Home Search

भारदे - search results

If you're not happy with the results, please do another search

मंदार भारदे यांची झेप विमानाची !

मंदार अनंत भारदे नावाचा शेवगावकर तरुण विमाने आणि हेलिकॉप्टर्स भाड्याने देतो; त्याच्या स्वत:च्या मालकीची विमाने आणि विमान उड्डाण कंपनी आहे. त्याने ‘मंदार अनंत भारदे’ या त्याच्या नावातील आद्याक्षरे घेऊन कंपनी स्थापन केली आहे - Mab एव्हिएशन !

मंदार भारदे – जिद्दीचा उत्तुंग प्रवास !

मंदार भारदे हा तरुण व्यवसायिक आहे. तो चित्रपटनिर्मिती संस्थांना हवाई चित्रिकरणासाठी चार्टर विमानसेवा देतो. ‘मॅब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड’ 2012 साली रजिस्टर झाली. त्याने ‘एव्हिएशन वॉर रूम’ ही संकल्पना सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदा, 2014 साली भारतात आणली. ती राष्ट्रीय स्तरावर नावाजली गेली...

बाळासाहेब भारदे यांची काँग्रेसनिष्ठा…

बाळासाहेब भारदे यांची कुशल राजकारणी, गांधीवादी नेता अशी ओळख आहे. त्यांना इंदिरा गांधी यांनी यशवंतराव चव्हाण यांची साथ सोडून मुख्यमंत्री व्हावे असा निरोप दिला. बाळासाहेबांनी काळाची पावले ओळखून पदत्याग केला, परंतु निष्ठा सोडली नाही...

निसर्गदत्त महाराज – आधुनिक उपनिषदकार

‘I AM THAT’ हा ग्रंथ जगभरातील अनेक देशांमध्ये प्रसिद्धी पावला आहे. ग्रंथाचे भाषांतर त्या त्या देशातील भाषेतही झाले आहे. त्याची भाषांतरे विविध भारतीय भाषांमध्ये झाली आहेत. आध्यात्मिक क्षेत्रातील विद्वद्जनांनी त्या ग्रंथाला आधुनिक उपनिषद म्हणून गौरवले आहे. त्या ग्रंथामुळे जगातील कानाकोपऱ्यातून शेकडो अभ्यासू, पंडित, संशोधक यांची जणू रीघ भारतात आधुनिक काळात लागली ! या ग्रंथाचे कर्ते निसर्गदत्त महाराज या नावाने ओळखले जातात...

शेवगावचे रमेशसर – विविधांगी कर्तृत्व

शेवगावचे रमेश भारदे यांना शिक्षणसम्राट होणे सहज शक्य होते, तसे राजकीय संबंधही त्यांचे होते; पण ते शिक्षक झाले ! आणि नंतर सेवाभाव, ध्येयनिष्ठ असे शिक्षणसंस्था चालक बनले. त्यांच्या या कर्तबगारीचा केवळ शेवगाव नव्हे तर नगर जिल्ह्यावर एक वेगळा ठसा उमटला आहे. रमेश भारदे यांनी ज्ञानदानाचे व्रत अखंड जपले...

प्रशासनातील पुरुषोत्तम – पुरुषोत्तम भापकर

पुरुषोत्तम भापकर यांची ख्याती प्रशासनात कर्तव्यकठोर व सर्वसामान्यांच्या कामांसाठी तत्पर अधिकारी अशी आहे. ते विशेषत: तळागाळातील लोकांबद्दल अधिक दक्ष असतात. ते पदाचा बडेजाव मिरवत नाहीत, कामे मार्गी लावतात, स्वाभाविकच आहे ते, कारण ते हळव्या मनाचे संवेदनशील व प्रतिभावंत कवीदेखील आहेत. ती त्यांची ओळख निवडकांनाच माहीत आहे. त्यांचा बाणा शासकीय योजना या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राबवाव्या हा आहे...

शेतकऱ्यांचे स्वप्न जगणारा युवा कृषीसंशोधक – आदिनाथ काटे

आजच्या परिस्थितीत, मला शेती आणि शेतकरी यांच्याशी निगडित विषयात कारकीर्द करायची आहे असे कोणी म्हणाले तर त्याला समाज सोडाच त्याच्या घरातील लोकसुद्धा वेडा ठरवतील ! पण जिरायत आणि दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या शेवगाव तालुक्यातील आखेगाव या छोट्याशा गावातील आदिनाथ एकनाथ काटे या युवकाने मात्र तेच स्वप्न पाहिले...

यकृताचे प्रत्यारोपण – दिनेश झिरपे

डॉ. दिनेश कुंडलिक झिरपे हे सध्याचे देशातील आघाडीचे लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहेत ! ते शेवगावसारख्या ग्रामीण भागातून आले. त्यांनी Gastro Intestinal Surgery या विषयातील सुपर स्पेशॅलिटी विषयात राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत सुवर्ण पदकासह प्रथम क्रमांक पटकावला आहे...

तेजस्वी सातपुते – अंधारातून आयपीएसच्या तेजाकडे (Young IPS Tejasvi Satpute)

शेवगाव तालुक्यातून थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणारी तेजस्वी बाळासाहेब सातपुते ही पहिली व्यक्ती ! ती पुणे येथे गुप्तचर विभागात आयपीएसपदी कार्यरत आहे. तिने तिच्या कारकिर्दीत तडकाफडकी अनेकदा करियरच्या वाटा बदलल्या व हव्या त्या क्षेत्रात यश मिळवले. त्याचीच ही कहाणी...

शेवगावचा एव्हरेस्टवीर अविनाश बावणे (Avinash Bavane from Shevgaon… to Everest)

नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील तरुण अविनाश बावणे याने नौदलाच्या पथकाबरोबर जाऊन एवरेस्ट शिखर सर केले. त्याने तो पराक्रम तीन दिवसांत दोनदा केला- प्रथम एकट्याने व नंतर पुन्हा चमूबरोबर समूहाने. अशी यशसिद्धी असलेला जगातील तो एकटाच...