Home Search
रमाबाई रानडे - search results
If you're not happy with the results, please do another search
रमाबाई रानडे आणि करमाळ्याचा खोलेश्वर
न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी करमाळा येथील खोलेश्वर देवास साकडे घातले. तेथे त्यांच्या बरोबर स्थानिक मुसलमान डॉक्टर होते आणि रानडे यांची अधिक काळजी घेण्यास पुण्याहून डॉक्टर आले ते विश्राम खोले. ते ज्योतिबांच्या संस्थेत काम करणारे. असे सामाजिक समन्वयाचे वातावरण महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाअखेरीस होते. रमाबाईंच्या पुस्तकातील तो किस्सा जाणण्यासारखा आहे...
सरोजिनी वैद्य : संशोधनाची नवी वाट
सरोजिनी वैद्य या लेखक व समीक्षक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. एकोणिसाव्या शतकात जेव्हा संशोधन सामग्री अपुरी होती, त्या काळात संशोधनाच्या नव्या वाटा धुंडाळून त्यांनी भोवती वलय नसलेल्या व्यक्तींवर लिहून त्यांचे कार्य प्रकाशात आणले. त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक विचारांची घुसळण आत्मीयतेने शब्दबद्ध केली. ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर यांनी सरोजिनी यांच्या साहित्यिक कारकीर्दीचा आढावा या लेखात घेतला आहे...
त्रेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-third Marathi Literary Meet 1961)
कुसुमावती देशपांडे यांची कवयित्री, कथाकार व समीक्षक अशी मराठी साहित्यसृष्टीत ओळख आहे. त्यांचा इंग्रजी व मराठी वाङ्मयाचा व्यासंग विलक्षण होता. त्यांनी त्या काळी कुटुंबियांचा विरोध डावलून कवी अनिल यांच्याशी केलेला प्रेमविवाह चर्चेचा विषय बनला. त्या दोघांचा त्या काळातील पत्रव्यवहार ‘कुसुमानिल’ या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे…
शेषराव घाटगे – पत्रे, देशभक्ताची व प्रेमवीराची (Patriot Sheshrao Ghatage)
शेषराव घाटगे यांच्या आयुष्याची चित्तरकथा मोठी रोमांचकारक आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करूनही त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. त्यांच्या चरित्रसाधनांवर 2011 ते 2012 या शताब्दी वर्षात प्रकाश पडला! त्यांचा चरित्रग्रंथ एकशेदोन वर्षांनी (मरणोत्तर एकोणसत्तर वर्षांनी) प्रसिद्ध झाला...
माझी कहाणी- पार्वतीबाई आठवले
स्त्रियांची आत्मचरित्रे, आत्मकथने मराठीत बरीच आहेत. लक्ष्मीबाई टिळकांची ‘स्मृतिचित्रे’, रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’, सुनीताबाई देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’ अशी काही...
रा.गो. भांडारकर – क्रियाशील सुधारक (Great Scholar R.G. Bhandarkar)
रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संस्कृतचे प्रकांड पंडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक आणि कर्ते धर्म व समाजसुधारक होते. त्यांचे मूळ आडनाव पत्की होते. त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते. म्हणून त्यांना ‘भांडारकर’ हे नाव पडले. त्यांचे आजोबा लाडो विठ्ठल हे शिरस्तेदार म्हणून इंग्रजीत पुढे आले. त्यांचे वडील महसूल खात्यात होते...
साहित्य संमेलनांचा इतिहास (History Of Literary Conferances)
मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन 11 मे 1878 या दिवशी पुण्यात भरले होते. आधुनिक महाराष्ट्रातील अनेक उपक्रमांचे प्रणेते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. पहिल्या ग्रंथकार संमेलनाची प्रेरणा ही न्यायमूर्ती रानडे आणि रावबहादूर गोपाळराव हरी देशमुख यांची होती. ते दोघे पहिल्या संमेलनाचे आणि पर्यायाने भविष्यकाळातील साहित्य संमेलनांचे शिल्पकार होते...
तळेगाव-दाभाडे ‘ब्रेन स्टार्मिंग’ सेशन
('सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध' या डिसेंबर 2014 मध्ये राबवण्यात आलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर तळेगाव-दाभाडे येथे फेब्रुवारी 2015 मध्ये 'ब्रेनस्टॉर्मिंग सेशन' आयोजण्यात आले. त्या चर्चेचा हा वृत्तांतवजा...