Home Search
व्यक्ती - search results
If you're not happy with the results, please do another search
व्यक्ती
सर्वसामान्य माणसे त्यांच्या कर्तृत्वाने समाज घडवत असतात. परंतु अशा माणसांकडे दुर्लक्ष होते आणि लता मंगेशकर, शरद पवार, माधुरी दीक्षित, सचिन तेंडुलकर अशा सेलिब्रिटींची नावे समाजाचे कर्तृत्ववान प्रतिनिधी म्हणून...
गोपाळकृष्ण गोखले- व्यक्ती व संस्थापक (Gopal Krishna Gokhale – Thinker among freedom fighters)
गोपाळकृष्ण गोखले यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान बहुमुल्य आहे. ते बहुविध गुणांनी नावाजले गेले होते - भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे नेमस्तवादी पुढारी, उत्कृष्ट संसदपटू, देशभक्त राजकारणी, तर्कशुद्ध मांडणी शांतपणे करणारे अभ्यासू अर्थतज्ञ,
वसईतील मराठी भाषक ख्रिस्ती व्यक्तींची चरित्रे आणि आत्मचरित्रे (Biographies and Autobiographies of Marathi Speaking...
मराठी भाषक ख्रिस्ती समाजात चरित्र आणि आत्मचरित्र यांचे प्रमाण अगदी कमी होते. कॅथॉलिक पंथीय ख्रिस्ती समाजात तर संत चरित्र आणि अनुवादित (इंग्रजीतून) अशी धर्मगुरुंची आत्मचरित्रे लिहिण्यावरच भर अधिक होता.
जन्मशताब्दी साजरी होत असलेल्या व्यक्ती (Persons completed birthcentenary)
मी, माझा सहकारी राजेंद्र शिंदे आणि विनय नेवाळकर, आम्ही त्या तिघांच्या जन्मशताब्दीचा विचार करताना वेगळीच कल्पना लढवली. गेल्या शतकातील व या शतकाच्या पहिल्या काही दशकांत सामाजिक-सांस्कृतिक जीवन घडले गेले ते ढोबळपणे 1900 ते 1930 या काळात जन्मलेल्या महनीय व्यक्तींच्या संस्कारांतून. त्यांच्याच जन्माची शंभर वर्षे विद्यमान ज्येष्ठ जनांना महत्त्वाची वाटत आहेत व तो वारसा पुढील पिढ्यांपर्यंत जावा असेही वाटत आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्राईस टॅग असतोच!
प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रश्नावर सार्वमत घ्यावे असे म्हणून देशात खळबळ उडवून दिली आहे.
श्रीराम सेनेनेही आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरून भूषण यांना मारहाण केली, ते...
कुंभवे – शुद्ध पर्यावरण, शांत सहजीवन (Kumbhave – Pure environment, peaceful symbiosis)
प्रत्येकाला त्याचे गाव प्रिय असते. माझ्या गावाचे नाव ‘कुंभवे’ आहे. ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात येते. कुंभवे हे दापोलीपासून दहा किलोमीटर अंतरावर आणि रत्नागिरीपासून पंधरा किलोमीटरवर आहे. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र चारशेसाठ हेक्टार म्हणजेच अकराशे एकर आहे. गावची लोकसंख्या एक हजार तीनशेबावन्न आहे. हिरवळ, झाडे, पक्ष्यांचा गोड-मंजुळ असा आवाज, निसर्गरम्य वातावरण अशी गावाची चित्रे मनात उमटू लागतात...
रिलेशानी (Beautiful Relationship)
मोहन देस यांच्या ‘आरोग्यभान’ या प्रकल्पातून जन्माला आलेला ‘रिलेशानी’ हा प्रकल्प म्हणजे छान नातेसंबंध. वाढीच्या वयात, तरुणपणी मनात अनेक प्रश्न धुमाकूळ घालत असतात. त्यांचे निरसन करण्यासाठी विश्वासू व्यक्ती आयुष्यात नसेल तर नात्यात दरी पडते आणि ती वाढत जाते. लैंगिकतेकडे बघण्याचा सकस दृष्टिकोन, प्रेम-भावनेचे अनेक पदर, नात्यातून निर्माण होणारा विश्वास अशा अनेक विषयांवर मनमोकळा संवाद ‘रिलेशानी’ शिबिरात होतो. म्हणून त्याला संवाद शिबिर असेही म्हटले आहे...
सामाजिक दायित्व जपणारी दापोली अर्बन बँक (Dapoli Bank – An institute that belongs to...
दापोली अर्बन सहकारी बँकेची स्थापना 29 फेबुवारी 1960 रोजी झाली. बँक स्थापनेमागे उद्देश दापोली शहराच्या व्यापाराची व सर्वसामान्य माणसाची आर्थिक गरज भागवावी आणि शहराचा विकास साधावा हा होता. दापोली तालुक्याेत कोकण कृषी विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, सायन्स-आर्टस् कॉलेज अशा विविध शैक्षणिक सुविधा बनत गेल्या. मात्र तरी दापोलीच्या तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुणे-मुंबई यांसारख्या शहरांकडे जावे लागे. ती उणीव बँकेने हेरली व सदतीस लाख रुपये एवढी देणगी देऊन दापोली अर्बन सिनिअर सायन्स कॉलेजची स्थापना केली !
दिलासा – रुग्णांच्या चेहऱ्यावरील हसू (Smiles on the faces of patients at Dilasa)
व्याधिग्रस्त वृद्ध लोकांना सांभाळणे, त्यांचे औषधपाणी करणे, त्यांना त्यांचा शारीरिक त्रास, वेदना कमी होण्यासाठी मदत करणे, विकलांग, मतिमंद मुलांना आयुष्य चांगले जगण्याकरता मदत करणे अशी कामे करणारी ‘दिलासा’ ही नाशिकमधील अठरा वर्षे जुनी संस्था आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले सतीश जगताप आणि राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उज्ज्वला जगताप या दाम्पत्याने नेहमीच्या वाटा बदलून स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण केली...
दापोलीतील साहित्यजीवन
‘श्यामची आई’, ‘गारंबीचा बापू’ या साहित्यकृतींमुळे दापोलीचा ठसा साहित्य क्षेत्रात उमटला. दापोली हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे. तेथील तरुण वर्ग मुंबई-पुण्याकडे ‘करिअर’साठी जात आहे. असे असतानाही दापोलीचा निसर्ग, तेथील जीवन बाहेरगावी गेलेल्या तरुणांच्या मनातून जात नाही. ती ते त्यांच्या साहित्यातून प्रकट करतात. खुद्द दापोलीत राहणारे साहित्यिकही त्यांच्या परीने त्या करता धडपडत असतात. त्यांचा आढावा...