Home Search

फुले - search results

If you're not happy with the results, please do another search

वस्तीमधील उमलणारी फुले

स्त्री मुक्ती संघटनेचे काम ज्या वस्त्यांमधून चालते त्या वस्त्यांमध्ये यावर्षी नाट्याविष्कारचा कार्यक्रम बालदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. ज्यात मुलांचा व्यक्तिमत्व विकास, त्यांच्यातील सुप्त गुणांन वाव देणे हे उद्दिष्ट ठेवले होते. त्याचे माध्यम नाटक हे होते. नाटक मुलांना फुलण्याकरता, आत्मभान जागवण्याकरता, आत्मविश्वास निर्माण करण्याकरता चांगले माध्यम ठरले. त्यातून कार्यक्रमाअंती काही मुलांचे नेतृत्वगुण लक्षात आले...
_SavitribaiPhuleMahila_EkatmSamajMandal_3.jpg

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ

औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन 1989 साली बाहेर पडलेल्या सात तरुण डॉक्टरांनी मिळून बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान ही संस्था आणि त्याद्वारे हेडगेवार रुग्णालय सुरू केले. उद्दिष्ट होते आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामाजिक विकास...
_Ashok_Deshmane_1.jpg

बळीराजाची मुले, झाली ‘अशोक’वनातील फुले

दुष्काळ आणि शेतकऱ्यांची आत्महत्या या विषयावर चर्चा-परिसंवाद एवढी वर्षें होऊनही त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अशा वेळी अशोक देशमाने या तंत्रशिक्षित तरुणाने थेट ‘निष्काम...

लक्ष लक्ष प्रकाशफुले!

लक्ष लक्ष काजवे... नभोमंडळातील तारकादळच जणू धरतीच्या भेटीला आले आहे! आपल्या चहुबाजूंला पसरलेल्या मिट्ट काळोखाच्या साम्राज्यात 'अग्निशिखा' हे विशेषण सार्थपणाने मिरवणार्‍या काजव्यांचा चमचमाट लयबद्ध...

कचऱ्यातून समृद्धी (Prosperity from Waste)

3
नागरिक शहाणे होत नाहीत तोपर्यत प्लास्टिक पिशव्या तयार होतच राहणार आणि त्या कचऱ्यात जात राहणार. त्यामुळे या समस्येवर उपाय शोधून काढायचे ठरवले. पंधरा वर्षांपूर्वी ओला कचरा घरातच खतात रूपांतर करता येईल का असा प्रयत्न केला. मग फक्त प्लास्टिक विकले जाईल ही कल्पना. तो प्रयत्न खूप संशोधनानंतर सफल झाला आणि कचरा खाणारी बास्केट म्हणजेच किचन कंपोस्ट बास्केट जन्माला आली...

ऋतु बरवा : सहा ऋतूंचे सहा सोहळे… ( Rutu Barwa – ...

वातावरणातील ऋतुचक्र सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीमुळे निर्माण होते. म्हणजे ऋतू सूर्यसंक्रांतीवर अवलंबून असतात. ती वस्तुस्थिती महाभारत काळातदेखील माहीत होती. असे असताना, दुर्गाबाईंनी चांद्रमासांवर आधारित ऋतुचक्र का लिहिले हा मला पडलेला प्रश्न आहे... ऋतुचक्राचा मेळ चैत्र, वैशाख वगैरे चांद्रमासांशी बसत नाही. मी मराठवाड्याच्या रखरखीत पठारावर जन्मलो. अठ्ठावन्न वर्षे तिकडेच काढली. पुण्याला आलो तो येथील झाडांच्या ओढीने. पुणे हे सर्वाधिक वृक्षविविधता असलेले, अतिशय वृक्षसमृद्ध असे शहर आहे हे मला वाचून माहीत होते. येथे सह्याद्री आहे. चार नद्या आणि सात धरणे आहेत...

लाडूच लाडू -विचित्र नावांचे स्वादिष्ट लाडू (Laddus with Strange Names)

किती चित्रविचित्र नावांचे लाडू या जगात आहेत याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. उदाहरणार्थ, ‘खडखडे लाडू’. मालवण पट्टयात मिळणाऱ्या कडक बुंदीच्या लाडवांना खडखडे लाडू म्हणतात. तेथील लाडू जाड शेवेचे, काजूचे आणि खडखडे लाडू खडखड करत पोराबाळांनी खावेत किंवा दात पडलेल्या म्हाताऱ्याकोताऱ्यांनी वेळ जावा म्हणून चघळत बसावेत किंवा डब्यात खडखड वाजत असावेत म्हणून खडखडे. बेळगावकर सारस्वत लोकांच्या दिवाळीत ‘लडगी लाडू’ असतात. ‘खूळे लाडू’ नावाचे लाडू बेळगाव ते संकेश्वर भागात गणपती विसर्जनाच्या वेळी बनवतात...

नवा मानुष वाद

एकविसाव्या शतकाने लैंगिकतेच्या उधाणाचे, नातेसंबंधांच्या बाजारीकरणाचे आणि क्षणभंगुरतेचे वादळ आणले आहे, हे खरे आहे. परंतु ते पचवले जाईल आणि स्त्री-पुरुष व अन्य ह्यांनी परस्परांसोबत प्रेम, आदर व जिव्हाळा या भावनेने राहवे, शोषण व नियंत्रण ह्यांपासून मुक्त, निरामय जीवन जगावे ही आस कोणत्याही शतकात कायमच राहील. ‘नवा पुरुष’ समाज आणि साहित्य ह्यांच्या दृष्टिक्षेपात यावा व तो इतका व्यापक व्हावा की त्याचे ‘नवे’पण सार्वजनिक होऊन जावे...

कोजागिरी पौर्णिमा अर्थात मोत्यांची पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा मी इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर साजरी केली आहे की बस ! कधी शेतात, कधी गच्चीवर, कधी नदीकाठी; तर कधी कोणाच्या अंगणात. त्या प्रत्येक पौर्णिमेची आठवण माझ्यासाठी खास आहे. आमच्या घरी त्या दिवशी पहिल्या अपत्याला, म्हणजे मला ओवाळायचे, नवे कपडे घ्यायचे. काहीतरी गोडधोडाचे जेवण करायचे...

ऐसे उगार माझे गाव ! (Ugar – My town)

उगार खुर्द हे भूतपूर्व सांगली संस्थानातील छोटेसे खेडेगाव. गाव स्वतंत्र भारतात गेल्या पाऊणशे वर्षांत पूर्ण पालटून गेले आहे. मूलत: दक्षिणवाहिनी असणारी कृष्णा नदी उगारजवळ उत्तर वाहिनी होते. अशा वळणाला तीर्थक्षेत्र मानले जाते. त्यामुळे नदीला प्रशस्त दगडी घाट वरपासून खाली, अगदी पात्राच्या मध्यभागापर्यंत आहे. शंभर वर्षे झाली तरी त्या घाटाचे बांधकाम अभंग आहे. उगार खुर्दला भाषिक सलगतेच्या तत्त्वावर सीमेलगतचे गाव म्हणून राज्य सरकारने भाषिक सवलती दिल्या आहेत...