Home Search

पूजा - search results

If you're not happy with the results, please do another search

व्यंकटेश स्तोत्र : एकशेआठ ओव्यांची विष्णुपूजा

0
व्यंकटेश स्तोत्र आहे अवघ्या एकशेआठ ओव्यांचे. ते देविदासाने रचले. देविदास स्वतः त्या रचनेला ‘प्रार्थनाशतक’ असे म्हणतो. त्यांतील पहिल्या पाच ओव्या या नमनाच्या आहेत. नमन आहे गणपती, सरस्वती, देविदासाचे गुरू, संत व मुनिजन आणि साक्षात श्रोते यांना. तसेच, अखेरच्या सात ओव्या या स्तोत्राची महत्ता सांगणाऱ्या आहेत...

शिवाची रूपे, त्याची मंदिरे आणि त्याची पूजा (Sect of Shaiva and it’s Traditions)

0
सृष्टी शिवाने निर्माण केली. शिवाचे स्वरूप मानवासारखे नाही. शिवाची दोन रूपे स्वरूप व तटस्थ अशी आहेत. शिवहा पती असून त्याला हर, ईश, नाथ, नंदी इत्यादी नावाने ओळखले जाते. कुंभार घटनिर्मितीसाठी काठीद्वारे चाक फिरवून निर्माण झालेल्या गतीचा, शक्तीचा साधन म्हणून उपयोग करतो, तशी सृष्टीसाठी माया व प्रकृती असते.

इंद्र – प्रतिमा आणि पूजा (Worshipping Indra)

उच्चस्थान गाठणे सोपे – राखणे अवघड! इंद्रपूजा हा प्रकार एकेकाळी नित्य होता; तो दुर्मीळ झाला आहे. इंद्रदेवाचे वर्णन तो स्वर्गाचा अधिपती आहे; त्याची ती इंद्रसभा... तीत तो मेनका-रंभा-उर्वशी आदी अप्सरांच्या गायन-नृत्याच्या मैफलीत रमणारा, मद्यपान करणारा, विलासी स्वभावाचा,
_Ravan_1.jpg

रावणाची पूजा की त्याचे दहन?

0
रावणाच्या पुतळ्याचे दहन दसऱ्याला करावे की नाही याबाबत, रावणचरित्रावर आधारित गाजत असलेली ‘रावण - राजा राक्षसांचा’ ही कादंबरी लिहिणारे शरद तांदळे यांचे म्हणणे असे...
_devi_9_Avatar_1.jpg

नवरात्र : देवीच्या नऊ अवतारांची पूजा

हिंदू धर्मात सणवार आणि व्रतवैकल्ये यांची योजना ऋतुमानानुसार केली गेली आहे. त्याचप्रमाणे कुळधर्म-कुळाचारांचीही आखणी निसर्ग, ऋतू, ग्रह-नक्षत्रे यांच्या स्थितीनुसार आणि प्राचीन पौराणिक संदर्भांनुसार करण्यात...
_Satyanarayanachi_Puja_1.jpg

सत्यनारायणाची पूजा बंद!

सत्यनारायणाच्या पूजा श्रावण महिन्यात सगळीकडे आयोजल्या जातात. तशीच ती पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात झाली. त्यास विरोध झाला. त्यामुळे पूजा चर्चेत आली. कोणी घरगुती पूजा करत...

कलगी तुरा (Kalagi Tura)

(Kalagi Tura) ग्रामीण महाराष्ट्रात, कलगी तुरा हा लोककलेचा एक लोकप्रिय प्रकार आहे. वैचारिक मुकाबला असावा असा सवाल-जबाबाचा खेळ असतो. तमाशाचा फड असावा तसाच फड पण...

अग्रोली गाव आणि बेलापूर (Agroli Village and Belapur, Navi Mumbai)

नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यावर त्यात दिघा ते बेलापूर दरम्यानच्या एकोणतीस गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नागरीकरणामुळे गावांचा नकाशा बदलला. पण या सगळ्या गावांना मनोरंजक इतिहास आहे. तेथे झालेल्या आंदोलनांचा, सामाजिक चळवळींचा, मंदिरांचा आणि गडकिल्ल्यांचा वारसा आहे. यातल्या आग्रोली आणि बेलापूर या वैशिष्ट्यपूर्ण गावांविषयी लिहित आहेत शुभांगी पाटील-गुरव...

मी पाहिलेले दैनिकांचे संपादक

रवींद्र पिंगे यांचा दैनिकांच्या संपादकांबद्दलचा जुना लेख. त्यात ते म्हणतात, दैनिकांची वाट पाहणाऱ्यांपैकी मी नव्हेच नव्हे. दैनिके चार दिवस दिसली नाहीत तर माझे मन बिलकुल अस्वस्थ होणार नाही. अनेकदा, वर्तमानपत्र घरात येऊनही मी इतर व्यापांमुळे त्यांच्याकडे पाहतसुद्धा नाही. गेल्या अर्धशतकात मी जी काही वर्तमानपत्रे वाचली, त्यात तीन संपादकांची शैली मला अप्रतिम वाटली: फ्रँक मोराईस, रावसाहेब पटवर्धन आणि ग. प्र. प्रधान. त्यांच्यात अभिजात असा खानदानीपणा आहे. भाषाप्रभुत्व असामान्य आहे. विचारांना नैतिक अधिष्ठान आहे. आविष्कार सौम्य आहे. आवाहन आहे. आव्हान नाहीच आणि आग्रहाचे नावच नाही. तसे घरंदाज लेखन मला भुरळ घालते...

कोकणची जाखडी, मॉरिशसची झाकरी (Konkan’s Jakhadi becomes Zhakari in Mauritius)

जाखडी म्हणजेच बाल्या नाच. ती कोकणातील लोककला आहे. त्याला ‘शक्ती-तुरा’ असे म्हणूनही ओळखले जाते. ‘जाखडी नृत्य’ रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यांत विशेष प्रसिद्ध आहे. ते गौरीगणपतीच्या सणाला केले जाते. आश्चर्याचा भाग असा, की कोकणातून मॉरिशसला गेलेल्या व तेथे स्थिरावलेल्या मराठी लोकांनीही ती लोककला जपलेली आढळली. कोकणी लोक मॉरिशसमध्ये कामानिमित्त गेले, त्यास पावणेदोनशे वर्षे झाली. कोकणातील जाखडी नृत्य हे मॉरिशसमध्ये ‘झाकरी’ या नावाने ओळखले जाते...