Home Search

शाळेचे - search results

If you're not happy with the results, please do another search

वडांगळी शाळेचे – वार्षिक महानाट्य!

शालेय विद्यार्थ्यांची सर्जनशीलता व कल्पकता काय असू शकते, याची चुणूक नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी या छोट्याशा गावातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये पाहण्यास मिळते. वडांगळी...
carasole

आपटे गुरुजी – येवल्यातील राष्ट्रीय शाळेचे संस्थापक

नाशिक जिल्ह्यातील येवले हे तालुक्याचे शहर तात्या टोपे यांची जन्मभूमी म्‍हणून ओळखले जाते. तेथे कै. आपटे गुरुजी यांनी 23 मे 1921 रोजी राष्ट्रीय शाळा...

पालडोह शाळा, वर्षाचे तीनशेपासष्ट दिवस ! (Paldoh School, 365 days a year!)

पालडोह शाळा, वर्षाचे तीनशेपासष्ट दिवस ! ‘पालडोह’ हे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील घाटवळणावरचे गाव... ते गाव शेतीचे वाद, कौटुंबिक भांडणतंटे, भुरट्या चोऱ्या, अंधश्रद्धा, बालविवाह अशा कारणांनी तालुक्यात बदप्रसिद्ध होते. दोन वर्गखोल्या असणारी चौथ्या...

उच्च शिक्षण, संशोधन – काही प्रश्न काही उत्तरे…

देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली. मात्र शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट समजून घेतले जात नाही. शिक्षण हे पदवी-सर्टिफिकेट घेण्यासाठी अन् पर्यायाने नोकरीसाठी गरजेचे म्हणून घेतले जाते. ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण हे मूळ उद्दिष्ट बाजूला राहते. त्यामुळे शिकवणारे, शिकणारे या सर्वांची दिशाभूल होते. सगळे लक्ष मार्क्स, श्रेणी, पर्सेंटेज यांकडे लागलेले. परीक्षांचे नियोजनदेखील त्या उद्दिष्टाने केले जाते. कोणतीही परीक्षा विद्यार्थी काय, कसे शिकला हे तपासत नाही...

ऐसे उगार माझे गाव ! (Ugar – My town)

उगार खुर्द हे भूतपूर्व सांगली संस्थानातील छोटेसे खेडेगाव. गाव स्वतंत्र भारतात गेल्या पाऊणशे वर्षांत पूर्ण पालटून गेले आहे. मूलत: दक्षिणवाहिनी असणारी कृष्णा नदी उगारजवळ उत्तर वाहिनी होते. अशा वळणाला तीर्थक्षेत्र मानले जाते. त्यामुळे नदीला प्रशस्त दगडी घाट वरपासून खाली, अगदी पात्राच्या मध्यभागापर्यंत आहे. शंभर वर्षे झाली तरी त्या घाटाचे बांधकाम अभंग आहे. उगार खुर्दला भाषिक सलगतेच्या तत्त्वावर सीमेलगतचे गाव म्हणून राज्य सरकारने भाषिक सवलती दिल्या आहेत...

गाडगेबाबांची मंतरलेली पत्रे – सार्वजनिक त्यागाची गीता (Gadgebaba’s letters are treasure of India’s value...

1926 ते 1956 असा साधारणपणे तीस वर्षांचा पत्रप्रपंच, म्हणजे ‘सार्वजनिक त्यागाची गीता’ आहे असेच म्हणावे लागेल. बाबांच्या पत्रांतून त्यांच्या कार्याबरोबर व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते. त्यांच्या पत्रसंग्रहात त्यांचा संपूर्ण आयुष्यक्रम गोवलेला आहे. ते जितके त्यागी-तितकेच संसारी, जितके ममताळू- तितकेच कठोर, जितके विरक्त-तितकेच संग्राहक, व्यावहारिक व प्रापंचिक वृत्तीने जितके सरळ- तितकेच कोणाबरोबर कोठे नि काय नि किती बोलावे याचे तारतम्य त्यांच्याजवळ होते. त्यांच्या पत्रांतून वाचकासमोर स्वच्छता, व्यवहारकुशलता, गुणग्राहकता, धार्मिक वृत्ती, कृतज्ञता, निराग्रही स्वभाव, तळमळ असा विविधांगी ‘इंद्रधनू’ उभा होतो...

वर्ध्याचे पुलगाव : माझे माहेरगाव (Pulgaon of Wardha – My childhood)

माझे पुलगाव हे माझ्या जिवाभावाचे गाव. या गावाशी असलेले माझे नाते अजोड आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे त्या गावाने पाहिले आहेत. माझे लहानपण, शिक्षण, लग्न या महत्त्वपूर्ण दिवसांचे ते साक्षीदार आहे. म्हणूनच पुलगाव सोडून पन्नास वर्षे झाली तरी त्या गावाशी असलेली माझी नाळ तुटलेली नाही. त्या गावाने मला आयुष्यभराचा लळा लावला आहे. ‘सेंट्रल अॅम्युनेशन डेपो’ हे पुलगावचे वैशिष्ट्य आहे. त्या डेपोमुळे गाव प्रसिद्धीच्या झोतात आले...

शैला मंडलीक- दापोलीचे आधुनिक महिला नेतृत्व (Shaila Mandalik- Women Reformist from Dapoli)

दापोलीच्या शैला(ताई) मंडलीक यांची जन्मशताब्दी 8 जानेवारी 2023 ला होऊन गेली. त्यांनी लोकसेवेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. त्या डॉ. पी.व्ही. मंडलीक ट्रस्टच्या विश्वस्त होत्या. संपर्कात येणाऱ्या माणसाची अडचण सोडवण्यासाठी निरपेक्ष बुद्धीने प्रयत्न करणारी माणसे समाजात थोडी असतात. शैला तशांपैकी एक होत्या. बालपणी आईचे संस्कार, विवाहानंतर डॉ.आप्पा मंडलीक यांची साथ आणि थोरले दीर समाजवादी नेते डॉ. पी.व्ही. मंडलीक यांचे मार्गदर्शन... त्यामुळे शैला समाजकार्य खंबीर मनाने करू शकल्या...

परंपरा जपणारे शिंदी बुद्रुक

चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य लाभलेले, ग्रामदेवता मरिआईची मिरवणूक, 'द्वारकाच्या बैला'ची मिरवणूक, श्रावणात घरोघरी केल्या जाणाऱ्या 'माळी पौर्णिमे'ची पूजा अशा अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा, परंपरा, उत्सव जोपासणारे, एकेकाळी अजरामर संगीत नाट्यकलावंत घडवून ‘नाटकांची शिंदी’ म्हणून ओळख निर्माण केलेले, 'शिक्षकांचे गाव' अशी वैविध्यपूर्ण ओळख असलेले अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील गाव म्हणजे ‘शिंदी बुद्रुक’...

मुरूड : वंदनीय विद्यार्थ्यांचे विद्यालय

शाळेतील शिक्षक वंदनीय असतात; पण एखाद्या शाळेतील विद्यार्थीही वंदनीय असतात हे वाचून कोणालाही अचंबा वाटेल. अशी शाळा आहे दापोली तालुक्यातील ‘मुरूड’ या गावातील.शाळा 10 ऑगस्ट 1834 रोजी स्थापन झाली. शाळेत 1842 पासूनचे बरेचसे रेकॉर्ड उपलब्ध आहे. त्यानुसार शाळेचा पहिला विद्यार्थी ‘विनू दातार’ हा आहे. त्यावेळी वडिलांचे नाव लिहीत नसावेत. एवढेच नव्हे, तर नोंद घरगुती नावानेच होत असे. 1844 पासून संपूर्ण नाव, तर 1879 पासून जन्मतारखाही नोंद करू लागले...