Home Search

शाहीर - search results

If you're not happy with the results, please do another search

दापोली तालुक्यातील शाहीर उदय काटकर

शाहीर उदय काटकर यांनी जाखडी नृत्याची छाप पहाडी आवाजाच्या जोरावर महाराष्ट्रभर उमटवली. त्यांचे प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारे वक्तृत्त्व आणि बहारदार गायकी लोकांच्या मनावर गारुड करते. उदय काटकर यांनी हजारांहून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रभर केले आहेत...
-prataptipre-with-babasaheb-purandare

प्रताप टिपरे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची सावली (Pratap Tipre)

बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वीय सहाय्यक व सचिव यांचे नाव राणाप्रताप असावे हा गमतीदार योगायोग आहे ना! त्यांचे पूर्ण नाव राणाप्रताप प्रभाकर टिपरे ते पुरंदरे प्रेमींमध्ये...
_Garje_Marathi_1.jpg

गर्जे मराठीचे शाहीर – आनंद-सुनीता गानू

0
उत्त्तुंग कर्तृत्वाची शिखरे उभारणाऱ्या आणि ज्ञानव्यासंगाची देदीप्यमान बिरुदे मिरवणाऱ्या परदेशस्थ मराठी व्यक्तिमत्त्वांचा धांडोळा घेणाऱ्या सुनीता आणि आनंद गानू यांनी त्यांच्या ‘गर्जे मराठी’ या पुस्तकाच्या...

शाहीर राम जोशी

राम जोशी हे पेशवाईतील एक विख्यात शाहीर व कीर्तनकार (इ.स. 1758-1813). ते मूळचे सोलापूरचे. त्यामुळे त्यांना सोलापूरकर राम जोशी असेही म्हणत. त्यांचे मूळ आडनाव...
_Powada_4

शाहीर आणि पोवाडा

पोवाडा हा मराठी काव्यप्रकार आहे. त्याला पवाडा असेही म्हणतात. वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे, तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, चातुर्य, कौशल्य इत्यादी गुणांचे काव्यात्मक वर्णन, प्रशस्ती किंवा...
carasole

शाहीर सुभाष गोरे

शाहीर सुभाष गोरे हे लोककलाकार. त्यांचा जन्म 1 जून 1963 रोजी सोलापूरच्‍या सांगोला तालुक्‍यातील जवळा या गावी झाला. त्यांचे क्षेत्र लोककला व लोकनृत्य (पोवाडे,...

आद्य तमाशा कलावती – पवळा हिवरगावकर (The first lady Tamasha artist -The beautiful Pawalabai)

मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरच्या आवारात लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्या गर्दीला कारणही तसे होते. थिएटरचे मालक अबुशेठ यांनी तमाशा रसिकांसाठी एक आगळावेगळा प्रयोग केला होता. थिएटरच्या आवारात एका छान सजवलेल्या राहुटीत पठ्ठे बापुराव आणि पवळाला नटूनथटून बसवले आणि त्यांना बघण्यासाठी तिकिट ठेवले ! मुंबईतील प्रेक्षकांना त्या जोडीबद्दल मोठी उत्सुकता होती. त्यामुळे लोकांनी रांगा लावून तिकिटे काढली. त्यांनी राहुटीत प्रवेश केला, की त्या दोघांना डोळे भरून बघायचे आणि दोन्ही हात जोडून नमस्कार म्हणायचे. बापुराव आणि पवळा यांनी हलकेसे स्मित जरी केले तरी बघणाऱ्याला धन्य वाटे. कलाक्षेत्राच्या इतिहासात केवळ कलाकाराला बघण्यासाठी तिकिट लावण्याचा प्रयोग एकदाच झाला, आधुनिक तमाशासृष्टीचे जनक बापुराव आणि तमाशासृष्टीतील पहिली स्त्री कलाकार पवळाबाई यांना ते भाग्य लाभले...

अहमदनगरचा भुईकोट (Ahmednagar Fort)

किल्ल्यांचे तीन मुख्य प्रकार गिरीदुर्ग, भुईदुर्ग आणि जलदुर्ग असे असतात. भुईदुर्ग म्हणजे अर्थातच जमिनीवरचा किल्ला किंवा भुईकोट. महाराष्ट्रात भुईदुर्गांचे प्रमाण कमी आहे. अशा भुईदुर्गांपैकी अहमदनगरचा भुईकोट हा गेल्या पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळ अस्तित्वात आहे. इतकेच नाही तर वेगळ्या कारणांसाठी वापरात आहे. त्याने महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो किल्ला मुघल, पेशवाई आणि ब्रिटिश काळात तुरुंग म्हणून वापरात होता. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद यांच्यासारखे ‘हाय प्रोफाईल्ड’ राजकीय कैदी त्या तुरुंगात बंदी होते. त्याच तुरुंगात नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’सारखा महत्त्वाचा बृहद्ग्रंथ लिहिला...

कलगी तुरा (Kalagi Tura)

(Kalagi Tura) ग्रामीण महाराष्ट्रात, कलगी तुरा हा लोककलेचा एक लोकप्रिय प्रकार आहे. वैचारिक मुकाबला असावा असा सवाल-जबाबाचा खेळ असतो. तमाशाचा फड असावा तसाच फड पण...

कोकणची जाखडी, मॉरिशसची झाकरी (Konkan’s Jakhadi becomes Zhakari in Mauritius)

जाखडी म्हणजेच बाल्या नाच. ती कोकणातील लोककला आहे. त्याला ‘शक्ती-तुरा’ असे म्हणूनही ओळखले जाते. ‘जाखडी नृत्य’ रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यांत विशेष प्रसिद्ध आहे. ते गौरीगणपतीच्या सणाला केले जाते. आश्चर्याचा भाग असा, की कोकणातून मॉरिशसला गेलेल्या व तेथे स्थिरावलेल्या मराठी लोकांनीही ती लोककला जपलेली आढळली. कोकणी लोक मॉरिशसमध्ये कामानिमित्त गेले, त्यास पावणेदोनशे वर्षे झाली. कोकणातील जाखडी नृत्य हे मॉरिशसमध्ये ‘झाकरी’ या नावाने ओळखले जाते...