Home Search

मराठवाड्यात - search results

If you're not happy with the results, please do another search

मराठवाड्यातील दगडाबार्इंची शौर्यगाथा (Dagadabai, an ordinary village woman fought for national cause!)

महाराष्ट्रातील मराठवाडा हा भाग स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत येत होता. देशात इतरत्र लोक परकीयांविरूद्ध लढत असताना मराठवाड्यातील जनतेला स्वकीयांच्या अत्याचाराला तोंड द्यावे लागत होते. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ या स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाड्यातील जनतेत त्या विरूद्ध जागृती निर्माण केली. त्या लढ्यात ग्रामीण भागातील एक अतिशय धाडसी महिला सहभागी झाली होती. तिचे नाव होते दगडाबाई देवराव शेळके...
sinduratmak_ganesh

मराठवाड्यातील पुरातन – श्री सिंदुरात्मक गणेश

सिंधुरासुराचे मंदिर शेंदुरवादा या गावी (तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद) आहे. सिंधुरासुराचा वध व गणेशाचे स्वतःचे वाहन मूषक/उंदीर यास दिलेली मुक्ती या दोन प्रमुख पौराणिक...

खोंगा खोंगा साखर

आई-मुलीचे शब्दांची गरज न भासता, एकमेकींना समजण्याचे अनुभव तसे वैश्विकच. वत्सलाबाई बापुराव भोंग यांनी आईबद्दलच्या आठवणी गप्पांतून सांगितल्या आहेत. सोप्या शब्दांतून, प्रामाणिक संवादातून त्यांच्या नात्यांमधले उमाळे, कढ, आपुलकी आणि स्नेह व्यक्त होतोय. नात्यातला ओलावा टिकवून धरणाऱ्या गोष्टींची अनुकरणीय जाणीव हा लेख वाचणाऱ्या सगळ्यांना झाल्यावाचून राहणार नाही...

वटवाघळांचे डॉक्टर – महेश गायकवाड

डॉ. महेश गायकवाड हा एक झपाटलेला तरुण ! त्या अवलियाने भीतीचा आणि अंधश्रद्धेचा विषय असलेल्या वटवाघळांवर पीएच डी केली आणि निसर्गात राहून निसर्गाशी संवाद साधला. तो निसर्ग संवाद लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. लोक त्यांना ‘वटवाघळांचे डॉक्टर’ म्हणून ओळखतात...

अशोक ढवण – कुणबी कुळातील कुलगुरू

अशोक ढवण हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून विद्यापीठाचे कुलुगुरू झाले. त्यामुळे त्यांनी शैक्षणिक व शेती क्षेत्रांत संशोधनापासून उपयोजनापर्यंतची अनेकविध कामगिरी करत असताना माणसामाणसातील जिव्हाळा जपला, साहित्याचे प्रेम राखले आणि सभोवतालच्या समाजजीवनाचा एकूण स्तर उंचावला...

मराठवाडा : सण बाई दिवाळीचा राजा

0
मराठवाड्यातील दिवाळी खास आहे ती काही परंपरांमुळे. रेड्यांच्या टकरी, शेणापासून बनवलेले गोकुळ, म्हशींची मिरवणूक, गाई-म्हशींना ओवाळणे हे सारे कृषिसंस्कृतीतून, लोकसंस्कृतीतून झिरपलेले टिकून आहे...

विदर्भाची खाद्यसंस्कृती पानगे/रोडगे (पानगे/रोडगे यांतील सूक्ष्म भेद)

गव्हाच्या पीठापासून बनवला जाणारा पानगे/रोडगे हा पदार्थ विदर्भातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय. मार्गशीर्ष-पौष महिना सुरू झाला, की शेतात, तर कधी घरी पानग्याचा/रोडग्याचा बेत...

लढवय्या समाज योद्धा – कॉम्रेड मनोहर टाकसाळ

कॉम्रेड मनोहर टाकसाळ हे मराठवाड्याच्या पुरोगामी आणि परिवर्तनवादी वर्तुळात आदराने घेतले जाणारे नाव. स्वातंत्र्यलढा लढलेले आणि स्वातंत्र्यानंतर देशसेवेचे, समाजसेवेचे व्रत घेतलेले जे पहिल्या पिढीचे निष्ठावंत त्यागी आणि अविचल मनाचे मराठवाड्यातील कार्यकर्ते नेते होते...

मराठी – सर्वसमावेशक भूमिका हवी

जगात बोलल्या जाणाऱ्या एकूण भाषांमध्ये मराठी ही दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. मराठीची काळजीवाहू म्हणून बोलीभाषांना योग्य अधिष्ठान प्राप्त करून दिल्यास मराठीचा झेंडा निश्चितच उंच फडकणार आहे...

अँग्री यंग मॅन – सूर्यकांत

0
केरवाडी-परभणी येथील सूर्यकांत कुळकर्णी हा सतत अस्वस्थ व म्हणून संतप्त असतो. तो एकूण सामाजिक निष्काळजीपणाबद्दल हतबलता व्यक्त करत राहतो - मात्र तेवढ्यापुरता. तो त्याच्या सत्तराव्या वर्षीदेखील ‘अँग्री यंग मॅन’ वाटतो...