Home Search

रूढी-परंपरा - search results

If you're not happy with the results, please do another search

जगाला प्रेम अर्पावे ! (Offer love to the World)

समाजात सगळीकडे अस्वस्थता पसरलेली असताना, सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काय करायला हवे? संवेदनशीलतेने विचार करणाऱ्या माणसांच्या मनात असा प्रश्न असंख्य वेळा उद्भवतो. त्याचे समी‍करणातून देण्यासारखे उत्तर नाही. समाजाच्या परीघामध्ये ज्ञान, धर्म, राजकारण, लैंगिकता, स्त्री-वाद, पुरुषप्रधानता अशा क्षेत्रांतील विचारांचे सत्य समजून घेण्यासाठी, संकुचित विचार आणि वर्तन याबाबत सजगता येण्यासाठी सर्वांनी कार्यरत झाले पाहिजे...

नास्तिक आहे… म्हणूनच मस्त जगतो !

ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल स्पष्ट भूमिका घेणारे लोक जगात फार थोडे असतात; परंतु देव आहे की नाही याबाबत विचार करणारे लोक भरपूर असतात. किंबहुना, अगदीच भाविकभाबडे लोक वगळले तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोणत्या ना कोणत्या प्रसंगी ‘देव मदतीला येईल का ? पण देव असेल तरच ना !’ असा प्रश्न उद्भवत असतो. त्याचे प्रमुख कारण माणसाची दुर्बलता व म्हणून हतबलता हेच असते. तथापि काही कणखर माणसे कोणत्याही संकटप्रसंगी मनाचा निर्धार कायम ठेवून केवळ बुद्धीने विचार करून निर्णय घेतात. अशाच बुद्धिनिष्ठ, तार्किक विचार करण्याची शक्ती कमावलेल्या लेखकाने तो नास्तिक कसा बनत गेला याची कहाणी येथे सांगितली आहे...

प्रमोद झिंजाडे – विधवा प्रथा निर्मूलनाचे प्रवर्तक (Pramod Zinjade – Modern day social reformer)

प्रमोद झिंजाडे ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेली व्यक्ती. ते परिवर्तनवादी आहेत. त्यांनी समाजातील अनिष्टतेवर दंड उगारला आणि न्याय्य गोष्टी घडवून आणल्या. त्यांच्या विधवा प्रथा निर्मूलनाच्या संकल्पनेने विधवा महिलांना आनंदी जीवनासाठी आशेचा किरण दाखवला आहे...

डेबूचा गाडगेबाबा होताना (Gadgebaba his journey from childhood to sainthood)

0
डेबूच्या मनात व्यसनांच्या विरुद्ध चीड, संताप दगडावरील रेघेसारखा कोरला गेला आहे. त्यामुळेच डेबू गाडगेबाबा होऊन लोकांपुढे उभा राहतो. दुर्व्यसनांवर, अनिष्ट चालीरीती, रूढी-परंपरांवर टीका आणि कडाडून प्रहार करतो. म्हणून तो संतांसारखा केवळ टाळकुट्या न ठरता मोठा समाजसुधारक, मूर्तिभंजक, विज्ञाननिष्ठ विचारवंत म्हणून नावाजला जातो...

मुस्लिम सत्यशोधकांची कोंडी चहू बाजूंनी

हमीद दलवाई यांनी स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या अनुयायांची सद्यस्थितीत चहुबाजूंनी कोंडी केली जातेय. ती कोंडी फोडण्यासाठी बौद्धिक व नैतिक बळ गोळा करणे, संघटनशक्ती वाढवणे आणि विरोधकांच्या टीकेला व समर्थकांच्या आक्षेपांना तोडीस तोड उत्तरे देण्यासाठी वादविवादाची तयारी ठेवणे; प्रसंगी किंमत चुकवण्याची तयारी असणे हीच ती एक वाट आहे !

गाडगेबाबांच्या विचारांचे शिलेदार !

0
गाडगेबाबा पुस्तकात सामावू शकत नाही. तो या मातीत रुजतो आणि मातीतून उगवतो, माणसाच्या मनात वसतो. सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीचा आवाका लक्षात घेऊन साधीसोपी उदाहरणे देऊन विचार करण्यास लावणारे गाडगेबाबा विलक्षण आहेत...

मसुरे- वाड्यांचे गाव (Masure – Scenic Village)

0
मसुरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील गाव. गाव मालवणपासून सतरा किलोमीटरवर आहे. त्या गावाला छान निसर्गरम्य परिसर लाभला आहे. मशहूर या नावाचे हे गाव...

अजात ही झाली जात (Ganpati – Bussing’s Social reformer defeated by the Government)

1
जातिअंताची लढाई विदर्भात एका आध्यात्मिक महाराजाने शंभर वर्षांपूर्वी सुरू केली, तीही स्वत:पासून. मंगरूळ दस्तगीर येथील (तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती) गणपती महाराजांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ते काम केले.
_goregav

गवाऱ्यांचे गाव, गोरेगाव (Gaware’s Village, Goregaon)

0
पुणे जिल्ह्याच्या राजगुरूनगर तालुक्यातील गोरेगाव हे माझे गाव. ते तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शंभर टक्के आदिवासी गाव आहे. ‘भीमाशंकर’ हे महादेवाचे मंदिर त्या गावापासून पंचवीस...

शिवाजीदादा कागणीकर – बेळगावचा सर्वोदयी

शिवाजीदादा कागणीकर महाराष्ट्र, कर्नाटक व दक्षिण भारताचा काही भाग येथे सर्वांना परिचित आहेत. खादीची हाफ पँट, खादीचाच हाफ बाह्यांचा खिसेवाला शर्ट, गांधी टोपी...