Home Search
शब्द - search results
If you're not happy with the results, please do another search
ओझे, शब्द आणि अर्थ यांचे (Loads of content and context)
शब्दांना अर्थ असतात आणि अर्थांना विविध छटा असतात. संदर्भानुसार अर्थच्छटेत सूक्ष्म फरक होतो. व्यवहारातही एखादा शब्द वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो. त्यामुळे शब्दांचे अर्थ बरेचदा संभ्रमितही करतात. विविध भाषांमधून एका अर्थासाठी जवळपास सारखे शब्द वापरले जातात. तर कधी कधी एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाताना, वस्त्र बदलावे तसे शब्द अर्थ बदलतात. दुसऱ्या भाषेत गेल्यावर एकातून दुसरा शब्द उमलतो आणि त्याचबरोबर अर्थही बदलतो...
प्रवास शब्दांचे आणि अर्थांचे
नंदिनी आत्मसिद्ध या बहुभाषाविद्वान आहेत. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर प्रभुत्व आहे. त्याचबरोबर त्यांचा कन्नड, बांग्ला, उर्दू आणि फार्सी या भाषांचाही अभ्यास आहे. त्या ‘मोगरा फुलला’च्या वाचकांसाठी शब्दांच्या व्युत्पत्ती, त्यांचा प्रवास याविषयी लिहिणार आहेत. या मालिकेचे शीर्षक आहे ‘शहाणे शब्द’. त्यातील हा पहिला लेख...
शब्द – भटके-विमुक्त (Wandering Words)
या जगात सगळ्यात जास्त भटके-विमुक्त कोण असतील, तर ते म्हणजे भाषेतील शब्द. मानव समाज स्थिर झाल्यानंतर नवनव्या अवजारांचे, नवनव्या तंत्रांचे शोध लागत गेले. गरजेपेक्षा जास्त उत्पादन होऊ लागले. माणसाला शिकारी अवस्थेतील खडतर जीवनापासून थोडी मुक्ती मिळाली, कला-कौशल्ये विकसित झाली आणि साहजिकच व्यापाराला चालना मिळाली. भाषांची, शब्दांची देवाणघेवाण व्यापारामुळे जेवढी झाली तेवढी इतर कोठल्याही घटकामुळे झाली नसेल. व्यापारमार्गावर झालेल्या भाषिक देवाणघेवाणीमुळे भारतीय भाषांमध्ये फारसी, अरबी, तुर्की, मंगोल, पोर्तुगीज, फ्रेंच, स्पॅनिश भाषांमधील शब्द आढळतात. इंग्रजी शब्दांबद्दल तर बोलायलाच नको...
बाबा आमटे-रमेश गुप्ता – कवितांचे शब्दांकन
दत्तप्रसाद दाभोलकर यांनी ‘अन्वयाची अक्षरलिपी’ या कवितासंग्रहाचे परीक्षण करत असताना एक किस्सा कथन केला आहे. बाबा आमटे यांच्या ‘माती जागवील त्याला मत’ या गाजलेल्या कवितासंग्रहावर ‘शब्दांकन- रमेश गुप्ता’ असे आहे. आता, कवितांचे शब्दांकन म्हणजे काय? मग ही कवितानिर्मितीची प्रक्रिया कोणती? कविता बाबा आमटे यांची की रमेश गुप्ता यांची?...
रतनबाई – तरुण विवाहितेचे शब्दचित्र
हिंदुस्थानी महिलेने लिहिलेले आणि इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेले पहिले पुस्तक मराठी लेखिकेचे होते. ते लंडनमध्ये 1895 साली प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाचे नाव Ratanbai - A Sketch of a Bombay High Caste Young Wife. त्या पुस्तकाच्या लेखक शेवंतीबाई निकंबे या होत्या. पुस्तकाच्या सतरा आवृत्त्या 1895 ते 2017 या काळात निघाल्या...
सोप्या शब्दांत गंभीर समीक्षा – नाट्यकलारूक्कुठार (Drama Criticism In Non Formal Language)
मराठी नाट्य व्यवहार आजच्या इतका मोठा (आर्थिक परिमाणात) झाला नव्हता तेव्हाची ही गोष्ट आहे. माधव मनोहर नावाचे नाट्यसमीक्षक 'सोबत' या साप्ताहिकात पंचम या सदरातून ज्याला समीक्षा म्हणता येईल अशा स्वरूपाचे लेखन करत असत.
सदाचार – नीतिमत्ता हे शब्दच खोटे! (Corruption Has Perveded Social Life)
भ्रष्टाचार हा विषय नवा नाही; पण चिंता आता अधिक वाटते. त्याचे कारण भ्रष्टाचाराशिवाय समाजव्यवहार अवघड झाला आहे. गावापासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराशिवाय सर्वसामान्य माणसांची कामे होत नाहीत.
कातकरी-मराठी शब्दकोशाधारे शालेय शिक्षण – गजानन जाधव यांचा उपक्रम
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथील गजानन जाधव हे डी एड झाल्यानंतर, शिक्षक म्हणून ‘रायगड जिल्हा परिषदे’त नोकरीस 2006 साली रूजू झाले. त्यांना रोहा...
शब्दनिधी
तुकारामाने म्हटले आहे : ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’. भाषेकडील या रत्नांचा खजिना म्हणजेच शब्दनिधी. कोणत्याही नैसर्गिक भाषेकडील तो खजिना कधी कमी होत नाही,...