Home Search
विद्यार्थी - search results
If you're not happy with the results, please do another search
कानसेसरांचे विद्यार्थी त्यांची मुले झाली (Experiment in Online Education)
शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा यांच्या नात्यामध्ये, अध्यापन करताना घडणाऱ्या क्रिया-आंतरक्रिया महत्त्वाच्या असतात. शिक्षकांची प्रत्येक हालचाल मुलांचे कौतुक करताना, त्यांना समजावून सांगताना, प्रसंगी चुकल्यास त्यांना दटावताना, बोलत असते.
प्रत्येक विद्यार्थी हे स्वतंत्र पुस्तक!
भावनिक विकास हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया होय. तो विकास शाळेतील नियोजनबद्ध उपक्रमांच्या माध्यमातून होत असतो. त्या प्रकियेतील शिक्षकाच्या भूमिकेला अनन्साधारण महत्त्व असते. विद्यार्थ्यांना...
समर्पित शिक्षक व ध्येयाने झपाटलेले विद्यार्थी…
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील कुलालवाडी (खंडनाळ) हे चारशे लोकसंख्येचे छोटे गाव. गावात द्विशिक्षकी शाळा. शाळेत एकच शिक्षक कार्यरत. अशा जिल्हा परिषद शाळेत शिकलेला गणेश...
गणिताचे विद्यार्थी घडवणारे – एम. प्रकाशसर
एम. प्रकाशसर अर्थात प्रकाश मुलबागल हे गणित विषयाचे अध्यापक. त्यांनी 'गणित ऑलिम्पियाड स्पर्धे'त भारताला सुवर्णपद मिळवून देण्याच्या इर्षेने गणित विषयात विद्यार्थी घडवण्याचे काम अनेक...
जेएनयु आणि मराठी विद्यार्थी
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुढाकाराने स्थापन झाले. तेथे मानव्यविद्या शाखेतील जवळ जवळ सर्व विषयांचे शिक्षण उपलब्ध आहे. देशभरातील विद्यार्थी...
ढवळगाव – पैलवानांचे गाव (Dhaval Village – Famous for Wrestlers)
‘ढवळ’ हे गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले आहे. ते गाव फलटण-पुसेगाव राज्य महामार्गावर फलटणपासून एकोणीस किलोमीटर अंतरावर येते. ढवळगावाला कुस्तीची परंपरा मोठी आहे. हे गाव पैलवानांचे गाव म्हणूनच प्रसिद्ध आहे. गावातील काही मल्लांनी महाराष्ट्र चॅम्पियन हा किताबदेखील मिळवला आहे. माणदेशच्या इतिहासात प्रथम ‘महाराष्ट्र केसरी’ ही मानाची गदा सातारा जिल्ह्याला मिळवून देणारे पैलवान बापूराव लोखंडे हे ढवळ गावच्या मातीतले वीर...
कॅलिफोर्नियाची उपमा कोकणास का? (Can Kokan area in Maharashtra take clue from California?)
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात सोने पावणेदोनशे वर्षांपूर्वी सापडले. कोणीही जावे आणि सोन्याचे पोते घेऊन यावे असा समज सर्वत्र पसरला. सोने मिळते म्हटल्यावर जो तो सोने हाती लागेल या आशेने कॅलिफोर्नियाला जाण्यासाठी धावत सुटला. अमेरिकेतील माणसे आली, चीनमधून बोटी भरून आल्या. त्याला ‘गोल्ड रश’ असे म्हणतात. ‘मॅकेनाज गोल्ड’ नावाचा सिनेमा त्या हकिगतीतूनच निर्माण झाला होता. तेथील स्टॅनफर्ड विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांची नावे बघितली तर त्या शिक्षणसंस्थेची थोरवी मनात अधिकच ठसून जाते...
गाडगेबाबांची मंतरलेली पत्रे – सार्वजनिक त्यागाची गीता (Gadgebaba’s letters are treasure of India’s value...
1926 ते 1956 असा साधारणपणे तीस वर्षांचा पत्रप्रपंच, म्हणजे ‘सार्वजनिक त्यागाची गीता’ आहे असेच म्हणावे लागेल. बाबांच्या पत्रांतून त्यांच्या कार्याबरोबर व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते. त्यांच्या पत्रसंग्रहात त्यांचा संपूर्ण आयुष्यक्रम गोवलेला आहे. ते जितके त्यागी-तितकेच संसारी, जितके ममताळू- तितकेच कठोर, जितके विरक्त-तितकेच संग्राहक, व्यावहारिक व प्रापंचिक वृत्तीने जितके सरळ- तितकेच कोणाबरोबर कोठे नि काय नि किती बोलावे याचे तारतम्य त्यांच्याजवळ होते. त्यांच्या पत्रांतून वाचकासमोर स्वच्छता, व्यवहारकुशलता, गुणग्राहकता, धार्मिक वृत्ती, कृतज्ञता, निराग्रही स्वभाव, तळमळ असा विविधांगी ‘इंद्रधनू’ उभा होतो...
अनुश्री भिडे यांची हृदयाची भाषा ! (Anushree Bhide’s Language of Heart )
कोणत्याही कृतीपेक्षा त्यापाठीचा विचार, ती व्यक्ती नर आहे की नारायण (अथवा राक्षस) ते ठरवतो. गोष्टीतील श्रीमंत बाईसारखे अनेक लोक आजूबाजूला असतात. स्वतःसाठी लक्षावधी रुपयांची उधळण करणारे, पण दुसऱ्याला शंभर रुपये देतानाही हात मागे घेणारे. त्याचबरोबर, दुसऱ्याच्या वेदनेने दुःखी होणारे, स्वतः उपाशी राहून स्वत:चा घास भुकेल्या जीवांना देऊन तृप्त करणारे पुण्यात्मेही याच जगात दिसतात ! अशा ‘देवमाणसां’तील विठ्ठल-रखुमाईचा एक जोडा म्हणजे आनंद भिडे आणि अनुश्री भिडे...
नोरा रिचर्ड्स पंजाबी रंगभूमीची आयरिश आजी (Nora Richards – The Irish Mother of Punjab’s...
कबीर बेदीची आई फ्रेडा बेदी. फ्रेडावर दोन पुस्तके आहेत. ती जेव्हा कांगडा जिल्ह्यातील आंद्रेत्ता येथे राहण्यास गेली तेव्हा तिला नोरा रिचर्ड्स नावाच्या आयरिश अभिनेत्रीने मोकळी जमीन दिली. फ्रेडाने तिचे घर तेथे उभे केले. साहजिकच, उत्सुकता निर्माण झाली की ही नोरा कोण? ती हिंदुस्तानात का आणि केव्हा आली होती? आणि ती अभिनेत्री होती तर तिने कांगडासारख्या दूर, निसर्गरम्य जिल्ह्यात राहण्याचे का ठरवले ?