Home Search

शैक्षणिक - search results

If you're not happy with the results, please do another search

शाहू महाराज – शैक्षणिक कार्य !

करवीर म्हणजे कोल्हापूर हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक संस्थान. अशी पाचशेपासष्ट संस्थाने भारतात होती. शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत करवीर संस्थानामध्ये जे कार्य केले, त्यामुळे ते संस्थान स्मरणात राहिले आहे. शाहू महाराजांचे कार्य इतके प्रभावी आणि महत्त्वपूर्ण होते, की स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करताना शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची नोंद घटना समितीला घ्यावी लागली ! शाहू महाराजांनी समाज सुधारणा, शिक्षण, दलितांचा उद्धार, जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा काही क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे...

उपनयन- शैक्षणिक संस्कार

व्यक्तिविकासाचा विचार पाच प्रमुख पैलूंच्या संदर्भात केला जातो- शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक. मुलांच्या घडणीच्या वयातील टप्प्याचे महत्त्व ओळखून प्राचीन अभ्यासकांनी उपनयन संस्काराची योजना केली असावी. मुले पूर्वी उपनयनानंतर गुरुच्या घरी ब्रह्मचारी म्हणून निवास करत आणि अभ्यास पूर्ण करून मग स्वत:च्या घरी परत येत असत. तो काळ ब्रह्मचारी म्हणून आयुष्य जगत असताना, अभ्यास करून स्वत:च्या भावी जीवनाची दिशा निश्चितपणे घडवण्याचा होय...

अंध मनोहर वास्वानी यांची शैक्षणिक दृष्टी (Manohar Vaswani Defeats Blindness and Succeeds in Higher...

मनोहर सन्मुखदास वास्वानी यांनी त्यांच्या अंधत्वावर मात करून मिळवलेले यश हे स्तुत्य असे आहे. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय सिंधी कुटुंबात 1975 साली नागपूर शहरात झाला.

रमेश पानसे यांचे स्वप्न आणि शैक्षणिक धोरणाचे सत्य (Panase’s Dream Came True Through Educational...

प्रा. रमेश पानसे ही व्यक्ती नसून स्वतःच एक संस्था आहेत! प्रचंड ऊर्जा, उर्मी, अभ्यास, तळमळ, लोकसंग्रह, कल्पना, उत्साह हे सर्व त्या व्यक्तीजवळ आहे. बालशिक्षणात त्यांचे योगदान प्रचंड आहे. त्यांना शिक्षणऋषीच म्हणता येईल. त्यांनी 2020 साली ऐंशीव्या वर्षात पदार्पण केले आहे...

मनुष्यजीवनाला आकार देणारा संस्कार – मौंजिबंधन

0
पुण्याचे पाटणकर यांच्या कंपनीने मुंजीचा ‘इव्हेंट’ साजरा करण्याची योजना आखून तसे समारंभ घडवण्यास सुरुवात केली आहे. इच्छुक देशीविदेशी पालक त्या योजनेचा लाभ घेत आहेत. पुण्याच्या सकाळ वृत्तपत्र समूहानेदेखील सर्व जातिधर्मांसाठी मुंजविधी करण्याची चळवळ जाहीर केली आहे. पाटणकर कंपनीने ‘व्रतबंध- एक विद्याव्रत’ या नावाचे प्रदर्शन पुण्यात दोन वर्षांपूर्वी योजले होते. त्याचे उद्‍घाटन अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्या हस्ते झाले होते. त्यांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणात ठासून हेच सांगितले, की मुंज हा विधी धार्मिक व काही जातींपुरता मर्यादित नाही. तो सर्व मुलांसाठी संस्कार म्हणून आवश्यक आहे. शिवाजीराजांचा मुंजविधी काय परिस्थितीत केला गेला त्याचेही वर्णन लेखात आहे...

अलिबाग माझे गाव

अलिबाग हे पुण्यामुंबईजवळचे समुद्र किनाऱ्यावरील गाव. अलीकडच्या काळात ‘टुरिस्ट प्लेस’ म्हणून गाजलेले. ते दोन दिवसांच्या ट्रिपसाठी उत्तम मानले जाते. मुंबईहून तेथे ‘रोरो बोट सर्व्हिस’ने जाता येत असल्याने अलिबागचे पर्यटन केंद्र म्हणून महत्त्व अधिकच वाढले आहे. पण अलिबागला मोठा इतिहास आहे. शिवाजीराजे व आंग्रे सरदार यांच्या कथाकहाण्या प्रसिद्ध आहेतच, पण ज्यू लोक दोन हजार वर्षांपूर्वीपासून येथे राहत आले आहेत. त्यांची जुनी घराणी आहेत आणि आता संबंध इस्त्रायलशी जोडलेले आहेत. बरेच लोक तिकडे स्थलांतरित झाले आहेत. अलिबागचा पांढरा कांदा हे तेथील वैशिष्ट्यपूर्ण पीक आहे. अलिबागला ब्रिटिशकाळात हवामान केंद्र होते. ते तत्कालीन कुलाबा (आता रायगड) जिल्ह्याचे मुख्य शहर होय. तेथून जिल्ह्याचे सर्व व्यवहार होतात...

माझे अलिबाग

एखाद्या गावाचे वर्णन करताना टुमदार शब्द वापरला जातो. तेव्हाच्या अलिबागला हा चपखल बसणारा शब्द. सुबक, टुमदार, सुरेख असे अलिबाग. नारळ पोफळीच्या वाड्यांनी गच्च भरलेले गाव. एस टी ने गावात प्रवेश करतानाच मन प्रसन्न होते. वैशंपायनांची वाडी, ठोसरांची वाडी, कामतांची वाडी अशा अनेक बागा, त्यात कौलारू सुबक घरे. काही दुपाखी, काही चौपाखी, काही माडीची... म्हणजे एक मजला वर असलेली. ब्राह्मण आळी, कामत आळी, मिरची गल्ली, बाजारपेठ, ठिकुरली नाका, कोळी वाडा, लिमये वाडी... असे बरेच विभाग आणि थोडेफार वास्तुशास्त्रात बदल असलेली घरे. जीना, पडवीची चौकट, खिडक्या, दारे सगळे उत्तम लाकडी बांधकाम. घरांमध्येही कणखर लाकडी आधाराचे मेरू खांब. ओटी, पडवी त्यानंतर बैठकीची खोली, माजघर, देवघर, स्वयंपाकघर, दोहो बाजूला वावरायच्या खोल्या. त्यावेळी स्वतंत्र बेडरूम अस्तित्वातच नव्हती...

लिबरल आर्ट्सचा अभ्यास – नवे आव्हान

0
लिबरल आर्ट्स ही शाखा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात नव्याने उदयास आली आहे आणि फोफावत आहे. प्रतिष्ठाप्राप्त महाविद्यालये, विद्यापीठे आणि नव्याने उदयास आलेली खाजगी विद्यापीठे यांनी लिबरल आर्ट्स हा मुक्त अभ्यासक्रम दशकभरापूर्वी सुरू केला. ज्ञानशाखांची नावे काळाप्रमाणे बदलत राहतात. पूर्वी या शाखेस ढोबळपणाने कला (आर्ट्स) किंवा काही ठिकाणी मानव्यविद्या शाखा असे म्हटले जाई. त्यात फरक होता - त्या शिक्षणक्रमास मर्यादा होती. पण आता, त्यांच्याऐवजी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लिबरल आर्ट्स शाखेमध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा ओढा दिसू लागला आहे. गेल्या दशकभरात प्रथम वर्ष पदवीला नव्वद टक्के गुणांना प्रवेश बंद होत आहेत. बदलत्या काळात ज्ञानशाखांच्या कक्षा रुंदावल्या. पालकांच्या व मुलांच्या दृष्टिकोनात बदल झाला...

विलास शिंदे यांची हाक, निसर्गासाठी ! (Vilas Shinde’s Efforts for Environment)

5
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव विलास शिंदे हे शैक्षणिक पात्रतेनुसार व्हायचे मातब्बर प्राध्यापक; परंतु वास्तवात ते शिरले विद्यापीठ प्रशासनात आणि झाले कुलसचिव. अर्थात, त्याआधी उप, प्रभारी अशी कुलसचिवपदे त्यांना निभावावी लागलीच. एका अर्थाने तेही बरे झाले. त्यामुळे शिवाजी विद्यापीठास उत्तम, अनुभवी प्रशासक लाभला, विद्यापीठाच्या टेकडीवर निसर्गसृष्टी बहरली, विद्यापीठ हे पाण्याने मालेमाल झाले; तेवढेच नव्हे तर संकटसमयी विद्यापीठ साऱ्या कोल्हापूर शहराला पाणी पुरवू लागले ! विलास शिंदे यांच्यात एकाच वेळी शिक्षणप्रेमी प्राध्यापक, कुशल व्यवस्थापक, हाडाचा निसर्गवेडा आणि लेखनकुशल विज्ञानप्रसारक अशी चार व्यक्तिमत्त्वे लपली आहेत. मात्र लोकांच्या लेखी ते ‘पाणीवाला बाबा’ किंवा इंद्रजित भालेराव यांच्यासारख्या कविमनाच्या व्यक्तीस ‘झाड कवेत घेणारा माणूस’ असतात...