्यांना योग्य संधी, योग्य मार्गदर्शन देण्याची कळकळ शिक्षकांच्या मनात असेल, तर मुलामुलींचे निरोगी फुलासारखे फुलणारे व्यक्तिमत्त्व तयार होते. जितेंद्र पराडकर यांच्यासारखे शिक्षक पैसा-पैसा जमवून विद्यार्थ्यांसाठी ‘पैसा फंड कलादालन’ उभे करतात त्याची ही गोष्ट....

दाभोळचा इतिहास – मक्केचा दरवाजा !

दाभोळ हे दापोली तालुक्यातील महत्त्वाचे बंदर आहे. ते महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते. कोकणातील बंदरे सातवाहन काळात भरभराटीस आली. तेथून रोम, इजिप्त, अरेबिया, इराण या देशांशी व्यापार चालत असे. दाभोळचा तेराव्या शतकापर्यंतचा इतिहास चालुक्य, शिलाहार, यादव यांसारख्या हिंदू राजवटींचा इतिहास आहे...

गंधर्वतुल्य गायन करणारे नट – भाऊराव कोल्हटकर

मराठी रंगभूमीवरील गायक नट म्हणून भाऊराव कोल्हटकर हे त्यांच्या ‘शकुंतला’, ‘सुभद्रा’, ‘मंथरा’ या त्यांनी साकारलेल्या स्त्रीभूमिकांमुळे विशेष गाजले. परंतु पुढे, त्यांनी ‘सुभद्रे’चा अपवाद वगळता 1889 सालानंतर मुख्यत्वे पुरुष भूमिका साकारल्या त्या अखेरपर्यंत. भाऊराव त्यांचा मधुर गळा, त्यांचे सौंदर्य आणि त्यांचा उत्तम अभिनय यांमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोचले…

हार्मोनियम बनवण्याची चाळीस वर्षांची परंपरा

0
पांचाळ कुटुंबीयांचा पिढीजात व्यवसाय हा सुतारकामाचा. दत्ताराम पांचाळ यांनी त्यांचे भाऊ विश्वनाथ यांच्याकडून हार्मोनियम तयार करण्याचे कौशल्य संपादन केले. त्यांनी हरिभाऊ विश्वनाथ ह्या वाद्य निर्मिती कंपनीत नोकरीदरम्यान तंतुवाद्याच्या दुरुस्तीतील आठ वर्षांच्या अनुभवानंतर स्वत:चा हार्मोनियम बनवण्याचा व्यवसाय सुरू केला...

Map Sindhudurg

सोबतच्या यादीतील तालुक्यावर क्लिक करून त्या तालुक्यातील लेख वाचता येतील. कणकवली कुडाळ संगमेश्वर देवगड दोडामार्ग मालवण वेंगुर्ला वैभववाडी सावंतवाडी

Map Ratnagiri

सोबतच्या यादीतील तालुक्यावर क्लिक करून त्या तालुक्यातील लेख वाचता येतील. दापोली चिपळूण संगमेश्वर मंडणगड गुहागर लांजा खेड रत्नागिरी राजापूर

गोविंद भागा कांबळे (Govind Bhaga Kambale and Mahar Regiment of Indian Army)

0
स्वतंत्र भारताने पाच युद्धे लढली. त्यांपैकी 1962 साली चीन बरोबर झालेले युद्ध हे पराभूताचा इतिहास म्हणून ओळखले जाते. तरीही त्या युद्धात भारतीय सैनिकांचे शौर्य समोर आले.