Home Search

शास्त्रज्ञ - search results

If you're not happy with the results, please do another search

नागलवाडीचे नागार्जुन – पुराणे शास्त्रज्ञ

0
नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील नागलवाडी हे मराठवाड्याच्या सीमेलगत वसले आहे. म्हणून त्याला तालुक्यातील शेवटचे गाव असे म्हणतात. नागलवाडी गाव छोटे असले तरी त्याची महती थोर आहे. गावाला पौराणिक व ऐतिहासिक असे दोन्ही संदर्भ लाभले आहेत. तेथे केदारेश्वरचे जुने मंदिर आहे. तेथून जवळ असलेल्या गुहेत प्राचीन रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन यांची प्रयोगशाळा व वास्तव्य होते असे सांगितले जाते...
-bhujal

निवृत्त भूजल शास्त्रज्ञ झाला प्रयोगशील शेतकरी…

 ओमप्रकाश गांधी भूजल शास्त्रज्ञ पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर ते त्यांच्या नागपूर येथील खेडी (रिठ) गावी शेतीत पूर्णवेळ रमले आहेत. गंमत म्हणजे, त्यांना शेती करण्यात...

आपली शिक्षणपद्धत शास्त्रज्ञ केव्हा निर्माण करेल?

जगातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञ कोण? ते कोणत्या देशाचे आहेत?आणि त्यांच्यात भारतीय किती? त्याचे उत्तर क्लॅरिव्हेट अ‍ॅनॅलिटिक्स या, माहितीविश्लेषण क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपनीने नुकते दिले आहे....
carasole

जीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ – पर्यावरण रक्षणाचा गौरव बिंदू

जीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांनी भारताचे पर्यावरण मंत्रालय निर्माण होण्यात-घडण्यात पुढाकार घेतला. तेव्हा त्यांच्या डोक्यात होता गांधीजींचा इशारा. “सृष्टी साऱ्यांचे भरणपोषण करण्यास समर्थ आहे, मात्र...
carasole1

खगोलशास्त्रज्ञ डॉ. पुष्पा खरे

पुष्पा खरे यांचा जन्म 16 जानेवारी 1950 या दिवशी झाला. पुष्पा खरे शालेय वयापासून अभ्यासू आणि बुद्धिमत्तेची चमक दर्शवणा-या विद्यार्थिनी होत्या. त्यांना शिक्षणासाठी नॅशनल...

कहीं ये वो तो नहीं?… (Musings)

हिंदी सिनेमाचे सगळ्यांच्याच मनात एक आढळ असे स्थान आहे. त्यातही हिंदी सिनेमाच्या सुवर्ण युगातील गाणी आणि संवेदन हे जणु हातात हात घालून प्रकटते. जसा पावसाआधी मातीचा सुगंध येतो आणि मग पाऊस प्रकटतो तसे एखाद्या खास गाण्याचे सूर काहीतरी आठवण मनात प्रकट करुन जातात आणि असे एखादे गाणे प्रत्येक संवेदनशील मनकोपऱ्यात असतेच असते... ‘ओ रात के मुसाफिर’मधल्या लता-रफी यांच्या सुरांना चांदण्याचा रंग असतो. गुरुदत्तच्या ‘जाल’मधलं ‘ये रात ये चांदनी फिर कहाँ’ ऐकताना चांदण्याला उधाणलेल्या समुद्राचा खारा वास येतो...

जोर्वे-नेवासे संस्कृती (Jorve-Newase Civilization)

महाराष्ट्रा तल्या आद्य मानवी वसाहतींची संस्कृवती 'जोर्वे-नेवासे' संस्कृेती म्हणून ओळखली जाते. ही दोन्ही गावे प्रवरा नदीच्या काठी आहेत. नेवाशाला जिथे उत्खनन झाले आहे ती जागा परतीच्या प्रवासात पाहावी असा विचार करून नकाशावर आधी जोर्वे गावाचा रस्ता शोधायला सुरुवात केली. तेवढ्यात जोर्वेच्या आधी दायमाबाद अशी पाटी दिसली. दायमाबाद हा देखील त्या संस्कृतीतला एक महत्त्वाचा पाडाव. मग आणखी पुढचे काहीच दिसेना. गाडी सरळ दायमाबादच्या दिशेने वळवली. दायमाबाद संगमनेरपासून आठ किलोमीटर अंतरावर...

ऋतु बरवा : सहा ऋतूंचे सहा सोहळे… ( Rutu Barwa – ...

वातावरणातील ऋतुचक्र सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीमुळे निर्माण होते. म्हणजे ऋतू सूर्यसंक्रांतीवर अवलंबून असतात. ती वस्तुस्थिती महाभारत काळातदेखील माहीत होती. असे असताना, दुर्गाबाईंनी चांद्रमासांवर आधारित ऋतुचक्र का लिहिले हा मला पडलेला प्रश्न आहे... ऋतुचक्राचा मेळ चैत्र, वैशाख वगैरे चांद्रमासांशी बसत नाही. मी मराठवाड्याच्या रखरखीत पठारावर जन्मलो. अठ्ठावन्न वर्षे तिकडेच काढली. पुण्याला आलो तो येथील झाडांच्या ओढीने. पुणे हे सर्वाधिक वृक्षविविधता असलेले, अतिशय वृक्षसमृद्ध असे शहर आहे हे मला वाचून माहीत होते. येथे सह्याद्री आहे. चार नद्या आणि सात धरणे आहेत...

कॅलिफोर्नियाची उपमा कोकणास का? (Can Kokan area in Maharashtra take clue from California?)

0
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात सोने पावणेदोनशे वर्षांपूर्वी सापडले. कोणीही जावे आणि सोन्याचे पोते घेऊन यावे असा समज सर्वत्र पसरला. सोने मिळते म्हटल्यावर जो तो सोने हाती लागेल या आशेने कॅलिफोर्नियाला जाण्यासाठी धावत सुटला. अमेरिकेतील माणसे आली, चीनमधून बोटी भरून आल्या. त्याला ‘गोल्ड रश’ असे म्हणतात. ‘मॅकेनाज गोल्ड’ नावाचा सिनेमा त्या हकिगतीतूनच निर्माण झाला होता. तेथील स्टॅनफर्ड विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांची नावे बघितली तर त्या शिक्षणसंस्थेची थोरवी मनात अधिकच ठसून जाते...

नोरा रिचर्ड्स पंजाबी रंगभूमीची आयरिश आजी (Nora Richards – The Irish Mother of Punjab’s...

1
कबीर बेदीची आई फ्रेडा बेदी. फ्रेडावर दोन पुस्तके आहेत. ती जेव्हा कांगडा जिल्ह्यातील आंद्रेत्ता येथे राहण्यास गेली तेव्हा तिला नोरा रिचर्ड्स नावाच्या आयरिश अभिनेत्रीने मोकळी जमीन दिली. फ्रेडाने तिचे घर तेथे उभे केले. साहजिकच, उत्सुकता निर्माण झाली की ही नोरा कोण? ती हिंदुस्तानात का आणि केव्हा आली होती? आणि ती अभिनेत्री होती तर तिने कांगडासारख्या दूर, निसर्गरम्य जिल्ह्यात राहण्याचे का ठरवले ?